पैसे देऊन टीआरपी कुणी विकत घेतला. यावर चॅनल्सवर चाललेली भांडण आणि कलगीतुरा हाही एक #TRP मिळवण्याचा मार्ग आहे. चॅनल्सवर ही वायफळ चर्चा आपापला #TRP वाढवणे आणि आम्हीच कसे साजूक, बाणेदार वगैरे दाखवण्याचा निष्फळ प्रयत्न आहे.
आज एकमेकांवर चिखलफेक करणारी ही सगळी मंडळी काही दिवसांपूर्वी मुंबईत बातमी मिळवायला मास्क गळ्यात बांधून, कोव्हिड प्रोटोकॉल ला काठेवाडी अश्व लावून एकमेकांना रेटारेटी करून पुढे घुसताना सगळ्या देशाने पाहिलेलं आहे. मालकांनी टाकलेल्या हाडकाला चघळण्यात कुणीही मागे नव्हतं.
महाराष्ट्राची बदनामी करायला कुणीही मागे नव्हतं. अगदी मराठी बाणा म्हणवणारे स्थानिक चॅनल्स सुद्धा अपवाद वगळता या धुळवडीत हात धुवून घेत होते. हे महाराष्ट्र विसरणार नाही. सबब रिपब्लिक वर टीका करून, आता मुंबई पोलिसांचा आणि महाराष्ट्राचा कैवार घेऊन गळे काढण्यात अर्थ नाहीये. बुंद से गयी वो हौद से नही आती!!
(आनंद शितोळे यांच्या फेसबुक भिंतीवरून)