अक्षयच्या हृदयाची धडधड सुरु ठेवण्यासाठी गरज आहे आपल्या मदतीची
सामाजिक बदलाची सुरुवात स्वतःच्या घरातून करणं सगळ्यात अवघड काम. हे फारसं कुणाला जमत नाही. भाषण करणं, लेख लिहून समाजाला जागृत करणं सहज आणि सोप्पं. ते नेमकं कसं? हा विचार तुम्हाला पडला असेल. तर तुम्ही, तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना सांगून अक्षय तमईचिकर यांच्या हृदयाची धडधड सुरु ठेवण्यासाठी जमेल तेवढी मदत करावी, असं आवाहन तेजश्री कांबळे आणि अक्षय इंडीकर यांनी केलं आहे.;
सामाजिक बदलाची सुरुवात स्वतःच्या घरातून करणं सगळ्यात अवघड आहे. हे फारसं कोणाला जमत नाही. भाषण करणं, लेख लिहून समाजाला जागृत करणं सहज आणि सोप्पं.
माझा मित्र Vivek Tamaichikar याने स्वतःपासून सुरुवात केली. एक अनिष्ठ प्रथा ज्यामध्ये मुलगी कुमारिका आहे की नाही याची 'चाचपणी' करण्यासाठी लग्नाच्या पहिल्या रात्रीच कौमार्य चाचणी करण्याच्या परंपरेस तडा लावला आणि एका स्त्रीचं तीही आपल्या होणाऱ्या बायकोचा सन्मान राखला. ही एक सामाजिक क्रांतीच आहे.
विवेक आज खूप मोठ्या संकटात आहे. त्याचा लहान भाऊ अक्षय (वय 28 वर्षे) याच्यावर हृदयरोगाच्या उपचारासाठी मोठ्या रकमेची आवश्यकता आहे. कोविडच्या काळात अक्षयला तीन वेळेस हार्ट अटॅक येऊन गेला आणि आता हार्ट ट्रान्सप्लांट करायला सांगितले आहे.
तिघे भावंड आणि आई आणि विवेकाची बायको असा त्यांचा परिवार आहे आणि कमावता विवेक आणि त्याची बायको आहे. पण 21 लाख ही खूप मोठी रकम आहे त्यांच्यासाठी..
अक्षयने पोलिटिकल सायन्स मधून पदवीधर शिक्षण आणि पब्लिक पॉलिसी मध्ये MA पूर्ण करून काही संस्थांमधून कार्यकर्ता म्हणून काम केले आणि तो त्याच्या लहान भावासोबत व्यवसाय करत असताना हा त्याला हृदय विकार सुरू झाला.
मागचं एक वर्ष तो लढत आहे. पण आता विवेकला आपली साथ हवी आहे. आपण जमेल त्या क्षमतेने त्याला मदत करू.
अक्षयचे खूप सारे स्वप्न आहेत. समाजासाठी त्याच्या कुटुंबासाठी आपण त्या स्वप्नांना पंख देऊ..
मदतीची रकम मोठी आहे 21 लाख रुपये, जमेल तितकी रकम आपण देऊ शकता.
हा विवेकचा नंबर आहे 8693055959 यावर सुद्धा आपण करू शकता आणि मदतीसाठी माहितीची लिंक - यावरून तुम्ही आर्थिक मदत करू शकता.
https://www.impactguru.com/fundraiser/help-akshay-kiran-tamaychikar
Account Number:- 37850694213
Name:- Vivek Tamaichikar
Bank Name:- State Bank of India
IFSC No:-SBIN0016846 (Read as SBIN ZERO ZERO ONE SIX EIGHT FOUR SIX)