संत्र्याला बसला बांगलादेशी आयात शुल्काचा फटका

बांगलादेशात संत्र्यावर आयात शुल्क वाढल्याने संत्रानगरीतच संत्रे फेकून देण्याची शेतकऱ्यांवर आली वेळ;

Update: 2023-11-02 06:33 GMT

संत्र्यासाठी प्रसिद्ध असलेल्या नागपूर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये शेतकरी सध्या संत्री फेकून देत आहेत. बांगलादेशने भारतातून त्यांच्या देशात आयात होणाऱ्या संत्र्यांवरील आयात शुल्क वाढवले आहे. त्यामुळे बांगलादेशात विदर्भातील संत्री महाग होऊन त्यांच्या पुरवठ्यात कमालीची घट आली आहे. विदर्भातून रोज 50 ते 60 ट्रक संत्री बांगलादेशला जात होता. आता फक्त 5 ते 10 ट्रक संत्री बांगलादेशात जात असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. रोज 50 ट्रक संत्री भारतातील बाजारपेठेत अतिरिक्त राहत असल्याने कोणीही खरेदीदार मिळत नसल्याचे चित्र आहे. मागील वर्षापासून हे आयात कर वाढविल्याने संत्रा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. उत्पन्न घटल्याने 2 ते 3 लाखांचे नुकसान शेतकऱ्यांना होत आहे.


Full View

Tags:    

Similar News