RO water म्हणजे काय रे भाऊ

पाणी म्हणजे जीवन. आपल्या शरीरातील ७०% भाग हा पाणी आहे. पाणी शुद्ध करण्यासाठी आजकाल प्रत्येक घरामध्ये आपणाला RO Water System लावलेली दिसते. टेलिव्हिजन वरती जाहिराती दाखवल्या जातात कि RO Water System पिण्याचे पाणी ९९. ९९% शुद्ध करते. तर चला आगोदर माहित करून घेऊया डॉ. मयुर गायकवाड यांच्याकडूनव RO म्हणजे काय?

Update: 2021-04-02 12:50 GMT

RO म्हणजे रिव्हर्स ऑस्मॉसिस. या प्रक्रियेमध्ये सॉल्ट, सेंद्रिय संयुगे, सूक्ष्मजीव, व्हायरस सारखी संयुगे काढून टाकण्यासाठी प्लास्टिकच्या मेंब्रेन मधून पाणी पाठवले जाते. हे मेंब्रेन साधारणतः तीन स्थरांचे बनलेले असते. पॉलिस्टर बेस, पॉली सल्फोन आणि पॉली अमाईड लेयर. अशा प्रकारच्या मेंब्रेन शीट एका ट्यूबच्या भोवती बसवल्या जातात. पाण्याच्या रेणूपेक्षा मोठे दूषित पदार्थ या मेंब्रेन मधून जाऊ शकत नाहीत.

परंतु आपल्या माहितीसाठी हे जाणून घ्या कि, पाण्यामध्ये फक्त अशुद्ध घटकच नसतात तर त्याबरोबर आपल्या शरीरासाठी अत्यावश्यक असे मिनरल्स असतात, उदाहरणार्थ कॅल्शिअम, मॅग्नेशिअम , फ्लोराईड, अर्सेनिक इत्यादी. कॅल्शिअम ची कमतरता असेल तर आपल्या शरीरात हाडांचे आजार होतात. विशेषतः लहान मुलांच्यामध्ये आपण पाहतो कि काही मुलांची हाडे खूप ठिसूळ असतात आणि लगेच मोडतात. मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे विविध न्यूरोलॉजिकल आजार तसेच, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग इ .होऊ शकतात. काही रिपोर्ट तर हे सांगतात कि, डीमिनारलाईज्ड पाणी पिण्यामुळे काही प्रकारचे कॅन्सर होऊ शकतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) म्हणण्यानुसार पिण्याच्या पाण्यामध्ये कॅल्शिअम ची मात्रा २० मिलिग्रॅम/लिटर एवढी असलीच पाहिजे. मॅग्नेशिअम १० मिलिग्रॅम/लिटर असलाच पाहिजे. पिण्याच्या पाण्याची शुद्धता TDS द्वारे निश्चित केली जाते. TDS (टोटल डिसॉल्व्हड सॉलिड्स) हे पाण्यामध्ये विरघळणारे सॉल्ट आणि संयुगे आहेत जे साध्या गाळण्याद्वारे काढले जाऊ शकत नाहीत.

१९४९ साली समुद्राचे पाणी शुद्ध करण्यासाठी युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया अँड फ्लोरिडा येथील शास्त्रज्ञांनी RO चा शोध लावला. कीटकनाशकांच्या वापरामुळे भूजल दूषित होते अशा ठिकाणी (उदाहरणार्थ पंजाब), वाळवंटी प्रदेशात जेथे मिठाचे प्रमाण जास्त आहे अशा ठिकाणी, औद्योगिक भागात जेथे योग्य प्रक्रिया न करता मैला सोडला जातो अशा ठिकाणी आरओ वॉटर प्युरिफायर्स विशेष प्रभावी आहेत. इस्राईल पूर्णपणे समुद्राने वेढलेले आहे आणि त्यांना सामान्य पाण्याचा स्त्रोत नाही म्हणून कमीतकमी पिण्यायोग्य पाणी तयार करण्याच्या उद्देशातून RO चा शोध लागला.

WHO च्या अहवालानुसार १५०-३०० मिलिग्रॅम/लिटर दरम्यान TDS असलेले पाणी पिण्यासाठी उत्कृष्ट आहे. ३००-९०० मिलिग्रॅम/लिटर दरम्यान TDS असलेले पाणी चांगले आहे. TDS ९००-१२०० मिलिग्रॅम/लिटर दरम्यान TDS असलेले पाणी ठीक आहे. १२०० मिलिग्रॅम/लिटर पेक्षा जास्त TDS असलेले पाणी अस्वीकार्य आहे. त्याचपद्धतीने १५० पेक्षा कमी TDS असलेले पाणी त्याच्या चवीमुळे अस्वीकार्य असू शकते. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (बीआयएस) स्वीकार्य म्हणून ५०० मिलिग्रॅम/लिटर TDS सांगतात. जर आपणास खराब आणि सांडपाणी मिश्रित पाणी मिळत असेल तर RO चा वापर आपल्यासाठी चांगला आहे , कारण त्यात बऱ्याच बॅक्टेरिया आणि विषाणू असतात ज्यामुळे रोगाचा प्रसार होतो. किंवा आपण RO मधून ९०० पेक्षा जास्त TDS असलेले खारट समुद्राचे पाणी फिल्टर करत असल्यास ते ठीक आहे. परंतु आम्ही काय करीत आहोत, तर RO द्वारे सामान्य नळाचे पाणी फिल्टर करत आहोत. पाण्यात असणारे मौल्यवान खनिजे कचरा करत आहोत. RO कंपनी त्यांचे प्रतिनिधी किंवा सेल्समन पाठवतात, ते आपल्या पाण्याचा TDS चेक करतात आणि RO च्या आवश्यकतेबद्दल आपणास माहिती देतात. कोणत्याही पद्धतीने ते तुम्हाला तुमच्या पाण्याचा TDS ९०० पेक्षा जास्त आहे आणि तुम्हाला RO ची तातडीने आवश्यकता आहे असे सांगतात.

दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे RO जवळपास ५०% पाणी वाया घालवतो. म्हणजे ज्यावेळेस RO मधून तुम्ही १०० लिटर पाणी फिल्टर करता, त्यावेळेस ५० लिटर शुद्ध पाणी मिळते आणि ५० लिटर वाया जाते. अशाप्रकारे पाणी वाया घालवणे हा एक मोठा गुन्हा आहे आणि हे पाणी आपल्या आरोग्यासाठी पण चांगले नाही. पाण्यात TDS पातळी ४०० मिलिग्रॅम/लिटर असेल अशा ठिकाणी आपण RO वॉटर प्युरिफायर बसवल्यास , RO शुद्धीकरण प्रक्रियेनंतर शुद्ध पाण्यात असलेले TDS ४० किंवा ५० मिलिग्रॅम/लिटर पर्यंत खाली जातात. हे TDS खूपच कमी आहे आणि असे पाणी पीएच मध्ये अम्लीय असते, चव खराब असते आणि दीर्घकाळ आरोग्यासाठी वाईट असते. आमच्या शरीरात ७०% पाणी असते, जर आपण ७०% अम्लीय पाणी घेत असू, तर आपण आपल्या मौल्यवान शरीराबरोबर खेळत आहोत. "शुद्ध" म्हणजे अशुद्धतेशिवाय, म्हणजेच खनिजे आणि पोषकद्रव्ये पाण्यापासून पूर्णपणे साफ केली जातात. हे "शुद्ध पाणी" धोकादायक आहे. जाहिरातीमध्ये कंपन्या पिण्यासाठी शुद्ध पाणी म्हणतात, पण पिण्यासाठी "आयडियल वॉटर" कधीच म्हणत नाहीत.

म्हणूनच पुरवठा केलेल्या पाण्यात एकूण विरघळणारे सॉलिड प्रति लिटर ५०० मिलीग्रामपेक्षा कमी असलेल्या भागात RO वॉटर प्युरीफायरवर बंदी घालणे ही चांगली कल्पना आहे. जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या चीन सहित ऑस्ट्रेलिया, बेल्जीयम, फिनलंड, जर्मनी, डेन्मार्क, स्वीडन, नॉर्वे, नेदरलँड, हंगेरी,जपान या सर्व देशांमध्ये आर ओ किंवा पाण्याचे फ्लोरिडेशन याच्यावर बंदी आहे. भारतीय पर्यावरण मंत्रालयाने फेब्रुवारी २०२० मध्ये ज्या ठिकाणी टीडीएस ५०० पेक्षा कमी आहे अशा सर्व ठिकाणी RO सिस्टिम बॅन करण्यासाठी अधिसूचना जरी केली आहे. जर RO नसेल तर मग कोणत्या प्रकारचे वॉटर प्युरिफायर वापरायचे?

जर आपल्या घराच्या पाणीपुरवठ्यात TDS ची संख्या ५०० मिलिग्रॅम/लिटर पेक्षा जास्त नसेल आणि आपण स्वयंचलित जल शुध्दीकरण प्रणाली शोधत असाल तर आपण यूव्ही वॉटर प्युरिफायर वापरू शकता. यूव्ही फिल्टरेशन म्हणून ओळखली जाणारी आणखी एक गाळण्याची प्रक्रिया आहे ज्यात पाणी अतिनील किरणांमधून जाते. परंतु अतिनील किरण क्लोरीन आणि आर्सेनिक साफ करत नाहीत आणि यामुळे ते बॅक्टेरियांना काढून टाकत नाहीत, ते फक्त बॅक्टेरियांना ठार मारतात आणि परिणामी जेव्हा तुम्ही असे पाणी पिता तेव्हा मृत जीवाणू तुमच्या शरीरात जातात.

शुद्ध पाणी कसे बनवायचे?

नळाचे साधे पाणी घ्या आणि ते २० मिनिटे उकळून थंड करा. एकदा ते थंड झाल्यावर ते मातीच्या भांड्यात (मडक्यामध्ये) ठेवा. मडक्याचे एक वैशिष्ट्य आहे, जर पाण्यात जास्त TDS असतील तर मडके जास्तीचे TDS शोषून घेईल आणि जर TDS कमी असेल तर ते पाण्याचे TDS वाढवते. जर आपल्याकडचे पाणी खूपच खराब आहे आणि RO लावल्याशिवाय आपल्याकडे पर्यायच नाही तर मग काय करायचे? तर RO चे कमी TDS असलेले पाणी मडक्यात ठेवा, आपोआप TDS लेवल ठीक होऊन जाईल. दुसरी समस्या म्हणजे ऍसिडिक स्वरूपाचे पाणी RO मधून येते तर त्यासाठी उपाय सांगितलं गेला आहे कि त्यामध्ये लिंबाच्या फोडी, तुलसी आणि पुदिन्याची पाने टाकून ठेवली तर मिनरल्स ची कमतरता आपोआप भरून निघेल.

RO चा बिसनेस करून लोकांच्या जीवाशी खेळून अनेक कंपन्या कोट्यवधी रुपये कमवत आहेत. आम्ही अशाच एका RO तयार करणाऱ्या कंपनीशी संवाद साधला असता ते म्हणाले कि लोकांचा हट्टच असतो कि RO आपण लावलाच पाहिजे. वास्तविक पाहता आपल्या इकडच्या पाण्याचा TDS हा नॉर्मल आहे. साधं नळाचं पाणी सुद्धा आपण उकळून फिल्टर करून पिऊ शकतो. लोकांना एवढच आवाहन असेल कि आपलं लाख मोलाचं शरीर RO च ऍसिड पिऊन बरबाद करू नका. health is wealth म्हणजे शरीर हीच खरी संपत्ती असं आपण म्हणतो. आणि या संपत्ती वर RO वाले दरोडेखोर डोळा ठेवून आहेत. तेव्हा सावध राहूया आणि सावधानतेने पाणी पिऊया. RO विकत घेण्यासाठी तुम्हाला कमीत कमी १० ते १२ हजार रुपये खर्च करावे लागतील, त्याऐवजी तुम्ही TDS मीटर खरेदी करा कि जे १०० तर १५० रुपयांपर्यंत मिळते. तुम्ही स्वतः आपल्या घरातील पाण्याचा TDS चेक करा. जोपर्यंत TDS ९०० पेक्षा जास्त होत नाही , तोपर्यंत कधीही आपल्या घरात RO बसवू नका.


Tags:    

Similar News