मुंबईत "मास्कच्या " नावाने लूट अन् ढिसाळ सरकारी यंत्रणा ..

सावधान ! जर आपण मुंबईतील रस्त्यांवरून नियमित प्रवास करत असाल तर हि बातमी वाचायलाच हवी.अन्यथा आपलीही होऊ शकते लूट.

Update: 2021-09-26 02:47 GMT

मागील आठवड्यात यंग फाऊंडेशनच्या कामानिमित्त मुंबईत गेलो होतो. कोविडकाळात मास्क घातला नाही तर दंड घेण्याचे प्रमाण मुंबईत जास्त आहे . जवळपास मुंबईत सर्वच नागरीक जवळ मास्क ठेवतात .मी कुर्ला येथून ओला कँबने दादरकडे जात असतांना ,एक्सप्रेस वे वर एका सिग्नल जवळ गाडी थांबली तशी एक व्यक्ती गाडीजवळ आला,काचेबाहेरून फोटो घेत म्हणाला ," तुमचा मास्क नाकाखाली आला,दंड भरा ! " मी म्हटलो ,"गाडीत दोन लोक आहोत व माझ्या चेहर्यावर मास्क आहे ", तो गाडीचा दरवाजा उघडत पुढील शीटवर बसला व म्हणाला की ,तुम्हांला दंड भरावाच लागेल ,तेवढ्यात कँबचा ड्रायव्हरही म्हटला ,सर दंड देऊन टाका,ट्राफीक जाम होतेय , .मी त्या व्यक्तीला विचारलं ," तुझं आयकार्ड व तु डबल व्हँक्सीन केल्याचा कागद दाखव"! , तो गांगरला म्हटला एकच डोस घेतलाय, तोपर्यंत त्याने दोनशे रुपये घेत ,माझ्या हातात पावती दिली ,पावतीवर चेहऱ्यावर मास्क न घातल्यामुळे दंड,अस लिहीलं होतं ,तसं मी त्यावा विचारलं की ,माझ्या चेहऱ्यावर तर मास्क आहे व तु पावतीवर नाव का लिहीले नाही ? तो अजून गांगरला. कँबचा ड्रायव्हर चिडचिड करत असल्याने मी ही दोनशे रुपये देऊन टाकले, मात्र त्याच्या आयकार्डचा फोटो घेतला ,त्या आयकार्डवर त्याच सरनेम तिवारी होतं,अन् तो मात्र मराठीत बोलत होता , माझी शंका अधिक गडद झाली ,मी त्याच्याकडे मोबाईल नंबर मागीतला ,तसा तो पटकन सटकला . दरम्यान मी कँबवाल्याला विचारलं हा सिग्नल कोणता ,तो म्हटला,चेंबुरजवळचा सुमन नगर सिग्नल.

त्या व्यक्तीच्या आयकार्ड वर मुंबई महापालिका व ट्रिगर फँसिलिटी प्रा. लि. असे नाव होते ,मी गुगला ट्रिगर कःपनी सर्च करत ,संपर्क नंबर मिळवला व कॉल केला, त्यांना विचारलं की,तुमची कंपनी व्हँक्सीन न घेतलेल्या व्यक्तींना ,दंड आकारला कसं नियुक्त करु शकते ?? त्या निरुत्तर झालेल्या व्यक्तीने कंपनीच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांचा नंबर पाठवला,मी वागरे नावाच्या त्या व्यक्तीशी बोललो ,तर ते म्हटले, मला त्या व्यक्तीचं आयकार्ड पाठवा. मी त्या व्यक्तीचं आयकार्ड पाठवले तरं ते म्हटले , "सदर व्यक्ती आमच्या कंपनीचा नाही व आमच्या कंपनीचा बीएमसी सोबतचा करार कधीच संपलाय "! मी पुन्हा गुगल सर्च करत बीएमसीला संपर्क केला ,चार वार्डचे संपर्क नंबर होते ,पैकी दोन वार्डला अधिकारी उपलब्ध नव्हते ,तिसरा संपर्कातच नव्हता ,तर शेवटी ज्या भागात घटना घडली ,त्या कुर्ला वार्डच्या व्यक्तीने वरीष्ठ अधिकाऱ्यांचा नंबर दिला , त्यांना फोनवर सगळा वृत्तांत सांगीतला, दंड आकारणार्याचे आयकार्ड पाठवले ,तर त्यांचा रिप्लाय आला की , " हा आमचा माणूस नाही व आम्ही दुसर्याच कंपनीशी करार केलाय ,दंडाची पावती व आयकार्ड दोन्ही फेक आहेत तुम्ही पोलिसांत जा " .असं सांगून तो अधिकारी मोकळा झाला ,तसं त्याला मी म्हटलं की, " कोणत्या कंपनीशी करार झालाय हे सामान्य नागरीकांना सांगायची ,बीएमसी ची जबाबदारी आहे" . तुम्हीच पोलिसात तक्रार द्यायला हवी, तसं तो अधिकारी म्हटला , " आॉफीसला यासविस्तर बोलू. "मला वेळ नसल्याने मी गेलो नाही .

मात्र कोरोनाकाळात सर्वसामान्य जनता होरपळून निघाली असतांना ,त्यावर अशा पध्दतीने जनतेला वेठीस धरणारी यंत्रणा ,म्हणजे अनागोंदी कारभाराचा कळसच म्हणावा लागेल. हायवेवर वाहने थांबवायला वेळ नसतो म्हणून अशा जागेवर दंड वसून करायचा ,पोलीस यंत्रणेला हप्ते देऊन हाताशी धरायचं ,बीएमसीच्या बनावट पावत्या तयार करायच्या ,अन् सर्वसामान्यांची लूट करायची , तक्रार केली तर दखल घ्यायची नाही ,यात सरकारची आघाडीच दिसतेय . खूप मोठ्या प्रमाणात ही लूट सुरु आहे , सरकारने या सर्व बाबींची गंभीर दाखल घेऊन कारवाई करावी अशी अपेक्षा आहे .सर्वसामान्यांनी चिकित्सकपणे प्रश्न विचारुनच,अशा प्रकारच्या लोकांना तोंड द्यावे .घाबरून जाऊ नये . सजग व जागृत राहूयात !

- संदीप देवरे

Tags:    

Similar News