सावरकरांनी किती वेळा आणि केव्हा इंग्रजांची माफी मागितली?
सावरकरांनी इंग्रजांची किती आणि केव्हा माफी मागितली. हे तुम्हाला माहिती आहे का? सावरकर यांनी फक्त इंग्रजांची नाही तर मुंबई पोलिसांची देखील माफी मागितली होती. जाणून घेण्यासाठी नक्की वाचा ज्येष्ठ पत्रकार सुनिल तांबे यांनी दिलेली महत्त्वपूर्ण माहिती;
राजनाथ सिंह यांनी सावरकर यांनी गांधीजींच्या सांगण्यावरुन इंग्रजांची माफी मागितली. असं विधान नुकतंच केलं आहे. त्यामुळे सध्या नवा वाद निर्माण झाला आहे. मात्र, सावरकरांनी इंग्रजांची किती वेळा माफी मागितली. तुम्हाला माहिती आहे का? सावरकर यांनी फक्त इंग्रजांचीच नाही तर मुंबई पोलिसांची देखील माफी मागितली होती. वाचा सुनिल तांबे यांनी केलेले विश्लेषण
१. ४ जुलै १९११ रोजी तात्याराव सावरकरांना पोर्ट ब्लेअरच्या सेल्युलर जेलमध्ये डांबण्यात आलं. सहा महिन्यात त्यांनी माफीनामा लिहून दिला.
२. दुसरं माफीचं पत्र सावरकरांनी १४ नोव्हेंबर १९१३ रोजी लिहीलं. त्यात त्यांनी म्हटलं आहे... "I am ready to serve the Government in any capacity they like... .
३. मार्च २२, १९२० रोजी सावरकरांच्या समर्थकांनी कायदेमंडळात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, सरकारतर्फे अशी माहिती देण्यात आली की सावरकरांकडून दोन माफीनामे सरकारला प्राप्त झाले आहेत. १९१४ आणि १९१७ साली. त्याचा तपशीलही पटलावर ठेवण्यात आला.
४. १९३० साली लिहीलेत्या माफीनाम्यात सावरकर म्हणतात--- "I and my brother are perfectly willing to give a pledge of not participating in politics for a definite and reasonable period that the Government would indicate...
५. गांधी हत्या प्रकरणी अटक झाल्यावर सावरकरांनी फेब्रुवारी २२, १९४८ रोजी मुंबई पोलीस आयुक्तांना माफीनामा लिहून दिला. त्यात ते म्हणतात-- "I shall refrain from taking part in any communal or political public activity for any period the Government may require."
६. १३ जुलै १९५० रोजी, मुंबई हायकोर्टाला दिलेल्या पत्रात सावरकर लिहीतात-- "... would not take any part whatever in political activity and would remain in my house in Bombay" for a year. हिंदू महासभेच्या अध्यक्षपदाचाही राजीनामा त्यांनी दिला.
सुनील तांबे, ज्येष्ठ पत्रकार