#BharatJodoYatra : भारत जोडो यात्रा, कुणासाठी कशासाठी?

Rahul Gandhi यांची भारत जोडो यात्रा सुरू झाली आहे, यात्रेचा हेतू देश जोडण्यासाठी असल्याचे सांगितले जाते. पण या यात्रेचा हेतू काय, या यात्रेतून राहुल गांधी यांना काय साधायचे आहे, काँग्रेसला याचा फायदा होईल का याबाबत विश्लेषण करणारा ज्येष्ठ पत्रकार सुनिल तांबे यांचा लेख...;

Update: 2022-09-08 07:12 GMT

Rahul Gandhi यांची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) सुरू झाली आहे, यात्रेचा हेतू देश जोडण्यासाठी असल्याचे सांगितले जाते. पण या यात्रेचा हेतू काय, या यात्रेतून राहुल गांधी यांना काय साधायचे आहे, काँग्रेसला याचा फायदा होईल का याबाबत विश्लेषण करणारा लेख ज्येष्ठ पत्रकार सुनिल तांबे यांनी लिहिला आहे. सुनिल तांबे यांच्या फेसबुक पेजवरुन साभार...

भारत जोडो यात्रा चंद्रशेखर यांनीही केली होती. विविध छोट्या-मोठ्या परिवर्तनवादी गटांना, संघटनांना खूप आशा व अपेक्षा होत्या या यात्रेकडून. प्रत्यक्षात या यात्रेतून जनता पक्ष पुन्हा उभा राह्यला नाही, चंद्रशेखर आणि त्यांच्या काही सहकार्‍यांचं भारताचं आकलन वाढलं आणि किंचित राजकीय वजनही.

बाबा आमटे यांनीही भारत जोडो यात्रा काढली होती. ही यात्रा कोणत्याही राजकीय पक्षाच्या विरोधात नव्हती. या यात्रेतूनही नवीन भारताच्या जडण-घडणीचा कोणताही नवा पर्याय उभा राह्यला नाही.

लालकृष्ण आडवाणी (Lal Krishna Advani) यांनी काढलेली रामरथ यात्रा ( Ram Rath Yatra ) हिंदू-मुस्लिम (Hindu Muslim)दंगली पेटवत गेली. भारत हा देश हिंदूंचा आहे, अन्य धर्मीयांनी स्वखुषीने दुय्यम नागरिकत्व स्वीकारावं अन्यथा ते त्यांच्यावर लादलं जाईल हा या यात्रेचा संदेश होता. २०१४ मध्ये मोदींच्या ( Modi  )आगमनानंतर हा संदेश प्रत्यक्षात येऊ लागला. असममध्ये काही हजार लोकांना नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी स्थानबद्ध करण्यात आलं आहे. त्यापैकी निम्मे स्थानिक आदिवासी व उर्वरीत बहुसंख्य गरीब हिंदू आहेत. महात्मा गांधींच्या ( mahatma gandhi ) पुतळ्यावर बंदुकीच्या गोळ्या झाडण्याचे कार्यक्रम होऊ लागले, नथूराम गोडसेचं (Nathuram Godse ) मंदिर उभारलं गेलं, धर्म संसदा मुस्लिमांना धमक्या देऊ लागल्या. गोराक्षसांचा धिंगाणा सुरु झाला. आज आडवाणी अडगळीत पडले असतील परंतु त्यांच्या यात्रेचा राजकीय फायदा भाजप आणि संघ परिवाराला झाला.

हा देश पुन्हा जोडण्यासाठी राहुल गांधी ( rahul gandhi )यांनी काल भारत जोडो यात्रा सुरु केली आहे. काँग्रेस  (congress ) पक्षाची स्थिती वाईट आहे. लोकसभेत काँग्रेसचे केवळ ५३ खासदार आहेत. १९९९ पासून काँग्रेस अध्यक्षपद सोनिया गांधी (sonia gandhi ) यांच्याकडे आहे. अल्पकाळ राहुल गांधी अध्यक्ष होते परंतु लोकसभा निवडणुकीतील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी पदाचा राजीनामा दिला. दीर्घ काळ पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष नव्हता. जुने जाणते नेते राहुल गांधींवर टीका करून पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत. डॉ. लोहिया यांच्या बिगर काँग्रेसवादाच्या राजकारणाचा हा परिणाम आहे असं खासदार कुमार केतकर (kumar ketkar) सांगत असतात. लोहियांचं निधन १९६७ साली झालं, जयप्रकाश नारायण (Jayaprakash Narayan)१९७९ साली गेले. १९८० साली इंदिरा गांधी (indira gandhi)पुन्हा सत्तेवर आल्या, राजीव गांधी (rajiv gandhi) यांच्या नेतृत्वाखाली १९८४ काँग्रेसला प्रचंड बहुमत मिळालं. भाजपचे (bjp)केवळ दोन खासदार लोकसभेत होते. अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee)यांचाही पराभव झाला होता. त्यानंतर नरसिंहराव (Narasimha Rao)आणि मनमोहन सिंग (Manmohan Singh)यांची सरकारं होती. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून २१ व्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत लोहिया-जेपी यांचा परिणाम कुमार केत करांना जाणवतो. कारण काँग्रेस पक्षातील अनागोंदीकडे ते काणाडोळा करतात. आता त्यांच्या आशा राहुल गांधींवर केंद्रीत झाल्या आहेत.

काँग्रेस पक्षाची पुनर्रचना न करता राहुल गांधींचं नेतृत्व पक्षात प्रस्थापित करण्यासाठी ही यात्रा आहे. त्यासाठी कन्याकुमारी ते काश्मीर अशी पायपीट राहुल गांधी करत आहेत याचं स्वागतच करायला हवं. या निमित्ताने भाजप विरोधी शक्तींची एकजूट झाली तर २०२४ च्या निवडणुकांमध्ये भाजपचा वारू रोखता येऊ शकतो. हे घडावं यासाठी या यात्रेला शुभेच्छा.

Tags:    

Similar News