दिल्लीत महिला कुस्तीपटूंनी आंदोलन मागे घेतल्याची चर्चा सुरू आहे. यानिमित्ताने तीन प्रश्न पुढे आले आहेत. या महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनाला कुस्तीपटू वगळता इतर खेळाडूंनी पाठींबा का दिला नाही? कुस्तीपटूंची धरपकड होत असताना समाज म्हणून आपल्याला अस्वस्थ का वाटलं नाही? याबरोबरच बेटी बचाओ म्हणणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणी स्वपक्षाच्या खासदारावर कारवाई का केली नाही? या तीन प्रश्नांचं परखड विश्लेषण हेडलाईन्सच्या पलिकडे या विशेष सदरात ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर यांनी केलं आहे.