बजरंग दलाला कृष्ण आणि गवळणी च्या अथवा राधेच्या रती-क्रीडा किंवा काही देवी-देवतांच्या शृंगारिक प्रसंगापासून अडचण आहे. अशा वेळेला ते कालिदास यांचं काव्य 'कुमारसंभवम' या काव्यसंग्रहामध्ये शिव-पार्वती च्या रती-क्रीडाचं तपशीलवार वर्णन केलेलं आहे. याच काव्य संग्रहात देवी-देवतांच्या शारीरिक संबंधांच्या प्रसंगांचे सुक्ष्म वर्णन करण्यात आलं आहे. अशा काव्यसंग्रहाचं बजरंग दल काय करेल.
गुजरात मध्ये 'कामसूत्र' ग्रंथाला जाळण्यात आले आहे. एवढेच नाही तर ग्रंथ जाळण्यात आलेल्या बजरंग दलाने अशी धमकी दिलेली आहे की जर कामसूत्र ग्रंथाची विक्री चालू ठेवली तर त्याची दुकाने पण जाळण्यात येतील. 'बजरंग दलातील' लोकांचे म्हणणे आहे की ग्रंथातील कृष्णाचे चित्र हे आक्षेपार्य असून त्यातून हिंदू देवी-देवतांचा अपमान करण्यात आला आहे'.
आक्षेपार्ह चित्राचा अर्थ हाच आहे की कामसूत्र ग्रंथात कृष्णा आणि गवळण किंवा राधा यांच्या रती क्रीडाचे चित्र आहे. माहिती नाही शारीरिक संबंधांसाठी आक्षेपार्ह शब्दांचा वापर आपण करायला लागलो? प्रेम किंवा प्रणय संबंधांसाठी आक्षेपार्य शब्दांचा वापरच खरा आक्षेप आहे.
बजरंग दलातील लोकांना कृष्ण आणि गवळणी अथवा राधेच्या रती-क्रीडा किंवा बाकी देवी-देवतांच्या सौंदर्याच्या चित्रांवरून समस्या आहे तर ते भारताच्या त्या महान साहित्यांचे काय करतील. जे आधीपासूनच आजतागत अशा संदर्भांनी भरलेले आहे.
ते कालिदास यांच्या काव्य 'कुमारसंभवम' काव्यसंग्रहाचे काय करतील? ज्यामध्ये विश्वाचे माता-पिता शिव-पार्वती यांच्या रती-क्रीडेचे तपशीलवार वर्णन केलेले आहे. असे लोक जयदेवांच्या 'गीतगोविंदम'चे काय करणार ज्यामध्ये कुंज-भवन (कुञ्ज-भवन') मध्ये राधा-कृष्णेच वर्णन केलं आहे? संस्कृत कवितांच्या त्या ओळींचे काय करतील ज्यामध्ये देवी-देवतांच्या शारीरिक संबंधांच्या प्रसंगांचे चित्रण किंवा सुक्ष्म वर्णन केले आहे.
शंकराचार्यांनी लिहिलेल्या 'सौंदर्यलहरी' चे काय करणार? खजुराहो सारख्या अनेक ठिकाणी मंदिरामध्ये कोरलेल्या मूर्तींचे काय करणार? राधा- कृष्णाच्या प्रेमाचे चित्रण असलेल्या त्या चित्रांचं काय करणार ज्यामध्ये राधा कृष्णाच्या प्रेम लिला दाखवल्या आहेत. ज्या चित्राच्या शैलीने भारतीय चित्रकला अनेक रूपात विकसित झालेली आहे. मग या सगळ्यांना ते तोडणार का? जाळुन टाकणार का? सगळ्यांचा विध्वंस करणार का?
ज्या बजरंग बली म्हणजे हनुमानाच्या नावावर त्यांनी आपल्या संघटनेचे नाव ठेवले आहे. त्या हनुमानविषयी अनेक प्रकारच्या परंपरा आढळतात. रामकथेची एक परंपरा वाल्मिकींची आहे. ज्यामध्ये हनुमान ब्रह्मचारी मानले जातात.
एक दुसरी परंपरा जैन राम कथांची आहे. ज्यामध्ये हनुमानाच्या लग्नाचे वर्णन केलेले आहे. विमल सुरी आणि स्वयंभू रचनांमध्ये हनुमान ब्रह्मचारी नाही तर, विवाहित आहे. त्यांचे एक नाही तर, अनेक लग्न झालेले आहेत. एक लग्न तर, रावणाची बहिण अनंगकुसुम सोबत झालेले आहे.
यासारखेच जैन कथांव्यतिरिक्त पुराणातील कथांमध्ये हनुमानाचा मुलगा मकरध्वजची कथा आहे. ही कथा पण काही वेगळ्या प्रकारची आहे. कथा अशी आहे की, लंकेत आग लागल्यानंतर हनुमान आपली शेपुट विझवण्यासाठी समुद्रात अंघोळ करतात. त्यावेळीच त्यांच्या शरीरातून गळलेला घाम मादी मासा पेली आणि ती गरोदर राहीली. मग ती पोहत पोहत पाताळ लोकात पोहोचली. जेथे अहिरावण राजा होता, तो रावणाचा भाऊ मानला जातो. तेथे त्याचे पोट कापुन बाळ मकरध्वजाचा जन्म होतो.
हिंदी चे प्रसिद्ध समीक्षक आचार्य हजारीप्रसाद व्दिवेदी यांनी त्यांच्या 'कुटज' निबंधामध्ये अगस्त्य ऋषींच्या जन्माची कथा सांगताना लिहिले आहे की, कुट अर्थात घड्यातून अगस्त्य मुनींचा जन्म झाला. म्हणून त्यांना 'कुटज' म्हटलं जाते. घड्यामधून काय उत्पन्न होणार? काही तरी झालंच असेल ना? या तर्कावर तर एवढेच बोलले जाईल की, मकरध्वज हनुमानाच्या घामापासून बनला असेल, काही तरी घडलंच असेल ना?
एवढंच नाही तर सुर्याची मुलगी सुवर्चला बरोबर हनुमानाचं लग्न झाल्याचं प्रसंग मिळतो. आणि या दोघांचे मंदिर तेलंगणा राज्यातील खम्मम जिल्ह्यात आहे. या सर्व गोष्टीचे तात्पर्य हेच आहे की, 'बजरंग दलाचे' आराध्य बजरंग बली हे अशा कथांसोबत जोडलेले आहेत, तर 'कामसूत्रातील या चित्रांना धरून आक्षेप घेण्याची गोष्ट अज्ञानी आणि अधर्माशिवाय काय असेल?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल या सारख्यांच्या अशा क्रियांमुळे हिंदू धर्म विविध प्रकारच्या आध्यात्मिक पद्धतीचा समुह असलेल्या विविधतेला धक्का बसतो. जर हिंदू धर्मातील देवी-देवतांची स्वरूप पहिले तर हे स्पष्ट होते की, देव-देवता पण, एकसारख्या नाहीत.
कृष्ण जन्माष्टमी उत्सव नुकताच पार पडला. एकाबाजूला कृष्णासारखे देव आणि दुसऱ्या बाजुला बिहार (दक्षिण आणि मध्य) मध्ये एक प्रचलित असलेली देवता आहे. गौरीया बाबा जी दारूने प्रसन्न होतात. ज्याला तपावन बोलले जाते.
पटनाचा अगम कुआ मध्ये एक शीतल माता चे मंदिर आहे. ज्यांच्याबद्दल अशी कल्पना आहे की, गाढवावर स्वार असते, तिचे शस्त्र झाडू आहे आणि तिला शिळा भात खूप आवडतो.
यावरून हे स्पष्ट होते की, देवी-देवता पण माणसांच्या कल्पनांचं पौराणिक रूप आहेत. 'शीतल माता' देवीचा स्वीकार धोबी समाजाने अगोदर केला असावा. त्यानंतर सर्व हिंदू समाजाने स्वीकार केला असावा.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल यासारखे संघटन हिंदूमध्ये सतत आक्रमकपणा वाढेल. यासाठी प्रयत्न करत असतात. हिंदू देव-देवतांच्या आक्रमक प्रतिमेचा वापर करत त्यांचे असेच रूप जनतेत प्रचाराच्या माध्यमात वापरले जाते.
राम जन्मभूमीची आंदोलन लक्षात घेतलं असता यामध्ये रामाची प्रतिमा सद्गुणी, शिलवान, सदाचारी अशी दाखवण्यात आली नव्हती. तर रामाच्या हातात धनुष्य बाण दाखवण्यात आला होता. आणि हीच प्रतिमा प्रत्येकांच्या घराघरात पोहोचवली गेली. यामध्ये रामानंद सागर यांनी निर्मिती केलेल 'रामायण' मालिकेने मोठी भूमिका निभावली होती. त्याचप्रमाणे मागच्या दोन ते तीन वर्षापासून आक्रमक हनुमान आणि भयंकर महाकाल शिव यांचे स्टीकर खूप प्रचलित केले जात आहेत. राधा-कृष्णाचे प्रेम-लिलांच्या चित्रणांमुळे त्यांच्या योजनेत अडथळा येतो. त्यामुळे ते आशा चित्रणांचा विरोध करतात.
हिंदू धर्माच्या मर्यादा असुनही ज्या विशेष बाबी आहेत. त्यावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल इत्यादि संघटना नेहमी अडचणीत राहिल्या आहेत. जास्त दिवस नाही झाले बंगालमध्ये काली च्या ऐवजी फक्त राम फक्त बजरंगबली अशा घोषणा देण्यात आल्या होत्या.
या सगळ्या बाबींवरून असं दिसून येते की, या संघटना 'राष्ट्रवाद आणि संस्कृती' च्या नावावर युरोपीय वंशवादावर एक प्रकारे हिंदू समाज बनवायला पाहत आहेत.
जो नेहमी संकटात पडलेला असेल आणि नेहमी भयंकर बनलेला राहील. अशा मानसिक स्थितीत ध्रुवीकरण राजकीय असो सांप्रदायीक सोपे होऊन जाते. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात रामाची पूजा करत नाही. म्हणजे दुसऱ्या देवी-देवतांची पूजा करतो. तो खरा हिंदु आहे की नाही? असा सवाल उपस्थिती केला जाऊ शकतो. प्रत्येक देवी-देवतांचा भयंकर आणि आक्रमक रुपाचा प्रचार मोठ्या जोरा जोरात केला जाईल.
अशा या परिस्थिति मध्ये 'कामसुत्र' ग्रंथ बजरंग दलाकडून जाळणे. एक छोटीशी घटना आहे असे पाहिले जाऊ शकत नाही.
वरकरणी पाहता ही घटना महत्त्वपुर्ण दिसत नसली तरी असे होणे. हे हिंदू पूर्ण उज्ज्वल परंपरा गमावल्यासारखं आहे. हे हिंदुसाठी विडंबना आहे. आज हिंदू धर्माचे स्वंय सिध्द प्रतिनिधी हिंदू धर्मातील विविधतेला स्विकारत नाही. ही अत्यंत खेदाची बाब आहे. हिंदू धर्म या सर्व गोष्टी स्वीकारत चालला आहे.
जर असं नसतं तर बजरंग दलासारख्या अनेक कृत्यांचा विरोध हिंदू समाजामध्ये एकत्रपणे का केला जात नाही? यावरून असा निष्कर्श काढला जावा की, मागच्या शंभर ते दीडशे वर्षात पूर्ण भारतात किंवा विशेषत: उत्तर भारतात कोणतेच सामाजिक-सांस्कृतीक आंदोलन झालेले नाही. ज्यामुळे आपल्या परंपरा आणि वारसा सोबत घेऊन वैज्ञानिक विचारांच्या समाजाची निर्मिती केली जाईल.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल इत्यादी अनेक संघटनांकडून असे कृत्य हे राजकीय आणि सांप्रदीयक हेतुंसाठी केले जात असेल. पण, मुलत: हिंदू समाजाचा सांस्कृतीक पाया पोकळ होत चालला आहे. उद्याचे राजकारण बदलेल आणि अशा संघटनांचा जोर कमी होईल पण, तोपर्यंत जे सांस्कृतिक नुकसान होईल त्यातुन हिंदू समाज बाहेर कसा पडेल?
त्यामुळं या निमित्ताने हिंदू समाजाला आपल्या सांस्कृतीक नुकसानाची जाणीव नाही का? माहित नाही आज तुलसिदासांचे काय झाले असते जेव्हा ते 'रामचरितमानस' च्या शेवटी लिहितात की, 'कामी को जैसे नारी प्रिय होती है वैसे ही मुझे राम प्रिय है'?
योगेश प्रताप शेखर, लेखक दक्षिण बिहार केंद्रीय विश्वविद्यालयात हिंदी शिकवतात.
सदर लेख द वायर या ऑनलाईन आवृत्तीत प्रसिद्ध झाला आहे.
https://thewirehindi.com/184836/bajrang-dal-kamasutra-culture-mythology/