'पावरफुल' पत्रकार शहीद झाला…

मूलतत्त्ववादाचं जहर ओकत जगणं चिरडणारे तालिबानी असो की, अस्मानी-सुलतानी संकटात नागरिकांच्या मृत्यूचे आकडे लपवत 'मौसम गुलाबी है' असं सांगणारे भारतीय राज्यकर्ते या दोनही सत्तेच्या समोर उभं राहून सणसणीत थोबाडीत मारत तिला भानावर आणणारा दानिश सिद्दीकी... वाचा दानिश यांच्या मानवी कल्याणासाठी केलेल्या कार्याचा शर्मिष्ठा भोसले यांनी घेतलेला आढावा...

Update: 2021-07-17 11:10 GMT

मूलतत्त्ववादाचं जहर ओकत जगणं चिरडणारे तालिबानी एकीकडे. अस्मानी-सुलतानी संकटात नागरिकांच्या मृत्यूचे आकडे लपवत 'मौसम गुलाबी है' असं सांगणारे भारतीय राज्यकर्ते दुसरीकडे. दानिश सिद्दीकी एक ताकदवान फोटोजर्नलिस्ट म्हणून या दोन्ही सत्तांची पोलखोल सतत करत राहिले. मानव कल्याणासाठी असल्याचा दावा करत क्रूर अजेंडे राबवणाऱ्या 'पावर'चा पर्दाफाश त्यांच्या फोटोजनी सतत केला.

Photo courtesy: Reuters


 दिल्लीच्या सीमापुरी स्मशानभूमीचा ड्रोनमधून काढलेला हा फोटो. बाजूलाच लागून जित्याजागत्या माणसांची कॉलनी. कोरोनाच्या सेकंड वेव्हचा तडाखा सामान्य माणूस सोसत होता आणि सत्ता निर्ढावलेपणानं 'ऑल इज वेल' म्हणत होती त्या अगदी सुरवातीच्या काळातला. किती धैर्य, किती मजबुती लागते हे कॅप्चर करायला... सत्तेच्या सणसणीत थोबाडीत मारत तिला भानावर आणायला.

courtesy social media


 मात्र अवाढव्य सत्ता एकीकडे आणि चिमुकलं, हळवं मानवी जगणं दुसरीकडे. दोन्ही पैलू किती नजाकतीनं उमटवलेत या कलावंतानं आपल्या इमेजेसमध्ये! त्यांचं आजवरचं काम बघताना जाणवत राहतं. एका जगण्यात कितीकाही डायव्हर्स अनुभवलं, जगलं. क्या बात! साहजिकच सत्तेला नकोसा, अप्रिय वाटत राहिला हा माणूस. आणि तेच यश होतं त्यांचं पत्रकार म्हणून. ही अप्रियता मिळवणं हेच चांगल्या पत्रकाराचं ध्येय असतंय.


courtesy social media


 


...मृत्यूही याच सत्तेशी संघर्ष करताना आला. शहीद झाले दानिश. व्हॉट या डेथ! काही पत्रकार मित्रांनी लिहिलंय की अजूनही दानिश यांचा देह तालिबान्यांच्या ताब्यात आहे... दानिश यांचं काम समजून घेणं, त्याच्याविषयी बोलत राहणं हे करत राहिलं पाहिजे. दानिश यांची नजर आणि जज्बा पत्रकार म्हणून मलाही मिळो... आमेन!

Rest in power dear Danish Siddiqui!

शर्मिष्ठा भोसले

Tags:    

Similar News