कसबा पेठ पोटनिवडणूक गृहीत राजकारणाला धक्का देणारी ठरली का?

कसबा पेठ पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला. पण याचा राज्याच्या राजकीय पटलावर काय परिणाम होईल? भाजपच्या गृहीत राजकारणाला कसा धक्का बसला? आगामी काळातील राजकीय आडाखे काय असतील? याचे राजकीय विश्लेषक डॉ. बाळासाहेब पवार यांनी परखड विश्लेषण केले आहे. नक्की वाचा आणि शेअर करा कसबा पेठ गृहीत राजकारणाला धक्का देणारी पोटनिवडणूक..;

Update: 2023-03-06 16:44 GMT

कसबा व चिंचवड पोटनिवडणूक महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळ्या दृष्टीने विचार करायला लावणारी ठरली आहे. राज्यातील अभूतपूर्व सत्तांतर व त्याला राज्यात जनतेने कसा प्रतिसाद दिला? याची चाचणी घेणारी ही निवडणूक ठरली आहे. तशी ती शिक्षक व पदवीधर निवडणुकीत शिक्षित शिक्षक, पदवीधर आणि कर्मचारी मतदारांनी सरकारला कौल देत नाराजी व्यक्त केली. परंतु त्या निवडणुकीला भाजपने फार गंभीर्याने घेतले नाही. पण विधानसभा पोटनिवडणूक मात्र अनेक अर्थाने राजकीय दिशा देणारी ठरली आहे.

कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुका नेत्यांच्या निधना मुळे होत होत्या. त्यात सहनुभूती महत्वाचा घटक असतो. ही सहानुभूतीची लाट चिंचवड पोट निवडणुकीत दिसली . परंतु कसबा पोट निवडणुकीत मात्र भाजपाला अति आत्मविश्वास नडला. एवढंच नाही तर मतदारांना गृहीत धरणे महागात पडले. कसबामध्ये कोण निवडून येतो हे अजिबात महत्वाचे नव्हते. तर शिंदे -फडणवीस सरकारला पदवीधर व शिक्षक निवडणूकीनंतर शहरी मतदार कसा प्रतिसाद देतो? हे ठरवणारी ही निवडणूक होती. त्यात भाजपाला अपयश आले. हा राज्याच्या नेतृत्वासाठी इशारा आहे. कारण मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री, मंत्री याबरोबरच सर्व सत्ता राबवूनसुद्धा इथे विजय मिळवता आला नाही.

या मतदार संघात ब्राह्मण बहूल व हिंदुत्ववादी मतदार असल्याचा समज माध्यमाने निर्माण केला होता. पण वस्तूस्थिती तशी नाही. या मतदार संघात ब्राह्मण, वेश्या वस्ती, गुन्हेगारीच्या घटनेचा केंद्रबिंदू असणारी वस्ती असा हा मतदारसंघ आहे.

मुख्य मुद्दा भाजपाकडे होता तो म्हणजे हिंदुत्व. पण तोच मुददा इथे मतदारांनी धुडकवला आहे. अतिशय उच्च वर्गाबरोबरच गुन्हेगारी विश्वपण विरोधात गेले तर बुधवारात पण विरोध झाला हे लक्षात घ्यायला हवं. भाजपने ब्राह्मण मतदार गृहीत धरणे चुक ठरले. तर ब्राह्मण महासंघाचे उमेदवार आनंद दवे आपली अनामत रक्कम पण वाचवू शकले नाहीत . म्हणजे ब्राह्मण मतदार हा फक्त हिंदुत्व या मुद्द्यावर आंधळे पणाने मतदान करतो किंवा जात म्हणून मतदान करतो असा समज धुडकावून लावला आहे.

खरे तर काँग्रेस स्वातंत्र्य पूर्व काळापासून हिंदूंचा व पुण्यात ब्राह्मणांता पक्ष होता. काँग्रेसचे सर्वाधिक अध्यक्ष हे ब्राह्मण होते. नेहरू ते गांधी आज ही ब्राह्मण नेतृत्व आहे. काँग्रेसचे बहुतांश नेते हे ब्राह्मण किंवा धर्मांतरीत ब्राह्मण परिवारातील आहेत . पुण्याचा विचार करता धनंजयरावं गाडगीळ, विठ्ठलराव गाडगीळ, जयंतरावं टिळक हे नेते काँग्रेसचे नेते होते. म्हणजे ब्राह्मण समाज पूर्ण पणे काँग्रेस विरोधी मानने चुकीचे ठरते. वरील नेते फक्त स्थानिक नेते नव्हते तर देश व राज्य पातळीवर त्यांनी दीर्घ काळ काँग्रेसचे नेतृत्व केले आहे. खरे पाहता जेव्हा काँग्रेस सत्तेत होती तेव्हा सर्वाधिक सत्तास्थाने ब्राह्मण वर्गाकडेच राहिली व भाजपा सत्तेत असताना तुलनात्मक दृष्ट्या ती संख्या कमी आहे. त्यामुळे कसबा परत काँग्रेसकडे गेला याचा एक अर्थ ब्राह्मण मतदार परत काँग्रेस कडे जाऊ शकतो एव्हढाच घेता येईल.

.रामजन्मभूमी प्रकरणापासून जे धार्मिक ध्रुवीकरण झाले. त्यानंतर हिंदूंना मुस्लिमांची भीती दाखवण्यात आली. एकीकडे मुस्लिम अस्वस्थ केला तेवढाच ब्राह्मण वर्ग ही अस्वस्थ करून भाजपने आपल्या बरोबर फरफटत् नेला हे नक्की. याबरोबरच या वर्गाला नेहमी गृहीत धरले.

फार मोठा कालखंड काँग्रेस मुस्लिमांना गृहीत धरून चालली. पण जेव्हा पर्याय मिळाला तेव्हा मुस्लिम काँग्रेस पासून दूर गेले. असाच काहीसा प्रकार ब्राह्मण मतदाराबद्दल होताना दिसतो आहे.

मुळात रामजन्मभूमी बाबत काँग्रेसने जे केले ते भाजपने केले नाही. राजीव गांधींनी पहिल्यांदा मंदिराचे कुलूप उघडले. नरसिंहराव यांनी बाबरी ढाचा पाडताना बघ्याची भूमिका घेत अप्रत्यक्ष सहकार्य केले. परतू उघड भूमिका घेतली नाही . हे काँग्रेस ला सांगता आले नाही. त्यामुळे हिंदू मत भाजपकडे वळले. या ध्रुवीकरणाला तडे जाऊ लागले आहेत. जर योग्य पक्ष पर्याय असल्यास ब्राह्मण वर्ग भाजपा पासून दूर होऊ शकतो, हे या निवडणुकीत दिसून आले .

रा.स्व.संघाने या निवडणुकीत तटस्थ भूमिका घेतली. आपल्या स्वयसेवकांना चिंचवडमध्ये सक्रिय केले, परंतु कसब्यात मात्र भूमिका घेतली नाही. भाजपमध्ये संघाव्यतिरिक्त आलेल्या लोकांची संख्या मोठी आहे. ते मात्र प्रचारात होते. संघाला ब्राह्मण चेहरा व विचारधारा आहे. परंतु गेल्या पंधरा वीस वर्षात मात्र संघात ब्राम्हणेतरांचीच संख्या प्रचंड वाढली आहे. तिथेही आता ब्राह्मण स्वयंसेवकांची कुचंबणा होताना दिसते आहे. मोदी -शहा यांनी ज्या पद्धतीने संघाची वरिष्ट पातळीवर कोंडी केली आहे, ती कोंडी जर फुटली नाही तर काँग्रेसला मदत करण्याचा पर्याय संघाकडे आहे. त्याची सुरुवात कसब्यातून झाली असे म्हणता येईल.

भाजपाच्या संदर्भात हा विजय महत्वाचा होता. अठ्ठावीस वर्षानंतर त्यांचा पराभव या ठिकाणी झाला आहे. तोही आपण कायम गृहीत धरलेल्या ब्राह्मण मतदारांनी केला आहे. कोणत्याही प्रभागात किंवा मतमोजणी फेरीत भाजप लीड घेऊ शकला नाही. त्यामुळे हा भाजपचा सर्वार्थाने पराभव आहे हे नक्की. तसेच ब्राह्मण उमेदवार दिला नाही म्हणून काँग्रेस जिंकली असे नाही किंवा ब्राह्मण मते ब्राह्मण उमेदवाराला मिळाली असेही नाही. तर मतदान कमी होणे हाच इशारा होता. राग न दाखवता राग काढणे हा प्रकार तिथे दिसला. सत्तधारी लोकांनी प्रचाराचा जो अतिरेक केला तोही मतदारांना रुचला नाही, हा सुध्दा एक मुद्दा आहे,असेही म्हणता येईल.

ब्राह्मण मतदारांनी आणखी एक खूप मोठी काळजी घेतली. सत्तेत भाजपा आल्या पसून मुस्लिम जसा बाजूला टाकला जातो तसाच मुख्य प्रवाहत मुठ भर ब्राह्मण नेत्या मुळे संपूर्ण समाजाला संशयाने पाहिले जाते.. तसेही होऊ दिले नाही . एक तर मतदान केले नाही व केले तर ते ब्राह्मण महासंघाच्या उमेदवाराला केले नाही. आम्ही एवढे संकुचित नाही हे पण यातून दाखवून दिले. त्यामुळेच अत्यल्प मते या उमेदवाराला पडली व ते जे संपूर्ण समाजाचे ठेकेदार बनले होते तो ठेका काढून घेतला. त्यामुळे समस्त ब्राह्मण समाजाचे नेते थेट जमिनीवर आपटले . इथून पुढे त्यांना समाजाची अधिकृत भूमिका मांडून समाजाला अडचणीत आणण्याचा प्रकार करता येणार नाही . हे ही या निवडणुकीत साध्य झाले .

भाजपा नेतृत्वाला ही निवडणूक जय पराजयाच्या पलीकडे विचार करायला लावणारी आहे . परंतु ते विचार करतील व वायफळ वक्तव्य कमी करतील असे वाटत नाही .गिरीश बापट स्थानिक होते ते पुण्यात मान्य होते. पण बाहेरील नेतृत्व थोपवता येणार नाही . चंद्रकांत पाटील यांना पुणेकर पुन्हा स्वीकारणार नाहीत हे ही स्पष्ट झाले व राज्याच्या नेतृत्वाने त्यांना पुढे करून पुन्हा त्यांच्या मर्यादा स्पष्ट केल्या आहेत का? हे सुध्दा यातून दिसून आले.

या निवडणुकीत पैश्याचा वापर झाला. मात्र आता कोणतीही निवडणूक पैसेवाल्याचीच झाली आहे . परंतु थेट मतदारांना पैसे वाटप झाले ही मोठी चर्चा होती. पण ही चर्चासुद्धा या मतदारांनी फोल ठरवली. कारण पैसे घेतले तर किमान मतदान करावे लागते. ते कोणाला केले हा भाग वेगळा. परंतू इथला मतदार विकला नाही हे सुद्धा या निवडणुकीत मतदारांनी दाखवून दिले.

एकूणच कसब्यात ब्राह्मण ही जात म्हणून नाही तर या भागातील बहुजन हा सुद्धा तसाच विचार करणारा आहे. त्यामुळे त्यांची टक्केवारी यांची टक्केवारी असे करता येणार नाही. कसबा निवडणूकीच्या निमीत्ताने कोणत्याही समाजाला अथवा विचारधारेला गृहीत धरता येणार नाही, हेच स्पष्ट होतंय.

Tags:    

Similar News