रजत शर्मा –अरुण जेटली आणि सुरस कथा

एखाद्या माणसाचा अचानक झालेला उदय आणि त्याच्या प्रगतीचा रॉकेटच्या वेगाने वर जाणारा आलेख पाहिला तर त्यामागे बरच काही दडलेलं असत इंडिया टीव्ही चे संपादक रजत शर्मा आणि दिवंगत माजी मंत्री अरुण जेटली आणि सुरस कथांवर प्रकाश टाकला आहे आनंद शितोळे यांनी...

Update: 2020-12-27 04:38 GMT

२००५ च्या शेवटच्या काळात मुंबईत भारतीय जनता पक्षाच २५ व अधिवेशन भरलेलं होत.

ह्या अधिवेशनाला पार्श्वभूमी होती मागच्या वर्षी गमावलेली केंद्रातली सत्ता ,सोबतच बिहार-हरियाणा-झारखंड मध्ये विधानसभा निवडणुकीत खालावलेली कामगिरी आणि लालकृष्ण अडवाणी जीनांच्या कबरीसमोर जाऊन आल्यावर उठलेल वादंग.

अडवाणी-वाजपेयी जोडीचा अस्त सुरु झाल्याची जणू चाहूल लागलेली होती.

त्या काळात संघाचे पूर्णवेळ प्रचारक आणि भाजपचे राष्ट्रीय सचिव असलेले संजय जोशी ऐनभरात होते.गुजरातचे प्रभारी म्हणून गाजत असताना त्यांची साधी राहणी, रेल्वेत प्रवास आणि इतर कथा मीडियात येत असत.

मात्र तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि संजय जोशी ह्यांच पटत नव्हत.

ह्या अधिवेशनापूर्वी काही महिने मीडियात एक ध्वनिफीत जाणीवपूर्वक पसरवली गेली ज्यामध्ये संजय जोशींच्या एका महिलेशी असलेल्या संबंधाबद्दल माहिती होती.सोबतच त्या महिलेची शोषणाचे आरोप करणारी पत्र व्हायरल झाली.

२००५ च्या मिटींगच्या दिवशी संजय जोशींच्या सीडी अधिवेशनस्थळी वाटण्यात आल्या ,तत्पूर्वी त्या भाजप पदाधिकार्यांना पोहोचल्या होत्या.मिडीयामध्ये हंगामा स्वाभाविक होता.भाजपशी जवळीक असलेल्या एका वाहिनीने " जोशींनी राजीनामा द्यावा अन्यथा आम्ही सीडी टीव्हीवर दाखवू " अशी धमकी दिली.

जोशींनी राजीनामा दिला.

त्यानंतर प्रमोद महाजनांनी अनौपचारिक बोलण्यात त्या वाहिनीचे नाव पत्रकारांना सांगितले " इंडिया टीव्ही "

पुढे यथावकाश सीडी आणि एकूणच सगळ प्रकरण कुम्भान्ड असल्याच सिद्ध झाल मात्र जोशींच्या कारकीर्दीचा बळी गेलाच.

भाग दुसरा

१२ नोव्हेंबर २०१६ ला इंडिया टीव्ही च्या आपकी अदालत मध्ये अर्थमंत्री अरुण जेटली आलेले आणि त्यांनी नोटाबंदीच दणक्यात समर्थन केल.ह्या शोला टाइम्स नाऊ च्या १६९ पट जास्त प्रेक्षक लाभले आणि इंडिया टीव्ही प्रेक्षक संख्येत दुसऱ्या क्रमांकावर जाऊन पोहोचला.पहिल्या क्रमांकावर आजतक होत.

रजत शर्मा सांगतात त्यावरून त्यांनी सुरुवातीला गरिबीत दिवस काढले, आईवडील आणि सात भावंडे कधीकधी दिवसभर उपाशी राहात.त्यांना अमेरिकन दुधाच्या भुकटीच्या रांगेत उभ राहील तरच काहीतरी पोटाला मिळायचं.

लहानपणी दुसऱ्याच्या घरातला टीव्ही पाहता आला नाही म्हणून रडत घरी आलेल्या रजत शर्माना वडिलांनी सांगितल , " लोकाच्या घरात टीव्ही पाहण्यापेक्षा दम असेल तर अस काहीतरी कर कि स्वतः टीव्हीवर तुला लोकांनी पहाव "

१९८६ सालच्या आसपास दिल्लीत पत्रकारिता सुरु केली.

प्रीतीश नंदी सोबत लंडनमध्ये चंद्रास्वामी ची मुलाखत घेऊन छापली.

१९९१ मध्ये 'झी' समुहाचे सुभाषचंद्र ह्यांना शर्मा जाऊन भेटले आणि आपकी अदालत ची संकल्पना मांडली.मात्र त्याला मूर्त रूप यायला १४ मार्च १९९३ उजाडल,त्यादिवशी बिहारचे मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव पहिले पाहुणे म्हणून आलेले.

सोबतच झी न्यूजने न्यूज बुलेटीन सुरु केले ज्यामध्ये नंतर स्मृती इराणी,विनोद दुवा,प्रीतीश नंदी,उदय शंकर,सुधीर चौधरी आधी लोक जोडले गेलेले.

आपकी अदालत हिट झालेला असताना वादातून तडकाफडकी ३ जानेवारी १९९७ ला झी टीव्ही सोडून शर्मा बाहेर पडले.

रितू धवन ज्यापुढे शर्मांच्या पत्नी झाल्या त्यांच्या सोबत त्यांनी " इंडिपेंडंट न्यूज सर्व्हिस " कंपनी सुरु केली.

रजत शर्मा स्वतःची वाहिनी चालवत असतानाच दूरदर्शन साठी निर्माता म्हणून काम करत होते.

१९९९ला वाजपेयी पुन्हा सत्तेत आले.त्यांच्या मानलेल्या कन्या नमिता कौल आणि जावई रंजन भट्टाचार्य रजत शर्मांचे कॉलेजच्या काळातले मित्र.तेव्हा रजत शर्मा प्रधानमंत्री कुटुंबाच्या अतिशय जवळचे म्हणून ओळखले जात होते.

कांशीराम यांच्या बसप आणि भाजपच्या युतीमध्ये रजत शर्मा महत्वाच्या भूमिकेत होते.

अर्थमंत्र्यांचे सल्लागार मोहन गुरुस्वामी जेव्हा राजीनामा देऊन बाहेर पडून सरकारवर आरोप करू लागले तेव्हा प्रकरण शमवण्यासाठी रजत शर्मा महत्वाची व्यक्ती होते.

२००४ मध्ये रजत शर्मांनी नोइडा मधल्या फिल्म सिटीत ८०००० वर्गफूटाचा आशियातला सगळ्यात मोठा स्टुडीओ उभारला जिथे आपकी अदालत च शुटींग होत असतय.

२०१३ नंतर खुलेपणाने इंडिया टीव्ही मोदींना अनुकूल भूमिकेत समोर आला.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदिनी फक्त दोन वाहिन्यांना मुलाखत दिली पैकी एक इंडिया टीव्ही होत.

वाराणसी मधून मोदी निवडणूक लढवणार हि बातमी काही महिने आधी इंडिया टीव्हीने सगळ्यात आधी दिलेली.

२००० मध्ये मोदी गुजरातमध्ये असताना इंडिया टीव्ही च्या कार्यालयात नियमित येत असत.

२००२ च्या गुजरात दंगलीबद्दल मोदींना प्रश्न न विचारणारे मोजके पत्रकार होते ज्यामध्ये रजत शर्मा होते.नंतर मोदी मुख्यमंत्री झाल्यावर शपथविधी समारंभात स्टेजवर निमंत्रित पाहुणे म्हणून रजत शर्मा बसलेले होते.

भाग तिसरा

रजत शर्मा - अरुण जेटली १९७० पासून अभाविपच्या कामात सक्रीय होते.श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्स मध्ये शिकत असताना जेटलीनी रजत शर्माची फी भरायला मदत केलेली.

आणीबाणीच्या आंदोलनात जेटली-शर्मा एकत्र होते आणि एकत्र तुरुंगात गेलेले.सुटून आल्यावर एमए अर्थशास्त्र करायला दिल्ली विद्यापीठात प्रवेश घेतला आणि तिथे विद्यार्थी संघाचे सचिव म्हणून निवडून आलेले.

१९९८ मध्ये भाजप सत्तेवर आल्यावर अरुण जेटली माहिती आणि प्रसारण मंत्री झाले त्यावेळी कुलदीप नय्यर जे पत्रकार आहेत आणि तेव्हा राज्यसभा सदस्य होते त्यांनी दूरदर्शन खाजगी निर्मात्यांना किती पैसे देतय त्याचे तपशील मागविले.अमिताभला केबीसी साठी मिळणाऱ्या पैशापेक्षा जास्त पैसे रजत शर्माना मिळत होते.महिन्याला ५५ लाख रुपये.तेही दूरदर्शन ची सगळी साधनसामग्री वापरून.

२०१५ साली रजत शर्माना पद्मभूषण मिळाल त्याची शिफारस अरुण जेटलीनी केलेली.

भाग चौथा

इंडिया टीव्ही सुरुवातीला तोट्यात होता मात्र २०१० मध्ये १.२० कोटी नफा, २०१४ मध्ये ११ कोटी नफा आणि २०१५ मध्ये २० कोटी नफा सोबत १४१ कोटी मूल्य अशी भरभराट झाली.

२००५ मध्ये इंडिपेंडंट न्यूज सर्व्हिस ( आयएनएस ) चे १६.४ टक्के शेअर्स ६.८ कोटी रुपयांना आदित्य कॉरपेक्स ने विकत घेतले.हि कंपनी अदानी समूहाशी संबंधित आहे.

२००७ मध्ये सीव्ही ग्लोबल होल्डिंग्ज कंपनीने ४५ कोटी रुपयांना २० टक्के शेअर्स खरेदी केले.

भारतात न्यूज वाहिन्या मध्ये गुंतवणूक करायला परदेशी कंपनीला सेबी कडे नोंदणी अनिवार्य असते.अश्या नोंदणी केलेल्या कंपन्या १५४ आहेत पैकी १४९ मॉरिशस मधल्या आहेत.ह्यापैकी ४६ कंपन्या एकाच पत्त्यावर एकाच फोन नंबरवर नोंदलेल्या आहेत ज्यामध्ये सीव्ही ग्लोबल एक आहे.

२००७ मध्ये श्याम इक्विटी कंपनीने २३ टक्के शेअर्स १०० कोटी रुपयांना खरेदी केलेत. श्याम इक्विटी ची संपूर्ण मालकी Tally Solutions कडे आहे जिचे संचालक मनोज मोदी आणि आनंद जैन आहेत जे मुकेश अंबानींचे व्यवसायिक सहयोगी आहेत.

२०१२ मध्ये श्याम इक्विटी चे सगळे शेअर्स इन्फोटेल कंपनीने खरेदी केले फक्त १२.५ कोटी रुपयात म्हणजे ८७.५ कोटी रुपये तोटा सोसून.ह्या इन्फोटेल चे मालक महेंद्र नाहटा आहेत जे मुकेश अंबानीच्या वर्तुळातले ओळखले जातात. त्यांची सीबीआयने टूजी घोटाळ्यात चौकशी केलेली.

' कांरवा ' च्या एक डिसेम्बर २०१६ च्या लेखातल्या काही मुद्द्यांचा अनुवाद आहे.

संपूर्ण लेखाची लिंक कॉमेंट मध्ये आहे.

https://caravanmagazine.in/reportage/man-studio-rajat-sharma-india-tv/2

https://caravanmagazine.in/reportage/man-studio-rajat-sharma-india-tv

Similar News