१९८० पासून चीन कम्युनिस्ट पक्षाचा सभासद आहे
डेंग झिआओ पिंग यांनी १८ डिसेम्बर १९७८ मध्ये आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम जाहीर केला
तो पर्यंत जगातील कोणत्याही कम्युनिस्ट पक्षाने डेंग यांनी वापरलेली भाषा, आर्थिक तत्वे वापरली नव्हती
काल चीन कम्युनिस्ट पक्षांनी आर्थिक सुधारणांची ४० वर्षे जोरात साजरी केली
आज अनेक वर्तमानपत्रांनी गेल्या चाळीस वर्षात चीनने केलेल्या आर्थिक प्रगतीची आकडेवारी दिली आहे
अलीबाबाचा प्रवर्तक जॅक मा चीन कम्युनिस्ट पक्षाचा सभासद आहे हे देखील आवर्जून सांगितले आहे
चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या मुखपत्राने चीनमधील शंभर व्यक्तींची नावे दिली आहेत ज्यांनी चीनची नेत्रदीपक आर्थिक प्रगती साधण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. त्यात जॅक माचा समावेश आहे
जॅक माची व्यक्तिगत संपत्ती ३९ बिलायन्स डॉलर्स म्हणजे अंदाजे २,८०,००० कोटी रुपये आहे
व्यक्तीचा सांपत्तिक स्तर व तिची राजकीय विचारधारा यांचा नक्की संबंध काय ? हा प्रश्न सार्वजनिक चर्चेत घेण्याची गरज आहे
म्हणजे डाव्या / समाजवादी / मार्क्सवादी विचारांच्या व्यक्तीचा आर्थिक स्तर निम्न मध्यमवर्गीयच असला पाहिजे का ?
समजा मी कोट्याधीश झालो तर मी स्वतःला डाव्या विचारांचा म्हणवू शकत नाही का ? मी उजव्या आर्थिक विचारांचा असणे अशी काही अपरिहार्यता आहे का ?
या प्रश्नांवरची स्पष्टता आजच्या विशीतील / तिशीतील तरुणांसाठी खूप महत्वाची आहे. स्वातंत्र्यापूर्वी / अगदी साठी /सत्तरीत डाव्या विचारांच्या तरुणासमोरील प्रश्न व “मिल्लेनियल्स” तरुणांना भेडसावणाऱ्या प्रश्नांत खूप फरक आहे. पण हे प्रश्न ऐरणीवर घेतलेच जात नाहीत हि तरुणांची तक्रार आहे.
अनेक उद्यमशील तरुण नवीन तंत्रज्ञान वापरून स्टार्ट अप्स, स्वतःच्या छोट्या खाजगी कंपन्या स्थापन करीत आहेत. त्यांच्यातील अनेक प्रोग्रेसिव्ह आहेत. त्यांचे डाव्या/ परिवर्तनवादी चळवळीत स्थान काय ?