राज्यपालांचे जाहीर आभार…!

सांस्कृतिक फॅसिझम म्हणजे काय? इटली वा जर्मनीतील फॅसिझमपेक्षा सांस्कृतिक फॅसिझम वेगळा आहे का? केवळ जातीपातीचा वा सत्तेतील सहभागाचा मुद्दा म्हणून संघ-भाजप परिवाराच्या सांस्कृतिक फॅसिझम आहे का? राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या पत्राच्या निमित्ताने सुनिल तांबे यांचा लेख...;

Update: 2020-10-14 09:10 GMT

भारतीय स्वातंत्र्यलढ्याची मूल्यं


१. लोकशाही
२. सर्वधर्मसमभाव वा सेक्युलॅरिझम
३. विविधता
४. सामाजिक न्याय
५. गरीबांचा, वंचितांचा विकास

महाराष्ट्राच्या राज्यपालांनी आपण या मूल्यांची कदर राखत नाही. ही बाब मुख्यमंत्र्यांना लिहीलेल्या पत्रात जाहीर केली, त्याबद्दल त्यांना धन्यवाद. कारण संघ-भाजप परिवाराला भारतीय स्वातंत्र्यलढा, त्यातून निर्माण झालेली मूल्यं आणि भारतीय राज्यघटना याबद्दल किंचितही आस्था नाही. mभाऊ तोरसेकर, अर्णब गोस्वामी यांच्यासारखे पत्रकार हीच विचारधारा मांडत असतात.

सांस्कृतिक फॅसिझम इटली वा जर्मनीतील फॅसिझमपेक्षा वेगळा आहे. तिथे फॅसिझमचं रुप मूलतः राजकीय होतं. त्यामुळे फॅसिस्ट आणि नाझी पार्टींच्या पराभवानंतर म्हणजे दुसर्‍या महायुद्धानंतर युरोपातील फॅसिस्ट विचारधारा कमजोर झाली. सांस्कृतिक फॅसिझम म्हणजे भारतीय स्वाातंत्र्यलढा आणि राज्यघटना यामधील मूल्यांना उद्ध्वस्त करणं, ठराविक हिंदू देवदेवतांचं स्तोम माजवणं, हिंदूंच्या काल्पनिक भूतकाळाचा गौरव करणं, गोमांस भक्षक व संघ-भाजप परिवाराच्या विरोधकांना अराष्ट्रीय वा शत्रू ठरवणं, त्यांचे झुंडबळी घेणं वा त्यांच्यामागे विविध तपासयंत्रणांचा ससेमिरा लावणं, न्यायपालिकेला आपल्या अंकीत करणं.

केवळ जातीपातीचा वा सत्तेतील सहभागाचा मुद्दा म्हणून संघ-भाजप परिवाराच्या सांस्कृतिक फॅसिझमकडे दुर्लक्ष करणार्‍य़ा सर्व नेत्यांनी, संघटनांनी, जात समूहांनी आणि मतदारांनी शहाणं होण्याची गरज राज्यपालांनी अधोरेखित केली आहे. त्याबद्दल त्यांचे पुन्हा एकदा आभार.

(सुनील तांबे यांच्या फेसबुक भिंतीवरून)

Tags:    

Similar News