देशाच्या स्वातंत्र्यासाठी महात्मा गांधींनी मिठाचा सत्याग्रह केला त्याचप्रमाणे अस्पृश्य समाजाला पाण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी२० मार्च १९२७ रोजी महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह केला. या सत्याग्रहात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना सवर्ण समाजातील काही लोकांनी पाठिंबा दिला. चवदार तळ्याच्या सत्याग्रहाबाबत डॉ. हरिश अहिरे यांनी मॅक्समहाराष्ट्रशी बातचीत केली ते सांगतात की, आरोग्याच्या दृष्टीकोनातून पाणी अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर समाजाच्या आरोग्यासाठी समता, बंधुभाव, स्वतंत्रता हे मूल्ये महत्त्वाची असल्याचं ओळखून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पाण्याचा सत्याग्रह केला.
जगभरात पाण्यासाठी डॉ. आंबेडकरांनी केलेला सत्याग्रह अजरामर झाला. या ऐतिहासिक घटनेमुळे अस्पृश्य समाजाला स्वाभिमानं जगण्याचा अधिकार मिळाला. त्याचबरोबर पाण्यासाठी एखाद्या समाजाला कशाप्रकारे एका विशिष्ट समाजाने दूर ठेवले याची जाणीव या घटनेने जगाला करून दिली. पाहा हा व्हिडिओ