राजकीय मुत्सद्देगिरी काय असते? याचा एक दाखला..

अलिकडे गोपिचंद पडळकर विरोधकांवर चांगलेच तुटून पडतात. मात्र, गोपिचंद पडळकर सारख्या भाजपच्या आशिर्वादाने आमदार झालेल्या व्यक्तीचं राजकीय भवितव्य काय? वाचा चैतन्य सुनंदा शिवलाल जायभाये यांचा विशेष लेख;

Update: 2021-07-02 02:34 GMT

मेवाड चा राजा महारावल याला कैद केलेल्या खिलजी ने राणी पद्मवावतीला पाहण्याची इच्छा बोलून दाखवली व त्याच अटीवर तो महारावल ला सोडेल असं जाहीर करतो. यावर राणी पद्मावती त्याची अट मान्य करते पण तिच्याही काही अटी ठेवते... ज्या पुढील प्रमाणे असतात.. ज्या ब्रह्मचारी वाचून दाखवतो..

१. राणी पद्मावती उसकी ८०० दासीयों के साथ आयेगी।

२. राणी पद्मवती की व्यवस्था जनानखानेमें (महिला गृहात) की जाए, जहाँ एक भी मर्द नहीं होगा।

३. आते ही वो रावल जी से मिलेंगी और उनके रिहाई के बादही वह सुलतान से मिलेगी।

आणि शेवटची अट (हे वाचताना ब्राम्हचारी खिदळतो आणि हे शक्यच नाही असे बोलतो, त्यावर खिलजी त्याला पुढे वाचायला सांगतो. आणि म्हणतो... क्या कहती हैं राणी साहेबा? त्यावर ब्राम्हचारी पुढे वाचताना पुन्हा खिदळतच पुढची अट वाचतो)

४. जबतक राघव चेतन (ब्राम्हचारी) का सर चित्तोड नहीं पहूँचता, पालकीया नहीं निकलेगी!

(आणि मलिक कफूर च्या खांद्यावर डोके टेकवून पुन्हा खिदळतो, कफूरही त्याला दाद देतो)

त्यावर खिलजी बोलतो..

मंजूर हैं। (आणि सगळीकडे हशा पिकतो)

हे ऐकून राघव चेतन च्या हातून संदेश खाली पडतो आणि तो धावत खिलजी च्या जवळ जाऊन बोलतो..

ये तो अन्याय हैं सुलतान, मत भूलीये आप मेरी वजह से राणी पद्मावती को हासील करने जा रहे हैं।

यावर खिलजी खिदळतो आणि पुन्हा एकदा अघोरीपणे बोलतो..

'मंजूर हैं।'

आणि तितक्यात खिलजी च्या मागून कुणीतरी रक्षक राघव चेतन चे तोंड दाबून त्याला बाजूला नेतो आणि इथे scene संपतो होतो..

पुढे दुसऱ्या scene मध्ये..

राणी पद्मावती तिच्या महालात बसलेली असते, तेंव्हा मेवाड चा सेनापती गोरासिंग खिलजी चा संदेश घेऊन येतो.

राणी पद्मावती विचारते..

क्या हुवा गोरासिंग जी?

त्यावर गोरासिंग बोलतो

खिलजीयो ने आपको संदेसा भेजा हैं, अलाउद्दिन ने आपकी सभी शर्तों को स्वीकार किया हैं। और साथ ही में आपके लिये भेट भेजी हैं।

आणि आलेल्या भेटीवरील कपडा काढतो, पुढे काय?

तर त्यात असतं ते राघव चेतन चं उडवलेलं मुंडकं!

आता इतकी छोटी बाब सांगण्यास इतकं लिहिण्याची तसदी का?

तर आज जे पडळकर यांच्या सोबत घडलं त्यावरून मला हा क्षण लगेच आठवला आणि सगळं डोळ्यासमोरून गेलं.

म्हणजे आजच्या राजकारणात पडळकर सारख्या स्वार्थी माणसाचा, भाजपा राघव चेतन सारखा वापर करून घेतीय आणि भविष्यात समोरच्याशी म्हणजेच विरोधकांशी हातमिळवणी करण्यासाठी, विरोधकांच्या अटीनुसार ते पडळकर यांचा राजकीय बळी देतीलही.

कारण भाजपाचा इतिहासही तेच सांगतो, गरज असताना वापरणारे अस्त्र ते वेळ आल्यास त्याला अडगळीत टाकून आपली लढाई जिंकण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात..

आणि असे झाल्यास त्यावेळी पडळकर यांच्या विषयी कुणाला वाईटही वाटणार नाही, कारण पडळकर काही फार तत्वाचा माणूस नाही किंवा लोकनेताही नाही. फक्त बोलघेवडा असलेला हा मनुष्य भाजपा स्वतःच्यासाठी त्याला कुणाच्याही अंगावर उधळून लावते आणि हा बिचारा मनुष्य (म्हणावं की नाही हाच प्रश्न आहे?) लगेच उधळतो. मग ते करताना ही व्यक्ती कधीच विचार करत नाही की याचे काय परिणाम होऊ शकतील!??

अर्थात, राजकीय भविष्यबद्दलच! कारण ज्यांच्या विरोधात नेहमी बोलतो ती लोक आणि त्यांच्या पिढ्या या कित्येक वर्षांपासून राजकारणात आहेत. आणि ते भविष्यात वेळ आल्यावर राणी पद्मावती सारखी भूमिका घेऊन भाजपा ला अट टाकून पडळकरांना तांदळातल्या खड्यासारखं अलगद उचलून बाहेर टाकतील हे मात्र खरं.

- चैतन्य सुनंदा शिवलाल जायभाये

#पडळकर #भाजपा #पद्मावातनीती #राजनीती #बळीचाबकरा #पवार #राजकीयघराने

Tags:    

Similar News