किराणा दुकानात दारु,संसार उध्वस्त करी

किराणा दुकानात वाईन विक्रीची परवानगी म्हणजे लोकांचे संसार उध्वस्त करण्याची नीती आहे, अशा स्पष्ट शब्दात सरकारचा समाचार घेतला आहे संत जगतगुरू संत तुकोबाराय साहित्य परिषदेचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष बादाडे यांनी...

Update: 2022-01-28 09:41 GMT

गेल्या अनेक वर्षापासून व दिवसांपासून मी खुप अस्वस्थ आहे. दारू पिऊन अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या घटना आता रोजचा भाग बनला आहे. लहान वयातली कोवळी पोरांपासून वृध्दांपर्यंत दारू पिणे आता सवयांचा भाग बनत चालला आहे. श्रीमंताने दारू पिली तर टेंशन घालवण्या साठी पितो असं गोंडस कारण दाखवलं जात. गरीब कष्टकऱ्यांला पिण्याबद्दल विचारल तर तो म्हणतो,थकवा घालवण्यासाठी प्यावी लागते. दारू पिणारा देखिल एक माणूस असतो.मात्र दारू पिऊन त्यात आकंठ बुडुन संसाराची राख-रांगोळी होतांना पाहावलं जात नाही. लहान लहान पोरांचा बाप दारु मुळे मेल्यावर त्यामुलांच्या भविष्य काय असेल या कल्पना देखील करवत नाही. कमी वयात विधवा बनणाऱ्या आपल्या बहिणी ला समाजात किती वाईट अनुभव रोज येतात या बद्दल कोण बोलणार?दारूचे व्यसन ही समाजाला लागलेली कीड आहे. या दारूमुळे व्यक्ती निष्क्रिय,लाचार व गरीब बनतो स्वतःकडे असणारे जी काही संसाधने आहेत ती सर्व यात खर्च होतात.

उदा: जमीन,दागिने,घरातील भाडे,पैसे इत्यादी दारू हा वैयक्तिक समस्या नसून तो एक सामाजिक रोग आहे पाच दहा रुपयांसाठी भिक मागत हातपाय पसरणारी माणसं आपण पहिलेली असाल. या व्यक्तींना स्वतः चा आरोग्याचा कुटुंबाचा,प्रतिष्ठेचा आणि भविष्याचा कुठलाही विचार येत नसतो एका जनावरासारखे या व्यक्ती आपला आयुष्य घालवत असतात दारू पिणारा एकटा दारू नाही पीत.तो आपल्या बरोबर आणखी घेऊन जातो. लवकर सोबत मिळत नसतील तर तयार करतो म्हणजे एखाद्या साथी सारखा हा व्यसनी दुसरे व्यसनी तयार करतात यांचाकडे दारू पिण्यासाठी भरपूर कारण असतात गरिब सर्वसामान्याकडे अगोदरच कमी असलेला पैसा हे दारूवर खर्च करतात. प्रसंगी घरातील भांडी, मुलांचे पुस्तक बायकोचे दागिने या गोष्टी ही निलाजरे प्रमाणे विकतात मुलांचे शिक्षण निट होत नाही कि मुलीचा लग्न. संशोधनानुसार दारू पिणाऱ्या पित्याची मुलगा आपल्या पुढील आयुष्यात दारूचे व्यसनी बनण्याची शक्यता खूप असते.असे हे पिता पुत्राचे व्यसनाचे दुष्ट चक्र चालू राहते.आणि गरिबी आणखी बळकट होते.गावठी दारू बऱ्याचदा विषारी असते.ती प्यालाने अपंगत्व अथवा मृत्यू होतो. याच दारूचे शरीरावर दूरगामी परिणाम होतात.पोट फुगणे पोटात पाणी होने लिवर खराब होणे यासारख्या समस्या नंतर वाढतात याचा कुटुंबावर आणखी आर्थिक ताण पडतो. व्यसनी व्यक्ती नेहमी कर्ज बाजारी असतो..

"संसार उध्वस्त करी दारू,दारूस स्पर्श नका करू."

बहुजन समाजास राजकीय व आर्थिक आधार नाही. यामुळे 'तरुण' मुले खचलेल्या अवस्थेत आहेत. शिक्षण उपलब्धकरुन देणे, समाजास नवचेतना मिळेल,एक नवी दिशा मिळेल. बाबासाहेबांनी म्हटल्या प्रमाणे 'शिका, संघटीत व्हा व संघर्ष करा'..। याठिकाणी एक गोष्ट मला तुम्हांला सांगावीशी वाटते की दारू विकणाऱ्यांनी घरे बांधलेत आणि दारू पिणाऱ्याची घरे गहाण पडलीत . म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगतो व्यसनाच्या आहारी गेलात तर ते व्यसन कधी तुम्हांला त्याचा आहार बनवेल हेदेखील कळणार नाही.भारत हा तरुणांचा देश आहे असे म्हटले जाते. परंतु या तरुणांचे छाती या दारूच्या व्यसनाने लोहाराच्या भात्यासारखी फूस फूस करायला लागलेली आहे.पालकांचेही मुलांच्या संवर्धनाकडे काहीसे दुर्लक्ष झाल्याचे सध्याच्या परिस्थितीवरून दिसून येते ज्या देशातील तरुणच पोकळ असतील त्या देशाची प्रगती कशी होईल. म्हणून दारूसारख्या व्यसनामुळे आयुष्याचा नाश करून घेऊ नका..माझी दारू पिणाऱ्यांना एक नम्र विनंती आहे की दारू पिण्याआधी आपल्या घरी असलेल्या आपल्या माणसांचा थोडा विचार करा. तुमच्यावर अवलंबून असलेल्या तुमच्या मुला बाळांचा आणि त्यांच्या भविष्याचा थोडा विचार करा.दारूचे व्यसन करी घात व्यसनाच्या नादी लागू नका आयुष्य होईल बरबाद..व्यसन कोणतही असलं तरी ते वाईटच व्यसना चे आपल्या शरीरावर आपल्या व्यवसायावर संबंधांवर वाईट परिणाम होतात याच प्रकारे दारूचे ही एक व्यसन आहे. दारूचे हे व्यसन आपल्या प्रगतीला वेसण घालते.दारूच्या व्यसना मुळे संसार उद्ध्वस्त झाल्याचे चित्र आपल्याला गावागावांमध्ये पाहायला मिळते. दारुड्या माणसाच्या घरातील स्त्रिया ह्या नेहमी दु:खात वेदनेत सारख्याच दिसतात देवळांमध्ये ही एवढी गर्दी राहणार नाही इतकी गर्दी दारूच्या दुकानासमोर बघायला भेटते बघाना किती आश्चर्य आहे चांगल्या गोष्टी माणसाला शिकावे लागतात परंतु वाईट गोष्टी मनुष्य आपोआपच शिकून जातो..दारूबंदी आणि दारूमुक्ती चळवळी महाराष्ट्रात सुरुवातीस वर्धा व आता गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी आहे.बिहार, हरीयाना आंध्र प्रदेश आणि तामीळनाडू येथे काही काळ दारूबंदी होती.पण शासकीय दारूबंदीचे एकूण चरित्र संशयास्पद असते. दारूबंदी केवळ कागदावर होते.दारूचे दुकान उघडता येत नाही पण चोरटी दारू चालूच राहते. त्यासाठी पोलिस खाते आणि राजकारण भ्रष्ट होत जाते असा सर्वत्र अनुभव आहे. दारूचे अबकारी उत्पन्न 'बुडाल्याने' काही काळानंतर सरकार दारूबंदी उठवून मोकळे होते. बेकायदा दारू धंद्यावर स्थानिक गुन्हेगारी व भ्रष्टाचारा ची विषवल्ली जोर धरते. हे सत्य पाहता दारूबंदी बरी की मोकळीक हवी हा वाद न मिटणारा आहे.धार्मीक चळवळी आणि स्त्रीचळवळींनी दारूबंदी (दारूपासून मुक्ती) आंदोलनात मोठी भूमिका बजावली आहे महाराष्ट्र-गुजरातमधल्या स्वाध्याय चळवळीने लाखो लोकांना दारूपासून सोडवले. महाराष्ट्रामध्ये वारकरी चळवळी ने देखील अनेकांना माळ घालून 'दारू सोडणे' हे चांगले असल्याचा मानदंड निर्माण केला.

महाराष्ट्रात स्वातंत्र्योत्तर काळात शेतकरी महिला आघाडीने दारू दुकान बंदी चळवळ मोठया प्रमाणावर उघडली आणि ग्रामपंचायत ठराव करील त्या गावात दारूदुकान बंद झाले पाहिजे असा दबाव तयार केला. मात्र दारूवर उत्पन्नासाठी अवलंबून असल्याने आणि स्थानिक राजकारणात दारूचे विशेष महत्त्व असल्याने सरकारने हा विषय आता पर्यंत टाळत आणलेला आहे. ज्या गावात महिला बहुसंख्येने संमती देतील तिथेच दारू दुकान उघडण्याची मुभा असावी. असा पवित्रा अनेक संघटनांनी घेतला आहे.पैसा नसला की माणूस शिक्षण सोडतो,पण पैसा नसला तरिही दारू सोडत नाही. खरं आहे ना?जीवन एकदाच मिळतं, माणसा ला एवढं सुंदर बनवलय तरी माणूस बदलायचा प्रयत्न करत नाही सगळ्यात किमती मानवाच शरीर आहे,व्यसनाच्या आहारी जाऊन का खराब करायचं.?आधीची पिढी जे करणार तेच पुढची पिढी शिकणार. समाजाला व्यसनाच्या जाळ्यातून बाहेर काढून समाज व्यसनमुक्त करणे हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे. व्यसना च्या आहारी जाऊन स्वतःच व घरच्यांचं आयुष्य बरबाद झालेले कोणाला आवडेल ? सुशिक्षित लोकांनी हे विचारात घेतले पाहिजे व प्रत्यक्ष आचरणात आणले पाहिजे, तरच समाजाचे व पर्यायी राष्ट्राचे कल्याण होईल. या विघातक वृत्तींचा समूळ नष्ट करुन समाजाला नवी दिशा देण्याचे काम युवावर्गाने केले पाहिजे.

दारुमुळे कितीतरी संसार उध्वस्त होतांनी मी माझ्या उघड्या डोळ्यानी बघितले आहेत,दारूबंदी आता काळाजी गऱज आहे.व्यसनामध्येच लोकं स्वतः ला जास्तच अडकवून घेत आहेत. दारू पिणे, सिगारेट ओढणे, तस्करी,गांजा असे विविध मादक व्यसन म्हणजे समाजाला लागलेली एकप्रकारची कीडच आहे.मोठ्यांचे अनुकरण करुन बाल्यावस्थेत मुले दारू,सिगारेट यांच्या आहारी जाऊन पोहोचले आहेत ही खरचं मोठी शोकांतिका आहे. समाजात चांगलं व्यक्तिमत्व होण्याच्या वयात नको ते घातक व्यसन लाऊन बसलेत.मग कसा होणार समाजाचा विकास.?

आयुष्य संपवण्यापेक्षा धुम्रपान संपवणं कधीही चांगलं. निरोगी आयुष्याचा संकल्प या क्षणापासुन करा,आपल्या कुटुंबाला ही बहुमुल्य भेट द्या..

किराणा दुकानात दारु,चला संसार उद्धस्त करू..

आता किराणा दुकानात वाईन मिळणार,आतुरता रेशन कार्ड वर गायछाप भेटण्याची,घे डबल चुना आणि मळ पुन्हा पुन्हा महाविकास आघाडी सरकार कर मिळण्यासाठी संपुर्ण महाराष्ट्र बेवडा करतील... एकीकडे गावागावात दारू बंदी चा हा उपक्रम राबवायचा आणि दुसरीकडे असे निर्णय घ्यायचे सर्वाना बेवडा बनवा..शिक्षणाचा प्रसार कसा वाढेल हे बघितलं पाहिजेल तर ते होत नाही.मुख्यमंत्री यांनी आजारातून उठल्यावर पहिलं काम काय केलं तर दारू किराणा दुकानात मिळणार अध्यादेश काढला उद्ध्वस्त सकाळी सकाळी लोक म्हणतील "एक पॉकेट दूध आणि एक बाटली दारी द्या.!"ठाकरे साहेब अजब तुमचे सरकार अजब तुमचे निर्णय..

सामान्य माणसाला काबाडकष्ट कष्ट करून जेमतेम उपजिविका करण्या साठी किराणा सामान वेळेवर घेणे शक्य होत नाही आणि जर का अशा परिस्थिती मध्ये किराणा दुकानात वाईन( मद्य) विक्री सुरू केली तर मानसिक दृष्ट्या खचलेला कुटुंब प्रमुख किराणा सामानाऐवजी मद्यपान करून येईल व मुलबाळ उपाशीच झोपतील व पिऊन येणारा विनाकारण बायकोला मारहाण करेल.यातूनच शासन महिला सबळीकरण मजबूत करणार यात शंकाच नाही किती वाट लावणार हे राजकारणी कोण जाणे?

त्रिमुर्ती सरकार मेरा वचन ही है मेरा शासन आता घरी न्या दारू सोबत रेशन,होय हे माझं सरकार..।

लेखक - शिवश्री संतोष शकूंतला

आत्माराम बादाडे

जिल्हाध्यक्ष पुणे

जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य..

Tags:    

Similar News