यामुळे सोडला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्म - जेष्ठ विचारवंत राम पुनियानी
डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांची ओळख म्हणजे भारतीय संविधानाचे शिल्पकार, बहुश्रुत विद्वान, तत्वज्ञ आणि थोर मानवी हक्कांचे कैवारी. डॅा. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांमध्ये जागृती निर्माण करण्याकरीता अस्पृश्य वर्गातील कार्यकर्त्यांची संघटना उभारली. इतकेच नव्हे तर डॅा. बाबासाहेबांनी अस्पृश्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठविला व त्यांच्यात आत्मविश्वास, अन्यायाविरूध्द लढण्याची जिद्द, वाईट चालीरीती सोडून देण्याची प्रवृत्ती, शिक्षणाची व स्वच्छतेची आवड निर्माण करून त्यांचा स्वाभिमान जागृत केला. या सगळया गोष्टींसोबतच त्यांनी केलेली आणखी एक क्रांतिकारक घटना म्हणजे त्यांनी केलेला बौद्ध धर्माचा स्वीकार. डॅा. बाबासाहेब आंबेडकरांनी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी नाशिकजवळील येवला येथे धर्मातराची घोषणा केली. परंतू त्यावेळी थेट त्यांनी ते कोणत्या धर्माचा स्वीकार करणार हे घोषित केले नव्हते. त्यानंतर १९३६ मध्ये ३० व ३१ मे रोजी मुंबईतील इलाखा महार परिषद येथे त्यांनी धर्मांतराच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केला. परंतू आंबेडकरांनी हिंदू धर्म का सोडला याबाबत सविस्तर जाणून घ्या, पाहा हा व्हिडीओ-
यामुळे सोडला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्म - जेष्ठ विचारवंत राम पुनियानी-