अमृतमहोत्सवी केतकर

आज ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांचा आज 75 व्वा वाढदिवस, त्या निमित्ताने कुमार केतकर यांच्या आठवणींना सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी उजाळा दिला आहे.

Update: 2021-01-07 08:12 GMT

शरद जोशी आणि कुमार केतकर एकमेकांत काही मतभेद होते. मी शरद जोशी अमृतमहोत्सवानिमित्त त्यांची मुलाखत घेऊन त्यांना पाठवली. मुलाखत खूप मोठी होती. खाजगीत त्यांनी दोघांतील नाते सांगितले पण त्यांनी त्यादिवशी वाचकांची पत्र रद्द करून खूप मोठी एकही वाक्य कट न करता लोकसत्ता संपूर्ण छापली... हा उदारमतवाद केतकरांनी शिकवला.

त्यांच्यावर टीका करणारी पत्र अगोदर घेत जा असे स्पष्ट सांगत असत. त्यांच्या एका भाषणाचे निमंत्रण संयोजक स्थानिक सहकार सम्राटांनी स्थानिक प्रतिनिधीला दिले नाही. तो प्रतिनिधी भेटायला आला. पण म्हणाला की, मी बातमी पाठवणार नाही. कारण निमंत्रण नाही. केतकरांनी परवानगी देऊन त्याचा आत्मसन्मान जपला. इतक्या मोकळेपणाने सामान्य प्रतिनिधी ही त्यांच्याशी बोलू शकत होता. त्यांच्या मोठेपणाचे दडपण समोरच्यावर येत नाही. हे वेगळेपण...

जे. कृष्णमूर्ती हा आमचा दोघांतील धागा. त्यांच्यावर त्यांनी लेख लिहीला. ती पुरवणी ग्रामीण अंकात येत नव्हती. त्यांनी पोस्टाने तो अंक पाठवला. महाराष्ट्र टाइम्स सोडल्यावर ते भंडारदरा येथे आले होते. ती पहिली भेट त्यानंतर मी त्यांना पत्र लिहीले व त्यात तुम्ही कुठेतरी असायला हवे असे लिहीले. तेव्हा लोकमतची ऑफर होती. त्यांनी मला फोन केला व म्हणाले माझा निर्णय होत नव्हता. तुझे मनापासून लिहीलेले पत्र वाचले आणि द्विधा संपली..

लगेच दर्डा ना होकार कळवला एका वाचकाच्या भावनेशी इतके एकरूप असणारे केतकर आहेत. त्यांच्या मतांशी असहमत असा किंवा सहमत पण त्यांना ओलांडून जाता येत नाही. आमची लोहिया जयप्रकाश भक्ती व घराणेशाही विरोध त्याना माहीत असूनही ते खुलेपणाने बोलत. माझ्यासारख्या ग्रामीण भागातील अनेकांना त्यांनी मोठ्या वृत्तपत्रात स्थान दिले. त्यातून लेखनप्रवास सुरु झाला. माझ्या पहिल्या कविता संग्रहाला त्यांची प्रस्तावना आहे. तर कृष्णमूर्ती पुस्तकाचे प्रकाशन करायला ते आवर्जून पुण्यात आले असे हे अमृतमहोत्सवी केतकर .....


Tags:    

Similar News