कामगारांच्या रोजगाराची जबाबदारी उद्योगपतींनी घ्यावी- विश्वास उटगी

कामगारांची सुरक्षा आणि त्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत कारखान्यांच्या ठिकाणी 'कोविड दक्षता समिती' स्थापन करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिल्या. नेमकं काय झालं बैठकीत जाणून घ्या...;

Update: 2021-04-23 10:46 GMT

वाढत्या करोना विषाणूच्या संसर्गामुळे राज्यात आजपासून कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे. मात्र लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार गेले आहे. हे गेल्या वर्षी आपण सर्वांनी पाहिलं... त्यामुळे या लॉकडाऊनमध्ये उद्योगधंदे सुरु राहण्याबरोबरच राज्याचे अर्थचक्र ही सुरु राहणे आवश्यक आहे. त्यामुळे कामगारांचा रोजगार, सुरक्षा, कामगारांची राहण्याची-खाण्याची व्यवस्था तसेच कामगारांच्या आरोग्य आणि लसीकरणाला प्राधान्य देत संबंधित कंपनीच्या ठिकाणी 'कोविड दक्षता समिती' स्थापन करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. कामगारांच्या प्रश्नासंदर्भात कामगार मंत्री हसन मुश्रीफ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कामगार संघटनेसोबत बैठक झाली. या बैठकीत उद्योग बंद न करता, कामगारांचा रोजगार न जाता करोना विषाणूचा संसर्ग कसा थांबवता येईल यावर चर्चा झाली.

यावेळी कामगारांच्या रोजगाराची जबाबदारी उद्योगपतींनी घ्यावी अशी मागणी कामगार संघटनेतर्फे करण्यात आली असून मुख्यमंत्र्यांनी यावर सकारात्मक उत्तर दिलं असल्याच बॅंकिंग तज्ञ विश्वास उटगी यांनी मॅक्स महाराष्ट्राशी बोलताना सांगितलं.पाहा काय म्हणाले विश्वास उटगी..

.Full View

दरम्यान लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर राज्य शासनाने असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी जाहीर केलेली मदत कामगारांपर्यंत येत्या आठ दिवसांमध्ये पोहोचवली जाईल, असे कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. नोंदणीकृत बांधकाम कामगार कल्याण योजनेंतर्गत महाराष्ट्र इमारत आणि इतर कामगार कल्याणकारी मंडळाच्या निधीमधून राज्यातील नोंदणीकृत अशा सुमारे 12 लाख बांधकाम कामगारांना प्रत्येकी पंधराशे रुपयांचे अनुदान देण्यात येईल, अशी घोषणा केली. या घोषणेची अंमलबजावणी करण्यासाठी कामगार विभाग काम करीत आहे. याशिवाय राज्यातील अनेक असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्यांपर्यंत कामगार विभाग पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे.

या बैठकीस कामगार मंत्री हसन मुश्रीफ, खासदार अरविंद सावंत, आमदार भाई जगताप, आमदार शशिकांत शिंदे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, राजशिष्टाचार विभागाच्या प्रधान सचिव मनीषा पाटणकर- म्हैसकर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद- सिंघल, मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जऱ्हाड, कामगार आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर, माजी राज्यमंत्री सचिन अहिर, यांच्यासह राज्यातील कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Tags:    

Similar News