काहीच लक्षणे किंवा त्रास नसताना कोविड टेस्ट positive कशी येते?

काहीच लक्षणे किंवा त्रास नसताना कोविड टेस्ट positive कशी येते? लक्षणे नसणाऱ्या करोनाचा शरीरातील अवयवांवर परिणाम होतो का? कोविड positive असताना नेमकं काय-काय केलं पाहिजे? जाणून घ्या साथरोग तज्ञ प्रिया देशपांडे यांच्याकडून..

Update: 2021-04-22 15:27 GMT

या प्रश्नाच्या पुढे मनातला प्रश्न म्हणजे टेस्ट चुकीची आहे, खोटे positive दिलीये, उगीच आकडे वाढवतात वगैरे वगैरे… अशी शंका मनात येणे साहजिक आहे ! मात्र RTPCR तपासणीमध्ये विषाणूंची संख्या कमी असताना देखील निदान शक्य आहे हे आपण जाणताच. कोविडमध्ये जवळजवळ ८०% रुग्ण हे लक्षणविहीन गटातील असतात आणि तुम्हाला काही लक्षण नसताना टेस्ट positive आली म्हणजे तुम्ही या ८०% लोकांमध्ये मोडता.

लक्षणविरहित असला तर शरीरातील viral load अजून इम्युनिटीच्या टप्प्यांमध्ये आलेला नाही असाही त्याचा अर्थ असू शकतो. तुमच्या शरीरातील viral load हा जास्त असू शकतो तसेच लक्षणविरहित व्यक्ती देखील एअरोसोल तयार करू शकते असे अभ्यासामध्ये दिसून आले आहे. लक्षणविरहित व्यक्ती व्यवस्थित मास्क वापरणार नाही किंवा इतरांना भेटू शकते. लक्षणे न आल्याने तपासणी करणार नाही व आयसोलेट देखील होणार नाही. मात्र अश्या व्यक्तीकडून इतरांना संसर्ग होतच राहील. साथ पसरण्यामध्ये लक्षणविरहित प्रसाराचा खूप मोठा वाटा आहे.

तुम्हाला लक्षण नाही याचा अर्थ शरीरातील करोना अवयवांना नुकसान पोचवणार नाही असे नसते. लक्षणविहीन असणाऱ्या व्यक्तींमध्ये देखील पोस्टकोविडचा त्रास दिसून आला आहे. त्यामुळे तुम्ही लक्षण विहीन असाल आणि तुमची कोविड चाचणी positive आली तर देवाचे आभार मानायला हवेत.

आता

तुम्ही घरीच आयसोलेट होऊन आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवू शकता.

तुमचे कामाच्या ठिकाणचे सहकारी सुरक्षित राहतील.

तुमच्यापासून नकळत समाजामध्ये कोविड पसरणार नाही.

माझ्या परिचितांमधील एखादा मृत्यूही टळू शकेल.

विश्रांती आणि औषधे घेतल्याने कोविडमुळे शरीराची हानी कमी होईल.

करोनाने शरीराची हानी करण्यापूर्वी आणि कुटुंबातील इतर सर्व बाधित होण्यापूर्वीच कोविड चाचणी positive आली तर मला तरी आनंदच होईल. लक्षणे नसताना चिंतेशिवाय १७ दिवस पूर्ण आराम करायला मिळेल. आणि साथ थांबवण्यामध्ये #BreakTheChain मध्ये 'तुमचा' सहभाग असेल याचा अभिमानही असेल.

- डॉ. प्रिया प्रभू (देशपांडे) M.D. साथरोग तज्ञ , मिरज.

Tags:    

Similar News