गोदी मीडियाने योगींना कसे फसवले? रवीश कुमार यांचे विश्लेषण

उत्तर प्रदेश निवडणुकीत गोदी मीडियाने केलेल्या वृत्तांकनावर चांगली टीका होते आहे. पण या गोदी मीडियामुळे योगी आदित्यनाथ कसे अडचणीत आले आहेत आणि अखिलेश यादव आता कव्हर पेजवर का झळकू लागले आहेत, याचे विश्लेषण केले आहे ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांनी...;

Update: 2022-02-25 06:35 GMT

"कव्हरेजमध्ये गायब झालेले विरोधक आता कव्हर पेजवर आले आहेत, अखिलेश सत्तेत येणार आहेत का?" असा खोचक सवाल उपस्थित करत ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांनी गोदी मीडियाचा समाचार घेतला आहे. त्यांनी आपल्या ब्लॉगमध्ये काय म्हटले आहे ते वाचा...

"विरोधक आता कव्हर पेजवर येऊ लागले आहेत. संपूर्ण निवडणुकी दरम्यान उत्तर प्रदेशमधील दोन वृत्तपत्रांच्या कव्हरेजचे निरीक्षण केल्यानंतर असे वाटले की समाजवादी पार्टीचे अखिलेश केवळ ५ जागांवरच लढत आहेत. गोदी मीडियाने अखिलेश यांना गायब केले होते. अखिलेश जर निवडणूक जिंकले तर त्यांनी ही वृत्तपत्र मागवून घ्यावी आणि नक्की वाचावी. त्यांच्या पक्षाला वृत्तपत्रांनी जागा द्यावी एवढे मोठे नेते ते नव्हते, तसेच मीडियाशिवायही निवडणूक जिंकता येते, हे देखील त्यांना ही वृत्तपत्र वाचल्यानंतर समजू शकेल. एवढेच नाही तर नवीन मुख्यमंत्र्यांमध्ये एकदा का हा आत्मविश्वास आला तर सरकारच्या पैशाने होणारे गोदी मीडियाचे लाड थांबतील आणि जनतेचा पैसा देखील वाचेल.

योगी जिंकले किंवा पराभूत झाले तरी गोदी मीडियाच्या अँकर्सनी हीन प्रश्न विचारुन जनतेच्या मनात आपली प्रतीमा मलीन केली, हा धडा योगींना मिळणार आहे. योगी यांना हा खेळ तेव्हा लक्षात आला नसेल, कारण त्यांना वाटले की गोदी मीडियाला चेक गेला म्हणून अँकर गोड गोड बोलत आहे. पण यामुळे मोदींपेक्षाही मोठा नेता बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या योगींची प्रतीम खराब झाली आहे. योगी यांची प्रतीमा छोटीच राहावी यासाठी योगींच्या मुलाखतीमधून काही ठोस निघणार नाही याची खबरदारी गोदी मीडियाच्या अँकर्सनी घेतली.




 


परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवायचे असतील तर काही कठीण प्रश्न सोडवावेच लागतात, केवळ अंदाचे टीक करुन सर्व गुण मिळत नाही, हे योगी यांना चांगलेत माहिती आहे. जर योगी जिंकले नाही तर त्यांना सगळ्यात आधी गोदी मीडियाच्या टीकेचा सामना करावा लागणार आहे. योगी यांचा पराभव हा मोदी-शाह जोडीचा मास्ट्रर स्ट्रोक असल्याचे तेव्हा गोदी मीडिया सांगू शकतो, एवढेच नाही तर मोदींनी आपल्या मार्गातील एक काटा बाजूला केला असेही सांगितले जाईल. ज्यांच्यापुढे इतके तुक़डे फेकले तोच गोदी मीडिया आपली टिंगल करत आहे आणि आपल्या पराभावमुळे पारडं बदलत आहे, यावर योगींना विश्वास ठेवणे कठीण जाईल.

आणि योगी जिंकलेच तर मग ते गोदी मीडियाबाबत आपल्या चुका कायम सुरूच ठेवतील. तरीही मुख्यमंत्री झाल्यानंतर योगी यांना एक गोष्ट तर नक्कीच लक्षात येईल की, त्यांच्या जाहिरातींचे काय झाले आणि कव्हरेजमधून गायब झालेले विरोधक कव्हर पेजवर कसे आले, अखिलेश येणार आहे का?"


Full View

Tags:    

Similar News