गौतम अडाणी ग्रुप चा भंडाफोड - भारतातील काळा पैसा मॉरिशस मार्गे अडाणी ग्रुप मध्ये गुंतवला ???
एका ट्विटने अदानी ग्रुपचे शेअर गडगडल्यानंतर आता तर्क-वितर्क लढवले जात असून नेमके हे कसे झाले याचे विश्लेषण केले आहे, अर्थ चेतना अभियानाचे किशोर गजभिये यांनी..;
काल अडाणी ग्रूप चा शेयर 25 % ने गडगडले. NSDL ( नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटोरी लिमिटेड ) भारत सरकार ने अडाणी ग्रुप मध्ये मॉरिशस येथे नोंदनिकृत असलेल्या सहा इन्व्हेस्टमेंट कंपन्या , ज्या फक्त अडाणी ग्रुप मधेच 90 % च्या वर गुंतवणूक करीत होत्या , त्यापैकी तीन कंपन्यांना , त्यानी Source ऑफ fund ची माहिती दिली नाही म्हणून, त्यांचे इन्व्हेस्टमेंट अकाऊंट गोठविले.
ह्या सहा कंपन्या कोणत्या ?
1. APMS इन्व्हेस्टमेंट फंड
2.VESPERA फंड लिमिटेड
3.CRESTA फंड लिमिटेड
4. ELARA इंडीया Opportunity फंड
5. ALBULA इन्व्हेस्टमेंट फंड.
6. LTS इन्व्हेस्टमेंट फंड
या त्या सहा कंपन्या होत.
या सहाही कंपन्या मॉरिशस येथे नोंदणी कृत असून तेथुन ऑपरेट करतात. मॉरिशस, केमन आयलंड इत्यादी देश अन्य देशातील काळा पैसा त्यांच्या देशात साठवण्यास, वापरण्यास आणि अन्यत्र वळ विण्यास मान्यता देतात. या सहा कंपन्या पैकी तीन कंपन्यांचे ऑफिस एकाच इमारती मध्ये आहे. ह्या कंपन्यांची वेब साईट नाही. एकूणच त्यांचा व्यवहार संशयास्पद आहे.
ज्या तीन कंपन्यांचे इन्व्हेस्टमेंट अकाऊंट माहिती न दिल्यामुळे NSDL ने गोठविले त्यांची नावे अशी-
1. APMS इन्व्हेस्टमेंट फंड
2.ALBULA इन्व्हेस्टमेंट फंड
3.CRESTA इन्व्हेस्टमेंट फंड
ह्या कंपन्यांनी अडाणी ग्रुप च्या ह्या सहा शेयर मार्केट मध्ये लिस्टेड कंपन्यांमध्ये 43,500 कोटी रुपयांची गुंतवणूक FPI ( फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट ) गेल्या अनेक महिन्या पासून केली.
लिस्टड कंपन्या अश्या आहेत -
1. Adani Transmission Ltd
2. Adani Green Ltd
3. Adani Enterprises
4. Adani Gas Ltd.
5. Adani Ports Ltd.
6.Adani Power Ltd.
ह्या कंपन्यांची इन्व्हेस्टमेंट FPI म्हणून आल्यामुळे ह्या कंपन्यांचे शेयर किती वधारले ?
1.Adani Transmission - 800 %
2. Adani ग्रीन - 450%
3. Adani Enterprises - 1200 %
4. अडाणी Gas -1200 %
5. अडाणी ports -300 %
6. Adani Power -500%
अडाणी ग्रुप आपल्या प्रत्येक कंपनीसाठी कर्ज घेऊनच काम करतो. त्याचेवर प्रचंड कर्ज असूनही त्याला भारतीय बँकांनी कर्ज दिले. 2019 मध्ये अडाणी ग्रुप वर 1,28,000 कोटी रुपयांचे कर्ज होते.
त्यांच्या कंपन्यांचे गुंतवणुकीचे मॉडेल असे आहे -
प्रमोटर ( गौतम अडाणी ) -74.9 %
विदेशी गुंतवणूकदार कंपन्या - 15 %
छोटे खुर्दा ( किरकोळ) निवेशक -10%
सरकारच्या (सेबी) च्या धोरणा नुसार प्रवर्तकाला जास्तीत जास्त 75 % च स्वतः ची गुंतवणूक करता येते. म्हणून गौतम अडाणीने 74.9% स्वतः साठी ठेवले. जनते साठी फक्त 10% व मॉरिशस च्या कंपन्यांचे 15 % असा हा देखावा होता.
ह्या सहा कंपन्या फक्त आणि फक्त अडाणी ग्रुप मध्येच इन्व्हेस्ट करत होत्या. खरे म्हणजे इन्व्हेस्टमेंट कंपन्या अनेक, म्हणजे शेकडो कंपन्या मध्ये इन्व्हेस्टमेंट करीत असतात. पण असे दिसते की ह्या सहा कंपन्या अडाणी ग्रुप मधेच इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी जन्माला आल्या होत्या.
असे म्हणतात की भारतातला काळा पैसा भारताबाहेर पाठविला जातो. तेथून तो एका देशातून दुसऱ्या देशात, तेथून तिसऱ्या देशात व शेवटी मॉरिशस, केमन आयलंड, सीचेल्स अशा 'टॅक्स हेवन ' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देशात कंपनी स्थापन करून तेथे पार्किंग केला जातो. आणि तोच काळा पैसा FPI ( फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट) म्हणून भारतात येतो. हे खरे "सत्य" आहे भारतातील FPI चे.
जगात कोरोना काळात FPI ला ब्रेक लागला होता. पण अडाणी ग्रुप मध्ये मात्र FPI सुरूच होते.
अडाणी ग्रुप वर केंद्रीय भाजपा सरकार मेहेरबान आहे हे सर्व श्रुत आहे. अलीकडेच अडाणी ग्रुप ला भारतातील सहा एयरपोर्ट खाजगी करणा अंतर्गत बहाल करण्यात आलेले आहेत.
श्री नरेंद्र मोदी गुजरात चे मुख्यमंत्री असताना गुजरात मधील मुंद्रा पोर्ट, जेथुन गौतम अडाणी चा जास्तीत जास्त माल एक्स्पोर्ट होत होता, विकासा करीता हस्तांतरित करण्यात आले होते.
आता ह्या तीन FPI कंपन्यांच्या वरील कारवाईमुळे डब्यावरचे झाकण उघडले आहे.
काळा पैसा, त्याची वाहतूक, पार्किंग, गुंतवणूक आणि व्यापार , शेयर बाजारातील घोटाळे, शेयर बाजारातील दलालांचे कारनामे, त्यावर आळा बसवायला भारत सरकारला आलेले अपयश, सामान्य गुंतवणूक दारांची फसवणूक आणि 5 ट्रेलियन इकॉनॉमी चे दिवास्वप्न या सर्व गोष्टींचा उलगडा आता होईल अशी रास्त अपेक्षा आहे.
सामान्य लोकांना ह्या क्लिष्ट विषय आणि घोटाळ्याची माहिती व्हावी या शुद्ध हेतूने हा लेखन प्रपंच !!!
किशोर गजभिये
अर्थ चेतना
आर्थिक स्वावलंबन अभियान.
9619777514