हिवाळी अधिवेशन कशाला भरवायचं? प्रमोद यादव
विधानभवनामध्ये (Legislature)ज्या प्रश्नांची चर्चाच नको व्हायला असले प्रश्न काढून त्या ठिकाणी नुसताच गोंधळ चालू आहे. जनतेला शेतकऱ्यांना गरज असताना सरकारमध्ये असणारे मंत्री, आमदार (Minister/ MLA) याबाबतीत बेफिकिर दिसतात. कशासाठी लोकांचा पैसा ( public funds) तरी खर्च करायचा, असा खडा सभा निवृत्त संनदी अधिकारी प्रमोद यादव यांनी उपस्थित केला आहे.;
सध्या नागपूर अधिवेशन चालू आहे त्यावेळी म्हणजे 1954 साली नागपूर करार झाला. आणि विदर्भातील जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न ची उत्तरे व ते प्रश्न तिथे सुटावेत म्हणून महाराष्ट्रातील नेते आणि विदर्भातील नेते यांचे नुसार नागपूर करार झाला. त्या करारानुसार नागपूर मध्ये विधानसभेचे अधिवेशन व्हावे म्हणून नागपूर करारातील हा एक महत्त्वाचा विषय आहे. नागपूर अधिवेशन मध्ये बऱ्याचदा तिथे जाण्याची वेळ आली. नागपूर अधिवेशन खरे तर विदर्भातील प्रश्न सुटण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे पण सध्या या अधिवेशन तेथे का भरवले जाते हा प्रश्न बऱ्याचदा मनाला पडतो. महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न असताना की जे प्रश्न खरेच जनतेच्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे असतात त्यामध्ये दिशा सालियान आणि पूजा चव्हाण यांचा खरंतर या कामकाजामध्ये चर्चेला विषय येण्याची गरज पण नव्हती.
तरीदेखील हे प्रश्न तिथे चालू आहेत .आणि खरेच ज्या प्रश्नाला लक्ष दिलं पाहिजे त्या ठिकाणी शून्य भोपळा काम चाललेल आहे परवाच शेतामध्ये गेलो पीक चांगले आहेत बाजार भाव नाही पावसाने झोडपलं सोयाबीन हाताला लागलं नाही अत्यंत परिस्थिती बिकट शेतकऱ्याची आहे रात्रीच पाणी धराव लागते वीज 24 तास नाही कुठे. बाजारभावामध्ये नाशवंत मालाची अगदी टमाटो पाच रुपये किलोने कोबी चार रुपये किलोने वाटाणा वीस रुपये किलोने असे रेट शेतकऱ्याच्या हातात पडतात. आज जी औषधे घ्यावी लागत आहेत शेती कीडनाशकासाठी त्यांची किंमत हजाराच्या पुढे आहे. युरिया सुफला तर मिळतच नाही आणि मिळाला तरी त्याची किंमत परवडत नाही. शेतीत मजूर मिळायला तयार नाही.बाजार भाव मिळेल ना. वीज मिळेना. आणि यातून एक प्रकारचं ग्रामीण भागात नैराश्य पसरलेल आहे.
तरुण मुलांची लग्नाची बिकट परिस्थिती आहे. तर सतरंज्या उचलण्यासाठी कार्यकर्त्यांची फळी तयार होत आहे. गावात ग्रामपंचायतीची इलेक्शन लागली की गावात एकमेकांची डोकी फोडण्यासाठी गावकरी तयार झालेल आहेत. अशी हातबल परिस्थिती तयार होत आहे. असे अनेक प्रश्न असताना विधानभवनामध्ये ज्या प्रश्नांची चर्चाच नको व्हायला असले प्रश्न काढून त्या ठिकाणी नुसताच गोंधळ चालू आहे. मग हे अधिवेशन कशासाठी भरवायचं हा एक प्रश्न पडतो. आणि या प्रश्नाचे उत्तरे मिळत नाही. त्यासाठी जनतेला शेतकऱ्यांना गरज असताना सरकारमध्ये असणारे मंत्री, आमदार याबाबतीत बेफिकिर दिसतात. आणि अधिवेशन चालू राहते. कशासाठी लोकांचा पैसा तरी खर्च करायचा. कोट्यावधी रुपये तिथे खर्च होतात आणि त्यातून निघतोय काय डोंगर पोखरून उंदीर काढतोय.
म्हणून येथून पुढे खरंच यांचं लक्ष मतदारावर असेल तर मतदारांनी राजकीय लोकांना लाख वेळा विचार करून मतदान केलं पाहिजे यांना एकदाच आमदार केलं पाहिजे. दुसऱ्यांदा पुन्हा आमदार करून उपयोग नाही. कारण हे प्रश्न जनतेचे सोडवण्यासाठी नसतात हे प्रत्यक्षात दिसून येत. यांना जनतेचं, शेतकऱ्यांचं, सामान्य लोकांचं काहीही घेणं देणं नाही. म्हणून टीव्हीवरल्या बातम्या पाहणे जर बंद केलं तर खरच शांतता लागते . वर्तमानपत्र न वाचलेली बरी कारण 90 टक्के बातम्या या नकारार्थी प्रकारच्या आहेत. कोण रस्त्यावर मेला, कोणाचा खून झाला आणि विधानभवन अधिवेशनात एकमेकाची कुरघडी त्याच्यापेक्षा शांत चित्ताने जर विचार केला तर पुढील कथा खूपच बोध मिळणारी आहे शेवटी डोकं खाजवून फक्त रक्त निघतय हेच यातून सिद्ध होते
एका गावात ओशोचं व्याख्यान होतं.
तिथे दोन मित्र राहात होते. एक हिंदू होते, एक जैन. ५० वर्षांपासूनची मैत्री होती. ५० वर्षांपासून झगडा होता.
हिंदू मित्र म्हणायचे, सृष्टी परमेश्वराने तयार केलेली आहे.
जैन मित्र म्हणायचे, सृष्टीचा कोणी निर्मिक वगैरे नाही.
ओशोंना भेटल्यावर त्यांनी सांगितलं की तुम्हीच याचा निवाडा करा. म्हणजे झंझट संपून जाईल.
ओशो जैन मित्राला म्हणाले, तुम्हाला निवाडा कशासाठी करायचा आहे? समजा सृष्टी परमेश्वराने वसवली आहे, असं ठरलं तर तुम्ही पुढे काय करणार आहात?
ते म्हणाले, काहीच नाही. आपण काय करू शकतो?
ओशो हिंदू मित्राला म्हणाले, सृष्टीचा कोणी कर्ता नाही, हे कळलं तर तुम्ही काय कराल?
त्यानेही जैन मित्रासारखंच उत्तर दिलं.
ओशो म्हणाले, ज्यातून तुमच्यात काही बदल घडणार नाही, तुम्ही काही करणार नाही, ज्या माहितीचा तुम्हाला काही उपयोग नाही, अशा प्रश्नांवरून ५० वर्षं भांडणं कसली करता?...
नंतर ते म्हणतात, प्रवचनांनतरही अनेक लोक असेच प्रश्न विचारतात. त्यांना उत्तराची ओढ नसते, कसलीही आंच लागलेली नसते, त्यांच्या आयुष्यात त्या उत्तराने काहीच परिवर्तन घडणार नसतं… फक्त मेंदूची खाज असते, ती खाजवायची असते… असं नुसतं खाजवत बसलं तर नंतर रक्त येतं, हे विसरू नये.
निवृत्त संनदी अधिकारी प्रमोद यादव