किरीट सोमय्या शिंदे गट फोडणार – प्रा. हरी नरके

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे शिंदे गटातील काही आमदार नाराज झाले आहेत. त्यांच्या या नाराजीचा अर्थ काय, किरीट सोमय्या यांच्या भाषेमुळे शिंदे सरकार अडचणीत येऊ शकते का, याचे विश्लेषण केले आहे प्रा. हरी नरके यांनी....

Update: 2022-07-09 07:02 GMT

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे शिंदे गटातील काही आमदार नाराज झाले आहेत. त्यांच्या या नाराजीचा अर्थ काय, किरीट सोमय्या यांच्या भाषेमुळे शिंदे सरकार अडचणीत येऊ शकते का, याचे विश्लेषण केले आहे प्रा. हरी नरके यांनी....

"श्री.किरीट सोमय्या शिंदे गट फोडणार अशी लक्षणं दिसू लागलीत. त्यांनी श्री. उद्धव ठाकरे यांना "माफिया" म्हटल्यावर त्याच्या तीव्र प्रतिक्रिया आल्या. हे खपवून घेणार नाही असं अगदी सौम्य प्रकृतीच्या दीपक केसरकर ते दणकट गुलाबराव पाटील यांच्यापर्यंतच्या लोकांनी जाहीरपणे सांगितले. संजय गायकवाड की पवार तर अगदीच संतापले. हे का घडतेय?


१) सोमय्या यांची भाषा दिवसेंदिवस अत्यंत उद्दाम, खुनशी आणि मिजासखोर बनत चाललीय.

२) त्यांना मिळणारी प्रसिद्धी त्यांच्या डोक्यात गेल्याने ते चेकाळले आहेत. प्रसिद्धी देणारे चतुर असतात. ते मिरवतात, मिरवतात नी असे आपटतात की त्यांचा पार अन्नू गोगट्या होतो.

३) सोमय्या यांच्यावर जेव्हा भ्रष्टाचाराचे थेट आरोप झाले तेव्हा त्यांचे मानसिक संतुलन बिघडले नि ते पारच वाया गेले.

४) असे वाचाळ संघ- भाजपमध्ये शेकडोंनी आहेत. सोमय्या यांना स्वपक्षातील भ्रष्टाचारी दिसत नाहीत. त्यांना फक्त इतर पक्षातल्या लोकांचा भ्रष्टाचार दिसतो. त्यांनी आरोप केलेले लोक पक्षांतर करून भाजपमध्ये आले की सोमय्या यांचे आरोप बंद होतात. तो माणूस रातोरात पवित्र आणि चारित्र्यवान बनतो.

५) केंद्रीय यंत्रणा मुठीत आहेत म्हणून सोमय्या सुसाट सुटलेत.ते सध्या प्रसिद्धीच्या शिखरावर आहेत.पण यानंतर शिखर नसून दरी आहे.जे हर्षद मेहता, खैरनार, हजारे यांचे झाले तेच लवकरच सोमय्या यांचे होईल. इथे कुणीही अमर पट्टा घेऊन आलेले नाही. विसर्जन अटळ असते. सोमय्या यांना आवरले नाही तर तेच शिंदे भाजप सरकारच्या विसर्जनाला कारणीभूत ठरतील. - प्रा. हरी नरके"

Tags:    

Similar News