अकरावीची CET २१ ऑगस्टला, मराठी विषय डावलल्याने सर्वच स्थरावरून टिका होत आहे

Update: 2021-07-20 08:30 GMT

CET परिक्षेचे विषय इंग्रजी, गणित (भाग 1 व भाग 2), विज्ञान आणि तंत्रज्ञान(भाग 1 व भाग 2), सामाजिक शास्त्रे (इतिहास व राज्यशास्त्र, भूगोल) असे चार विषय एकूण 100 मार्क पैकी प्रत्येकी २५ मार्कांचा पेपर असणार आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत कोरोना प्रादुर्भावमुळे १० वी च्या परिक्षा रद्द् करत मागील . ५०-५० चा फॉर्मुला वापरत २८ मे२०२१ दरम्यान लागणारा परीक्षेचा निकाल १६ जुलै रोजी जाहीर करण्यात आलेला होता. २०२१-२२ च्या अनुषंगाने इयत्ता ११ वी प्रवेशासंदर्भात सामाईक प्रवेश परीक्षेचे आयोजन मंडळामार्फत शनिवार २१ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी १.०० या कालावधीत करण्यात येणार आहे. तर या परिक्षेचे विषय इंग्रजी , गणित (भाग 1 व भाग 2), विज्ञान आणि तंत्रज्ञान(भाग 1 व भाग 2), सामाजिक शास्त्रे (इतिहास व राज्यशास्त्र, भूगोल) असे चार विषय एकूण 100 मार्क पैकी प्रत्येकी २५ मार्कांचा पेपर असणार आहे. यामधून मराठी विषय डावलल्याने सर्वच स्थरावरून टिका होत आहे.

CET परिक्षा ११ वी प्रवेशासाठी असून ती विद्यार्थ्यासाठी पूर्णतः ऐच्छिक स्वरुपाची आहे. महाराष्ट्र बोर्डाची (मंडळाच्या) अभ्यासक्रमावर आधारीत असून ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. प्रश्‍नपत्रिके मधिल उत्तरे एकापेक्षा अधिक पर्यायाची(Multiple Choice Objective type Questions) व OMR वर आधारीत असणार आहेत . या परीक्षेकरीता राज्य मंडळ किंव्हा अन्य मंडळाच्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (१०वी) परीक्षेमध्ये उत्तीर्ण/प्रविष्ट झालेल्या इच्छूक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या https://cet.mh-scc.ac.in या संकेतस्थळावरुन अर्ज भरणे आवश्यक आहे. अर्ज भरण्याची सुविधा २०/०७/२०२१ रोजी सकाळी ११.३० वाजल्यापासून २६/०७/२०२१ अखेर पर्यंत असणात आहे.

ऑनलाईन नोंदणी कशी कराल?

राज्य मंडळाच्या अधिकृत वेबसाइट वर जा.

विद्यार्थ्यांचा दहावीचा आसन क्रमांक टाकून सीईटी परीक्षेचा अर्ज भरता येईल.

तिथे दहावीच्या निकालाचे गुण अपडेट केलेले असतील.

त्यानंतर पुढे तुमच्यासमोर परीक्षेसाठी इच्छुक आहात का? किंवा नाही असे दोन पर्याय समोर येतील. योग्य पर्याय निवडून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करा.

Tags:    

Similar News