नियमित व्यायामाने मानसिक आरोग्य सुधारते का?

Update: 2021-06-18 14:30 GMT

कोरोना महामारीच्या अगोदरची सकारात्मक लाईफस्टाईल आणि सद्यस्थितीत असणारं जीवनमान तुमच्या मानसिकतेवर नकारात्मतेचा प्रभाव टाकतेय का? कोरोनामुळे जीवन जगण्यात झालेल्या उलथापालथामुळे तुमच्या मनावर एक अनिश्चित असं दडपण येतंय... तुमची अचानक चीड चीड वाढलीय... यामुळे तुम्ही सतत मोबाईलमध्ये स्वत:ला गुंतवून घेतलंय का? तुमच्या मनात नकारात्मकतेने घर केलंय का? करोनाच्या काळात शारिरीक आरोग्य सह मानसिक आरोग्याची कशी काळजी घेतली जावी? कसा करावा मानसिक तणाव दूर?

अँझायटी कशामुळे होते? स्ट्रेस आल्यानंतर नेमकं काय करावे? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील. मानसिक घालमेल शरीराच्या कृतीतून क्वचित कळते. अशा वेळी व्यायाम करणे खूप महत्त्वाचे आहे. आता तुम्ही म्हणाल मानसिक आरोग्य आणि व्यायाम याचा काय संबंध आहे? तर सबंध आहे.

नक्की काय संबंध आहे. जाणून घ्या मॅक्समहाराष्ट्रच्या आरोग्यविषयक 'माझं मानसिक स्वास्थ' या विशेष कार्यक्रमात... तुमच्या मानसिकतेला नवी ऊर्जा मिळण्यासाठी नक्की पाहा औद्योगिक मानसशास्त्रज्ञ डॉ. वृषाली राऊत यांच्याकडून...

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला पडलेल्या तुमच्या मनातील प्रश्न खाली दिलेल्या इमेल आयडीवर पाठवू शकतात. vrushali31@gmail.कॉम दररोज दुपारी २ वाजता 'माझं मानसिक स्वास्थ' हा विशेष कार्यक्रम पाहा फक्त मॅक्स महाराष्ट्रवर

Full View
Tags:    

Similar News