भारतीय माध्यमांची लायकी कंगनानं उघड केली

सनसनाटी गोदी मीडिया च्या बातम्यांमुळे सर्वसामान्यांमध्ये हसत होत असून प्रसारमाध्यमांनी आता तरी सुधरा अशी अपेक्षा अलोक देशपांडे यांनी व्यक्त केले आहे.;

Update: 2020-12-04 11:01 GMT

काल कंगना राणावत यांनी एक ट्विट केले होते. त्यात त्या म्हणाल्या की मी एक चुटकी वाजवली की हजार कॅमेरे माझ्या दाराशी येऊन उभे राहतील. त्यांच्या इतर कोणत्याही वक्तव्यापेक्षा त्यांचे हे वक्तव्य 100% टक्के खरे आहे. सध्याच्या भारतीय माध्यमांची लायकी राणावत यांनी अजाणतेपणी का होईना पण उघड केली.

आज सकाळपासून साधारण 1900 ते 2000 पोस्टल बॅलेट असणाऱ्या हैद्राबाद निवडणुकीत त्या 2000 मतांच्या आधारावर 1 तासाभरात भाजपची गगनभरारी, भाग्योदय वगैरे वगैरे जल्लोष न्यूज चॅनेल्स च्या स्टुडिओ मध्ये सुरू झाला होता.

11 नंतर जसजसे खरे निकाल समोर येऊ लागले तसतसे अचानक चॅनेल्सनी हैद्राबाद च्या बातम्याच दाखवणे बंद केले. आता भाजप मागे पडल्यावर काँगेसची वाताहत दाखवणे सुरू होईल. हे सोयीस्कर पणे विसरले जाईल की 2016 मध्ये काँग्रेसला 2 जागाच होत्या हैद्राबाद महापालिकेत.

महाराष्ट्रात 6 पैकी 5 ठिकाणी भाजप हरली. कोणत्याही राष्ट्रीय चॅनेल वर त्याची दखल घेतली गेली नाही. उत्तर प्रदेश मध्ये भाजप वाराणसी मध्ये हरली आहे. दखल नाही. शेतकऱ्यांनी आंदोलनात गोदी मीडियाने आमच्याकडे येऊ नये अशी स्पष्ट भूमिका घेतली. तमाम भारतीयानी ते करायच्या आधी सुधरा रे...सुधरा.

Tags:    

Similar News