विश्लेषण : राजकीय वास्तव आणि आभासी वास्तव
भाजप हा ब्राह्मण आणि बनिया यांचा पक्ष आहे, अशी टीका केली जाते. तसेच या पक्षाला याच दोन समाजांचे सर्वाधिक मतं मिळतात, असाही दावा केला जातो. पण २०१४ आणि २०१९ मध्ये राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांमधील मतदानाच्या टक्केवारीचे विश्लेषण करत सुनील तांबे यांनी वेगळा मुद्दा मांडला आहे.;
भाजप आणि शिवसेना हे दोन हिंदुत्ववादी पक्ष आहेत, असे सेक्युलर पक्षांचे म्हणणे आहे. पण याच दोन पक्षांना गेल्या दोन निवडणुकांमध्ये सर्वाधिक मतं मिळाली आहेत. भाजप हा ब्राह्मण आणि शेठ यांचा पक्ष आहे, अशी टीका केली जाते. तसेच या पक्षाला याच दोन समाजांचे सर्वाधिक मतं मिळतात, असाही दावा केला जातो. पण २०१४ आणि २०१९ मध्ये राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांमधील मतदानाच्या टक्केवारीचे विश्लेषण सुनील तांबे यांनी केले आहे.
१. महाराष्ट्र विधानसभा २०१४ च्या निवडणुकांचे निकाल
अ. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप त्याशिवाय अन्य राजकीय पक्ष स्वबळावर लढले होते. बहुतेक मतदारसंघात चौरंगी लढती झाल्या होत्या.
आ. भाजप ( २७.८१ टक्के मतं) १२२ जागा, शिवसेना (२२ टक्के मतं) ६३ जागा, काँग्रेस (१५ टक्के मतं) ४२ जागा, राष्ट्रवादी काँग्रेस (१४ टक्के मतं) ४१ जागा, शेकाप (१ टक्के मतं) ३ जागा, बहुजन विकास आघाडी (१ टक्के मतं) ३ जागा, भारिप बहुजन महासंघ (०.०३ टक्के मतं) १ जागा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (०.३ टक्के मतं) १ जागा, समाजवादी पक्ष (०.३ टक्के मतं) १ जागा,
२. २०१४ ते २०१९ या काळात मराठा समाजाने अतिशय शिस्तबद्ध आणि शांततापूर्ण शक्तीप्रदर्शन केलं. संभाजी उद्यानातील राम गणेश गडकरी यांचा पुतळा नदीत फेकून देण्यात आला. बाबासाहेब पुरंदरे यांना देण्यात आलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराला शरद पवार, भालचंद्र नेमाडे इत्यादी मान्यवरांसह अनेक संघटनांनी विरोध केला. पुरंदरे यांना पोलीस संरक्षण देण्यात आलं. कोरेगाव-भिमा प्रकरण घडलं. अनेक विद्वानांना नक्षलवादी वा अर्बन नक्षल ठरवून तुरुंगात डांबण्यात आलं.
३. २०१९ च्या निवडणुकीत भाजप-सेना युती झाली. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी झाली.
४. महाराष्ट्र विधानसभा २०१९ निवडणुक निकाल
अ. भाजप ( ३७ टक्के मतं) १०६ जागा, शिवसेना (२० टक्के मतं) ५८ जागा, काँग्रेस (१५ टक्के मतं)
४३ जागा, राष्ट्रवादी काँग्रेस (१८ टक्के मतं) ५३ जागा, शेकाप (०.३ टक्के मतं) १ जागा, बहुजन विकास आघाडी (१ टक्के मतं) ३ जागा, भारिप बहुजन महासंघ (०.०३ टक्के मतं) १ जागा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (०.३ टक्के मतं) १ जागा, समाजवादी पक्ष (०.७ टक्के मतं) २ जागा.
५. भाजप आणि शिवसेना या दोन हिंदुत्ववादी राजकीय पक्षांपुढे सेक्युलर म्हणवणारे राजकीय पक्ष फिके पडले आहेत. दोन हिंदुत्ववादी पक्षांना केवळ ब्राह्मण आणि उच्चवर्णीय मतदान करतात अशी समजूत वा धारणा असणारे मूर्ख आहेत. ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात सुरु झाला. एकविसाव्या शतकाच्या दुसर्या दशकातही तो चालू असेल तर गेल्या १०० वर्षांत ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर यांच्यामध्ये काहीही बदल झाले नाहीत असं मानावं लागेल. मात्र निवडणुक निकालांमधील राजकीय वास्तवाशी त्याची सांगड घालता येणार नाही. फेसबुकवरील माझ्या मित्रयादीतील बहुसंख्य मित्र-मैत्रीणींच्या धारणा राजकीय वास्तवाशी सुसंगत नाहीत. ते बहुधा आभासी वास्तवात खूष असतात.
सुनिल तांबे यांच्या फेसबुक वॉलवरुन साभार