आयुष्यात येणारे प्रश्न सोडवायला कुठला अभ्यासक्रम आहे?

आयुष्यात आपल्याला य़ेणारे प्रश्न सोडवण्यासाठी कुठला अभ्यासक्रम आहे? आपल्या आयुष्याचे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्यक्रम हाच उपाय आहे का? वाचा गोविंद अ.वाकडे यांचा लेख;

Update: 2020-10-15 03:16 GMT

प्रश्नांना प्राधान्यक्रमाने सोडवता आलं तरच आयुष्य सुकर होतं आणि स्वतःलाही वेळी देता येतो, पण वय झालं, नोकरी नाही, ओळख नाही, प्रत्येकच कामात अपयश येतंय किंवा सगळ्या स्तरावर यशस्वी आहे. तरीही जवळच्यां प्रश्नात आपलं अस्तित्व एकटेपणासहित हरवलं आहे. त्यातून बाहेर निघता येत नाही. त्यावेळी जगासाठी 1 नंबर असलेलो आपण स्वतःसाठी मात्र शून्यच असतो.

मग कधी पुस्तकात, कधी माणसात, कधी मंदिरात, कधी निसर्गात, कधी व्यसनात आणि हमखास म्हटलं तर कुणाच्या तरी प्रेमात स्वतःला शोधत राहतो. स्वतःच्या शोधात फिरत रहाणा-या या प्रवासालाच तर जीवन म्हणतात. जो अशा पद्धतीने पाहिलं की खूप कंटाळवाणाही वाटतो आणि मुळात असतोही...

खरंतर हा प्रवास प्रत्येकाचाच असतो, कुणाचा जीवनाबरोबर संपतो तर कुणाचा आधी.. ज्यांचा आधी संपतो ते उरलेलं आयुष्य मस्त जगतात. वेळच वेळ असतो न त्यांच्याकडे म्हणून  मात्र, ज्यांना हा प्रवास झेपत नाही संपत नाही. ते चालत राहतात. भेटणाऱ्या अनेक वाटसरुसोबत. त्यातला एखादा शेवटच्या मुक्कामापर्यन्त सोबतीला येणाराही भेटतो पण तोही वाटसरू म्हणूनच...!!! त्यामुळे तेव्हाही आपला प्रवास सुरूच असतो, मग स्वतःला शोधण्याचा प्रवास आधी संपतो तो ते कसा पूर्ण करत असतील? स्वतःला कुठं भेटत असतील? हे प्रश्न त्या अनेकांकडे बघितलं की आपल्या समोर उभे राहतात. मात्र, या प्रश्नांच उत्तर त्यांच्याच वागणुकीत असतं. अशी माणसं ओळखता यायला हवी बस्स.... मग आपलाही प्रवास संपतो..... लवकर!!

थोडक्यात स्वतःवर आणि आपल्या कामावर नितांत प्रेम करणाऱ्या व्यक्तींची ही जमात असते. ही लोक वेगळं काही न करता त्यांच्या प्रवासात म्हणा किंवा जीवनात येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाला, अडथळ्यांना सोडविण्यासाठी त्यांचा प्राधान्यक्रम ठरवतात. (उदा.अनेक देता येतील) मुळात कुठलीही परीक्षा देतांना प्रश्न सोडवण्याचं गमक म्हणा किंवा पद्धती हीच असते.

मात्र आयुष्यातील येणारे प्रश्न सोडवायला कुठला अभ्यासक्रम नसल्याने ..!! प्राधान्यक्रम देण्याच्या या पद्धतीचा मार्ग अवलंबला की, आपल्याला त्याग करावा लागतो, त्याग जो आपल्या आयुष्यातील नाजूक क्षण खाऊन टाकणारा असतो. जे क्षण आपल्या स्वतःला शोधण्याच्या जखमेवरची खपली असतात...

गोविंद अ.वाकडे

Similar News