धर्माचे रखवालदार!

धर्माचे रखवालदार धर्माचं स्तोम का माजवतात? धार्मिक कट्टरतावाद कशासाठी? एका धर्माला नाव ठेवून स्वत:चा तथाकथित धर्म मोठा होतो का? वाचा आनंद शितोळे यांचा लेख...

Update: 2020-10-19 03:20 GMT

ज्यावेळी आपल्या धर्माच्या कट्टरवादी लोकांचं कांड होत त्यावेळी लोक "आम्हाला बर सांगता, त्यांना का सांगत नाहीत?" म्हणून इतर धर्मियांच्या कट्टरवादी लोकांकडे बोट दाखवतात. हे सगळेच करतात, दोन्ही कडे असलेले. मात्र, दोन्ही कट्टरवादी लोकांचं एका बाबतीत ठाम एकमत असतंय. जे काही सांगायचं ते इथल्या धर्मनिरपेक्ष, पुरोगामी आणि मवाळपंथी लोकांनीच सांगायला हवंय. त्यासाठी आम्ही त्यांना "फ़ुरोगामी" म्हणून हिणवू, टवाळी करू ते तुम्ही चालवून घ्यायला हवंय.

म्हणजे आमच्या घरातला कचरा आम्ही साफ करणार नाही, त्यांच्या घरातला कचरा बघा की, आणि तो कचरा तुम्हीच साफ करा. असं मत दोन्हीकडच्या कट्टरवादी लोकांचं असतंय. प्रत्येक कट्टरवादी धर्माला आपला तथाकथित शत्रू धर्मातल्या कट्टरवादी लोकांचं अस्तित्व अपरिहार्य असतंय. धर्म कुठलाही असो, कट्टरवादी लोकांना एक परधर्मीय कट्टरवादी शत्रू अनिवार्य असतो. आपल्याच धर्मातल्या मवाळ लोकांना भीती दाखवायला,बागुलबुवा दाखवायला आणि आपली राजकीय ,धार्मिक दुकानदारी सुखनैव चालवायला.

आपला धर्म आपल्या चार भिंतीत पाळणाऱ्या आणि धार्मिक भावनांचं अवडंबर न करणाऱ्या सामान्य लोकांना एवढं लक्षात आलं तरी पुरेस आहे. धर्म खतरे मे की दुकानदारी खतरेमे

#धर्माचे_दुकानदार

Tags:    

Similar News