प्रमाण भाषा म्हणजे काय रे भाऊ?

“प्रमाण भाषा” ही संज्ञा कोणी निर्माण केली? प्रमाण भाषा नेमकी कोणत्या गटाची भाषा मानायची आणि का? वाचा संजय सोनवणी यांचा लेख;

Update: 2020-10-23 03:17 GMT

जोवर अर्थाला बाध येत नाही आणि सांगण्याचा मुद्दा सहज पोहोचतो. त्या भाषेतील व्याकरण कसेही असले तरी ती प्रत्येक बोलीभाषा ही प्रमाण भाषा असते.

प्रत्येक भाषा आपल्या उपभाषा अथवा बोलीभाषांसहित प्रमाणभाषाच असते. "प्रमाण" ती भाषा बोलणारे निर्माण करतात, कोणा एकाच बोलीभाषेचे व्याकरण लिहून तिलाच प्रमाणभाषा मानत इतरांवर थोपवणारे भाषेचे अतोनात नुकसान करत असतात.

प्रमाण भाषांना चिरकालीत्व असते. असे म्हणना-यांना समजायला हवे की तसे असते. तर वेळोवेळी कालनिहाय वेगवेगळी व्याकरणं लिहिली गेली नसती.

भाषा काळानुसार त्या त्या भूप्रदेशात राहणा-या लोकांच्या गरजेप्रमाणे सहजगत्या सावकाश बदलत जाते. व्याकरण नंतर येते. कोणतीही एक बोलीभाषा प्रमाण मानता येत नाही. तो भाषांवरचा घोर अन्याय असतो. भाषा यामुळे वाढत नसतात तर आकुंचित होत जातात. प्रमाणभाषांचे स्तोम माजवणा-यांनी हे लक्षात घेतले पाहिजे.

(संजय सोनवणी यांच्या फेसबुक भिंतीवरून)

Similar News