ठाकरी'भाषेचं कौतुक करणारे दुटप्पी एका महिलेला ट्रोल करताहेत – राजू परुळेकर
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जाते. आता पुन्हा एकदा एका ट्विटमुळे अमृता फडणवीस यांना ट्रोल करण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या ट्रोलिंगवरुन ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्यांचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यांनी आपल्य़ा ट्विटमध्ये याबाबत आपले मत मांडले आहे.
" काल @fadnavis_amruta यांनी एक ट्वीट केलं नि डिलिट केलं. त्याबद्दल काही 'सोवळे' लोक त्यांचा निषेध करताहेत. त्यांनी ते ट्वीट डिलिट करायला नको होतं. त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने कुणी का लिहिलं नाही? नि भाषेच्या सोवळेपणाबद्दल म्हणाल तर…
आपले संयमी व सुसंस्कृत मुख्यमंत्री मा. उद्धवजींचे वडिल मा. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कित्येक भाषणात अनेक राजकीय,विदुषी स्त्रियांबाबत(ऊदा. पुष्पा भावे) अत्यंत शिवराळ भाषणं केलेली आहेत. याच लोकांनी 'ठाकरी भाषा'म्हणून तेव्हा त्या असभ्य "अभिव्यक्तीचं"कौतुक केलेलं आहे. फॅसिझम विरोधतला स्वातंत्र्याचा लढा असा Selective होऊ शकत नाही.अमृता फडणवीस या महिला आहेत म्हणून त्यांना Soft target बनवलं गेलं.यापुढे त्यांनीही स्वतःच्या अभिव्यक्तीवर खंबीर रहायला हवं. 'ठाकरी'भाषेचं कौतुक करणारे दुटप्पी एका महिलेला असं ट्रोल करताहेत. यासाठी आपला लढा नाहीये." असे आवाहन त्यांनी आपल्या ट्विटमध्ये केले आहे.
Thread 🧵👇
— Raju Parulekar (@rajuparulekar) April 24, 2022
काल @fadnavis_amruta यांनी एक ट्वीट केलं नि डिलिट केलं.त्याबद्दल काही 'सोवळे' लोक त्यांचा निषेध करताहेत. त्यांनी ते ट्वीट डिलिट करायला नको होतं. त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने कुणी का लिहिलं नाही? नि भाषेच्या सोवळेपणाबद्दल म्हणाल तर…1/3
अमृता फडणवीस यांनी काय ट्विट केले होते?
शनिवारी रात्री अमृता फडणवीस यांनी एक ट्विट केले होते, त्यामध्ये "उध्वस्त ठरकीने कुठे नेऊन ठेवला आहे आमचा महाराष्ट्र?" असे एका ओळीचे ट्विट केले होते. त्यानंतर अमृता फडणवीस यांच्यावर टीकाही काहींनी केली होती.