Amartya Sen: नोबेल अर्थतज्ज्ञ!

आजवर भारतीयांना जे मोजकेच नोबेल पुरस्कार प्राप्त झाले, त्यापैकी अर्थशास्त्राचा हा पुरस्कार मिळवणारे डॉ. अमर्त्य सेन हे पहिले अर्थतज्ज्ञ. त्यांचा आज ८७ वा वाढदिवस. त्यानिमित्ताने ज्येष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत यांनी त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा...

Update: 2020-11-03 02:20 GMT

डॉ. सेन यांना 'कल्याणाभिमुख अर्थशास्त्र व सामाजिक पर्याय सिद्धान्त' या विषयांतील कार्यासाठी इ.स. १९९८ सालचे अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. नंतर त्यांचा 'भारतरत्न' देऊन गौरव करण्यात आला.

भारत सरकारने नालंदा विद्यापीठाच्या निर्मितीसाठी २००७ साली बनवलेल्या नालंदा मार्गदर्शक समूहाचे ते अध्यक्ष आहेत.

४० वर्षात ३० हून अधिक भाषांत अमर्त्य सेन यांची पुस्तके प्रकाशित झाली आहे. ते 'ऑक्सब्रिज कॉलेज'चे पहिले आशियाई प्रमुख आहेत.

माणिकगंज (आता बांगला देशात) येथे १९३३ मध्ये जन्मलेल्या अमर्त्य सेन यांचे सुरुवातीचे शिक्षण कोलकाता विद्यापीठात व नंतर इंग्लंडमध्ये ट्रिनिटी कॉलेजात झाले. तिथेच ते अध्यापनही करू लागले.

'कल्याणकारी अर्थव्यवस्था' हा त्यांचा अध्ययन व अध्यापनाचा विषय. पुढे त्यांनी केंब्रिज, ॲाक्सफर्ड, स्टॅनफर्ड, अशा अनेक विद्यापीठांत काम केले. आजही त्यांचे शिक्षकी पेशाचे काम चालूच आहे.

असे डॉ. सेन खऱ्या अर्थाने 'भारत रत्न' आहेत.

- भारतकुमार राऊत

Tags:    

Similar News