Greta Thunberg वयापेक्षा मोठं नाव आणि काम: रवीश कुमार

ग्रेटा थनबर्गच्या एका ट्विटने मोदी सरकार हादरले आहे का? ग्रेटाच्या एका ट्विटवर देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाला प्रेस नोट का काढावी लागली? वाचा एनटीव्हीचे संपादक रवीश कुमार यांचा लेख...;

Update: 2021-02-05 14:10 GMT

ग्रेटा थनबर्ग. तिचं नाव तिचं काम तिच्या वयापेक्षा अधिक आहे. ती जमीन, हवा, पाण्याच्या हक्कासाठी सर्व जगातील देशातील सरकार सोबत लढायला निघाली आहे. जलवायू प्रदुषणावर फक्त योजना तयार करून त्यावर काम न करणाऱ्या प्रत्येक सरकारवर ती टीका करते. तिची इमानदारी हवा आणि पाण्यासोबत आहे. तिच्या पराक्रमाला सीमा नाहीत. अन्यथा 16 वर्षाच्या वयात 13 दिवस 8 तास अटलांटिक महासागराच्या लाटांचा सामना करणं प्रत्येकाला जमेलच असं नाही.

ती तिच्या वडिलांसोबत जीव धोक्यात घालून लाटांचा सामना करत राहिली... ती प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जात राहिली. ब्रिटनहून ती न्यूयार्कला पोहोचली. फक्त इतकंच सांगण्यासाठी की, आकाशामध्ये उडणाऱ्या धुरामुळे पृथ्वीवरील हवा खराब होत आहे. या वर्षी ग्रेटा ग्रेटा नोबेल शांती पुरस्काराची दावेदार होती. समुद्राच्यामध्ये एकटी उभी राहून आपल्या निश्चयासाठी परीक्षेला तोंड देणाऱ्या ग्रेटासाठी भारतातून एक संदेश आहे.

दिल्ली पोलिसांनी 300 ट्विट तपासणीसाठी घेतले आहेत. ज्यांची तपासणी होत आहे. पोलिस भलं ही ग्रेटा च्या विरोधात FIR झाली नसल्याचं सांगत असली तरी पोलिस हे तर सांगत आहे की, ग्रेटा ने आपल्या ट्विटरवरून एक टूल किट अपलोढ केलं होतं. त्याची तपासणी होत आहे.  त्या ट्विटवरून देशद्रोहाचं कलम 124A, 153A, 153 आणि 120B नुसार गुन्हा दाखल केला आहे. या टूल किट सोबत ग्रेटा ने मंत्र्यांना टॅग केलं आहे. भारतीय दुतावासाच्या बाहेर प्रदर्शन करण्यासंदर्भात तसंच मीडिया हाऊसच्या बाहेर प्रदर्शन करण्यासंदर्भात तिने ट्विट म्हटलं आहे.

मात्र, भारतीय दूतावासांच्या बाहेर नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या वेळीही प्रदर्शन झाली होती.. शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ देखील प्रदर्शन झाले आहेत. काय टुल किटचं प्रकरण ग्रेटाशी जोडलं जात नाही का? जिच्या ट्विटर हॅन्डलवरून हे ट्विट करण्यात आलं आहे. ग्रेटा ने आजही ट्विट केलं आहे की, ती शेतकरी आंदोलनाच्या सोबत आहे. तिच्या या एका पावलानं देशात विवाद होऊ शकतो.

जगातील सर्व शाळांमध्ये आता या गोष्टीची चर्चा होणार की, ग्रेटा ने ट्विट केलेल्या टूल किट ची चौकशी होणार आहे. या बातम्यानंतर आंदोलनस्थळाच्या चारही बाजूंनी लावलेल्या काटेरी तारा आणि खिळ्यांचे फोटो छापले जातील. छापले जात आहेत. दोन वर्षापुर्वी ग्रेटा च्या आवाहनावर भारतात अनेक शहरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी मानवी श्रृंखला तयार केली होती. भारतातील अनेक शाळा schoolstrikesforclimate चा कार्यक्रम करतात. भारतातील अनेक विद्यार्थ्यांची ग्रेटा प्रेरणा आहे.

स्वीडन ने ग्रेटा च्या नावावर एक डाक तिकिटही काढलं आहे. भारताचे स्वीडन सोबत चांगले संबंध आहेत. जेव्हा ही बातमी तिथं पोहोचेल. तेव्हा भारताची प्रतिमा कशी तयार होईल. स्वीडन च्या वृत्तपत्रात भारतासंबंधी काय छापलं जाईल? जेव्हापासून दिल्ली येथे शेतकरी आंदोलन सुरू झालं आहे. तेव्हापासून काही लोकांना खूप घाई झाली आहे. ते या आंदोलनाला षड्यंत्र म्हणत आहेत. शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणत आहेत. त्यांना इतकी घाई झाली आहे की, आंदोलन स्थळाच्या चारही बाजूंनी खिळे गाडली जात आहेत. हे खिळे पाहून कोणालाही अंदाज यायला हवा की, बोलता बोलता शेतकऱ्यांचा जयजयकार करणारे लोक आता इथंपर्यंत येऊन पोहोचले आहेत की, जे कोणी शेतकऱ्यांचा जयजयकार करतात ते त्यांना आतंकवादी वाटतात.

शेतकऱ्यांच्या वाटेत इतके खिळे आणि काटे लावले आहेत. की, त्यांना आता शेतकरी दिसत नाही. काट्याकडे पाहत पाहत त्यांना आता काट्यासारखं पाहायची सवय लागली आहे. पोलिसांकडे काय सूचना आहेत? हे पोलिस चांगले समजतात… मात्र, त्यांच्या या पावलांनी काय नुकसान झालं ते आपण पाहत आहोत. ज्या जागतिक प्रतिमेसाठी अरबो रुपये खर्च केले. डझनभर परदेशी यात्रा केल्या. ती जागतिक प्रतिमा लोकल लेव्हलने खराब केली जात आहे. ग्रेटा एक पराक्रमी मुलगी आहे. तिच्या सोबत जगभरातील मुली उभ्या राहतील.

Tags:    

Similar News