विश्लेषण : गोदी मीडियाचा सूर का बदलला?
धार्मिक द्वेषाचे वातावरण, मनमानी कारभाराच्या या काळात गोदी मीडिया म्हणून काही माध्यमांवर शिक्का बसला. पण आता त्यांचा सूर बदलल्याची चर्चा आहे, हे सत्य आहे का आणि त्याची कारणं काय आहेत याचे विश्लेषण केले आहे दिल्लीतल ज्येष्ठ पत्रकार आशुतोष यांनी...;
सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात न बोलता उलट विरोधकांनाच जाब विचारणारा गोदी मीडिया...अशी प्रतिमा गेल्या काही वर्षात काही न्यूज चॅनेल्सची झाली आहे. पण नुपूर शर्मा प्रकरण, फेक न्यूज यासारख्या प्रकारांमुळे अशा काही चॅनेल्सच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. त्यानंतर मात्र आता गोदी मीडिया शिक्का बसलेल्या माध्यमांनी काही वेळा सरकारच्या चुकीच्या धोरणांवर टीका करण्यास सुरूवात केली आहे. गोदी मीडियाचा सूर का बदलला याबाबत दिल्लीतील ज्येष्ठ पत्रकार आशुतोष यांच्याशी बातचीत केली आहे मॅक्स महाराष्ट्रचे मनोज चंदेलिया यांनी....