130 कोटी भारतीयांनी सकारात्मकतेचा उत्सव करा. असं सत्ताधारी पक्षाचे नेते सांगत आहे. मात्र, कोरोना काळात आपले नातेवाईक गमावलेल्या लोकांनी सकारात्मकतेचा उत्सव कसा साजरा करायचा? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.
या संदर्भात सामाजिक कार्यकर्त्या मुक्ता मनोहर यांनी मॅक्समहाराष्ट्रशी बातचीत केली. यावेळी मुक्ता मनोहर यांनी देशाचे पंतप्रधान अशा काळात देशवासियांना सकारत्मकता पसरवा असं सांगत आहेत. मात्र, लोकांचा ऑक्सिजनच्या अभावाने मृत्यू होत असताना कशाची सकारत्मकता पसरायची? लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर आपण कधी बोलणार? लॉकडाऊनमध्ये लोकाचे हाल होत असताना माध्यमांची भूमिका काय? तिसऱ्या लाटेची आपण कशी तयारी केली आहे? आपल्या देशाला नक्की कशाची गरज आहे? याचा विचार आपण कधी करणार आहोत? असा सवाल उपस्थित केला आहे. पाहा सामाजिक कार्यकर्त्या मुक्ता मनोहर यांचं विश्लेषण