इंटरनेटच्या या दुनियेत अनेकांनी समाजात घडणाऱ्या विविध विषयांवर भाष्य करणारे आप-आपले ब्लॉग, Vlog सुरु केले आहेत. नुकतेच शिल्पा शेट्टी यांचे पती राज कुंद्रा यांना पॉर्न व्हिडिओच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. त्यानंतर समाजमाध्यमांवर राज कुंद्रा यांच्याविषयीच्या बातम्या, विश्लेषण करणारे व्हिडिओ मोठ्याप्रमाणावर सुरु झाले.
अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्यावरही उलट-सुलट चर्चा सुरु होत्या. याचा परिणाम तिच्या लहान मुलांवर होत असून तिने याबाबतीत हायकोर्टात याचिका दाखल केली असता हाय कोर्टाने राज्य सरकारला प्रश्न केला आहे की, ब्लॉगर्स संदर्भात तुमचं धोरणं काय आहे? शिल्पा शेट्टीच्या या याचिकेमुळे सामाजिक अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विषय चर्चेत आला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय? त्याचा वापर कसा करावा? तसेच इंटरनेटच्या दुनियेतील स्वातंत्र्य म्हणजे काय ? कुणावर कसं आणि कधी काय बोलावे ? यावर कायदा काय सांगतो?
या सगळ्या प्रकरणावर ॲड. असीम सरोदे यांचे विश्लेषण नक्की ऐका आणि विचार करा