कसा असतो गडचिरोलीतील कोंबडा बाजार?

हे धष्टपुष्ठ कोंबडे जंगलात बनवलेल्या छोट्याशा स्टेडीयमसारख्याच मैदानात झुंजीसाठी उतरवले जातात. त्यांच्या पायाला काती बांधलेली असते. काती म्हणजे छोटीशी तलवार. गडचिरोलीत कसा भरतो कोंबडा बाजार वाचा सागर गोतपागर यांच्या या लेखात…;

Update: 2023-03-08 04:27 GMT

कोंबडा बाजारास कायद्याने परवानगी नाही. पण गडचिरोली परिसरात करमणूकीचे साधन म्हणून काही ठिकाणी असे कोंबडे बाजार चालतात. त्याकाळात साजनवाडीला ( बदललेले नाव ) कोंबडा बाजार भरत होता. या बाजारातून कातीचा कोंबडा आणायला आम्ही कधी कधी जात असायचो. कातीचा कोंबडा आणि सामान्य कोंबडा यांच्या मांसात मोठा फरक आहे. कोंबडा बाजारात झुंजीसाठी खास आहार देऊन कोंबडे सांभाळले जातात. त्यांना झुंजीसाठी विशेष प्रशिक्षण देखील दिले जाते. त्यांची विशेष सेवा केली जाते. त्याला पौष्टिक पीठ चारले जाते.

हे धष्टपुष्ठ कोंबडे जंगलात बनवलेल्या छोट्याशा स्टेडीयमसारख्याच मैदानात झुंजीसाठी उतरवले जातात. त्यांच्या पायाला काती बांधलेली असते. काती म्हणजे छोटीशी तलवार. ती बांधण्याची देखील विशेष कला आहे. कोंबडे बाजाराच्या ठिकाणी पैसे घेऊन काती बांधण्याचा छोटा व्यवसाय चालतो. यामध्ये निपुण लोकांना चांगली मागणी असते.

यामध्ये दोन प्रकारे पैसे लावले जातात. एक म्हणजे दोन कोंबड्यांवर वेगवेगळी पट्टी लावली जाते. त्या पट्टीमध्ये विविध लोक आपले पैसे लावतात. जो जिंकेल त्याला त्यातील दुप्पट पैसे दिले जातात. मैदानाबाहेर मोठ्या संख्येने उभे असलेले प्रेक्षक देखील त्यातल्या एका कोंबड्यावर दहा, वीस, पन्नास रुपये लावतात. झुंज सुरु होताच गलका वाढतो. कुणी ओरडते

“ पारड्यावर दहा, लाल वर पन्नास” कोंबड्याचा रंग सारखाच असेल तर त्याच्या मालकावरून कोंबड्यावर पट्टी लावली जाते. कुणी “टोपीवर पन्नास, चड्डीवर वीस, टावेलवर शंभर ” असे ओरडतात. झुंज सुरु होताच एक कोंबडा पायाची काती लागून उन्मळून पडतो. जिंकलेल्या कोंबड्यावर ज्याने पैसे लावलेत त्याला प्रतिस्पर्धी कोंबड्यावर लावलेले पैसे मिळतात.

जिंकणाऱ्या कोंबडा मालकाला त्या पट्टीवर लावलेली एकूण पट्टी आणि हरलेला कोंबडा मिळतो. अशा कोंबड्यांच्या मांसाला परिसरात चांगली मागणी असते. बहुतेक वेळा हरलेला कोंबडा मरतो. पण तो जखमी असेल तर तिथेच त्याच्यावर उपचार देखील केले जातात. त्याची जखम दोऱ्याने शिवली जाते. त्यावर प्रथमोपचार देखील केले जातात.

गडचिरोलीत अनेक वर्षापासून कोंबडा बाजार भरवला जातो. कायद्याने अवैध असून त्याला परवानगी द्यावी यासाठी अनेकदा प्रयत्न केले गेले आहेत…

सागर गोतपागर…

Tags:    

Similar News