The Accidental Prime Minister : पंतप्रधान पदाची गरिमा कोण भरुण काढणार?

Update: 2019-01-11 16:23 GMT

मनमोहन सिंह यांच्या जीवनावर आधारित चित्रपट “द एक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर” आज प्रसारीत झाला. खरं तर हा चित्रपट या चित्रपटाच्या ट्रेलरनंतर मोठ्या चर्चेत आला होता. त्यातच हा चित्रपट मनमोहन सिंह आणि गांधी परिवार यांच्या संबंधीत असल्याने चांगलाच चर्चेत आला. खरं तर या चित्रपटाला काँग्रेसने ट्रेलरनंतर विरोध दर्शवला होता. काँग्रेसच्या म्हणण्यानुसार हा चित्रपट निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसची जनमानसात छबी बिघडवण्यासाठी आणला जात आहे. यामुळे काँग्रेस आणि भाजप या दोनही पक्षामध्ये शाब्दीक चकमक जरुर झाली. मात्र, कॉंग्रेस चित्रपट प्रदर्शित होण्यापासून रोखू शकलं नाही.

मनमोहन सिंह यांचे मीडिया सल्लागार म्हणून काम पाहिलेले संजय बारू यांच्या पुस्तकावर आधारित “द एक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर” या चित्रपटामध्ये मनमोहन सिंह यांची भूमिका अभिनेता अनुपम खेर यांनी केली आहे. तर संजय बारू यांची भूमिका अक्षय खन्ना ने केली आहे. मनमोहन सिंह आजपर्यंत देशातील उच्चशिक्षित आणि शांत स्वभावाचे पंतप्रधान म्हणून त्यांची ओळख आहे. वास्तविक चित्रपट पाहण्याची उत्सुकता असते ती सुरुवातीला. मात्र हा चित्रपट सुरुवातीलाच निराश करतो. कारण अनुपम खेर जेव्हा मनमोहन सिंह यांची भूमिका करतात तेव्हा ते मनमोहन सिंह यांचा अभिनय करताना वाटत नसून प्रयत्नपुर्वक मनमोहन सिंह यांची मिमिक्री करत आहे. चित्रपट पाहिल्यांनंतर खरंच असं वाटतंय की त्यांच्या व्यक्ती रेखेची चेष्टा केलेली आहे. मनमोहन सिंह यांची देहबोली फनी नसून चित्रपटाचे दिग्दर्शक आणि अनुपम खेर यांनी खूप प्रयत्न करुन मनमोहन सिंह यांना चित्रपटामध्ये फनी दाखवलं आहे.

काँग्रेस पार्टीचा दबाव मनमोहन सिंह यांच्यावर जरुर होता, मात्र ते जेव्हा प्रधानमंत्री होते. तेव्हा सुद्धा त्यांनी स्वतः कधी निर्णय घेतले नाही असं जरी आपण म्हटलं तरी अनुपम खेर यांनी चित्रपटामध्ये अधिकच चेष्टा केली आहे. कारण मनमोहन सिंह विनम्र शांत स्वभावाचे आहेत. हे खरं असलं तरी विनम्र, शांत, स्वभाव असलेला व्यक्ती आणि कार्टून यामध्ये फरक असतो. मात्र, या चित्रपटात मनमोहन सिंह यांचा विनम्र स्वभाव फनी अभिनयामध्ये दर्शवला आहे.

निवडणूकपूर्वी या चित्रपटामुळे काँग्रेस आणि भाजपला जरी एक मुद्दा मिळाला असला तरी देशाचे माजी पंतप्रधानांच्या गरिमेला ज्या पद्धतीने मांडण्यात आलं आहे. याची नुकसान भरपाई कॉंग्रेस आणि भाजप दोनही पक्ष कधीच करु शकत नाही.

चित्रपटाची कहाणी गोंधळात टाकणारी आहे. एका बाजूने असं दाखवलं आहे की, मनमोहन सिंह काँग्रेसचे कठपुतली आहेत. तर दुसऱ्या बाजूला मनमोहन सिंह स्वतःचे निर्णय स्वतः घेत असून काहीवेळा पत्रकार परिषदा पण ते घेत असल्याचा दाखवलं आहे. विदेशी दौऱ्यावर देखील जात आहेत.

चला तर आत्ता चर्चा करूया फिल्म का पाहावी? कारण चित्रपट पाहण्यासाठी एक उद्देश असतो. मात्र, चित्रपटाच्या दिग्दर्शकाने मसाला बनवण्यासाठी जास्तच नाट्य रूपांतर केलेलं आहे. चित्रपटामध्ये अनुपम खेर अभिनेता दिसत नसून मिमिक्री आर्टिस्ट जास्त दिसत आहे. आणि वेळोवेळी संजय बारू यांचा कहाणी सांगणार रोल प्रेक्षकांना कंटाळवाणा वाटत आहे. सोनिया गांधी यांचा अभिनय करण्याचा प्रयत्न अभिनेत्री सुज़ैन बर्नर्टने केला आहे. मात्र, त्यांना त्यांच्या भूमिकेला न्याय देता आलेला नाही.

जर विचार केला तर हा चित्रपट संजय बारू यांना प्रमोट करण्याच्या उद्देशाने केला आहे की, येणाऱ्या निवडणूकीचा विचार करून प्रदर्शित केली आहे. ठीक आहे… जर तुमच्याजवळ जरुरीपेशा जास्त पैसे असतील तर ते बर्बाद करण्यासाठी तुम्ही हा चित्रपट पाहायला हवा. अनुपम खेर स्टार ही डोक्यूमेंट्री फिल्म पाहिल्यानंतर असं वाटेल की तुम्ही आपला वेळ आणि पैसा फुकट घालवला आहे. त्यामुळे मी या चित्रपटास एक स्टार देते. ते पण या चित्रपटाच्या दिग्दर्शाकाला नसून फक्त अक्षय खन्नाच्या शानदार अभिनयाला देते. खूप काळानंतर अक्षय खन्ना संजय बारू यांच्या रोलमध्ये खूप दमदार अभिनय करताना दिसत आहे.

Similar News