आठवडाभर फक्त दुपारी पाऊस पडणार: हवामान तज्ञ माणिकराव खुळे

Update: 2022-10-08 13:38 GMT

सध्या पावसाचे स्वरूप पाहून प्रत्येकाच्या मनात प्रश्न निर्माण होत असतील परंतु हा पाऊस दिवसागणिक वातावरण बदलणारा, व्यापक प्रणालीचा, व संपूर्ण महाराष्ट्रात दुपारनंतर पाऊस देणारा हा आठवडा असल्याचे विश्लेषण हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी केले आहे.

 १- संवहनी क्रियेद्वारे वीजा गडगडाटसह सध्य:काळात अपेक्षित असलेला परंतु तसे न होता, सर्वदूर व्यापक वातावरणीय प्रणालीतुन अल्पकाळ फळी धरून  मान्सूनच्या झडीसारखा,  शांत वारा, कमी वीजा व गडगडाटविना असे थोडेसे वेगळे स्वरूप घेऊन होणारा   पाऊस आजतरी कदाचित आठवडाभर(शुक्रवार १४ ऑक्टोबर पर्यन्त) देशाच्या इतर जवळपास ७०% भाग कव्हर करण्याबरोबरच महाराष्ट्रातही कोसळण्याची शक्यता जाणवते.  

खरीप-रब्बी हंगामजोडावरील रब्बीसाठीच्या तिसऱ्या आवर्तनातील हा पावसातील बदल महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फायदा-तोट्यासहित  मनाची तयारी करून स्वीकारावाच  लागेल, असे दिसते.


 



 २- काल तेलंगणा-विदर्भात दिसणारी चक्रीय वाऱ्याची स्थिती रात्रीतून आज नाशिक जिल्ह्यात जमिनीपासून साडेचार किमी. उंचीपर्यन्त दिसत आहे.

 ह्या चक्रीय वाऱ्याच्या मध्यातून दिड किमी ते तीन किमी उंचीवरील पट्ट्यातून नाशिक ते हरिद्वार, असा,  गुजरात राजस्थान हरियाणातून हरिद्वार पर्यन्त जाणारा हवेचा कमी दाबाचा पट्टा (आस)[Trough] हीच इतर प्रणाली बरोबरच मुख्य प्रणाली समजावी. दुपार नंतर हा आस नाशिकवरून गुजरातकडे व तेथून ईशान्य दिशेकडे वळण्याची शक्यट्स जाणवते.


 ३- ह्या सर्व बदलामुळे परतीचा पाऊस पुन्हा जागीच खिळलेला दिसत आहे.

परतीचा पाऊस उशिरा जाणे, ' ला -निना '  कदाचित २०२३ च्या मध्यापर्यंत टिकून राहणे, डिसेंबरनंतर निगेटिव्ह 'आयओडी ' तटस्थेकडे झुकणे, ह्या घटना कदाचित पुढील रब्बी हंगामात वातावरणीय बदल घडून आणु शकतात, असे दिसते. बघू या काय घडते ते!


 



४-चीन समुद्रातील ' नोरू ' चक्रीवादळाची बातमी मीडियात सध्याच्या पावसाशी  संबंध जोडून वाचण्यात आली. तसे असते तर नक्कीच माहीत पुढे आली असती. पण ' नोरू ' जेंव्हा त्याच्या तीव्रतेच्या उलट गणतीत असतांना जेंव्हा ते बं उपसागरात सरकत आले तेंव्हा आपल्याकडे बं उपसागरात अगोदरच  खालच्या थरातील असलेल्या चक्रीय वाऱ्याच्या  स्थितीत तेथे पण हवेच्या वरच्या स्थितीत समाविष्ट (merge) झाले. परंतु त्यामुळे विशेष असा काही फरक किंवा वाढ त्या प्रणालीत झालेला नाही, असे वाटते.

माणिकराव खुळे,

Meteorologist (Retd.), IMD Pune.

ह. मु. वडांगळी ता. सिन्नर, जि. नाशिक.

Tags:    

Similar News