महाराष्ट्राच्या राजकारणात धुमाकूळ घालणारे बंटी आणि बबली – सुरेश खोपडे
राज्याच्या राजकारणात सध्या बंटी आणि बबली धुमाकूळ घालत आहेत, अशी परखड टीका करत गेल्या काही दिवसात घडणाऱ्या घडामोडींचे विश्लेषण केले आहे माजी पोलीस अधिकारी सुरेश खोपडे यांनी....;
गृह मंत्र्यांनी एका कनिष्ठ अधिकाऱ्याला शंभर कोटी वसूल करण्याचा आदेश दिला होता, असा आरोप माजी पोलीस आयुक्तांनी केला, ही तशी गंभीर घटना. विरोधी पक्ष नेत्याने दखल घेणे रास्त आहे. पण त्याला कांहीं मर्यादा? हे महाभाग मीडियाच्या माध्यमातून स्वतःच तपासी अंमलदार व स्वतःच न्यायाधीश बनून निवाडा करीत आहेत. जनतेला हातोहात फसवून आपला स्वार्थ साधणारी एक जोडी बंटी आणि बबली या नावाने चित्रपटात झळकली होती. ती अनेक क्षेत्रात दिसते.
कोरोनाचा फैलाव वाढतोय. अवकाळी पावसानं बळीराजा धास्तावलाय. पेट्रोल डिझेल भडकलंय........! समस्याच समस्या ! पण टीव्ही लावला की बंटी दिसतो. हातात कागदाच भेंडोले. शंभर कोटी, शंभर कोटी.... याला बदला, त्याचा राजीनामा घ्या....असा आरडाओरडा चालू असतो. त्याचे काम महत्वाचे दिसते आहे. पण बारा कोटी माणसांकडेही पाहायला पाहिजे ना?
आता त्याच्या सोबत पूर्वी महाराष्ट्राच्या गुप्त वार्ता विभागात काम केलेली रश्मी नावाची आयपीएस अधिकारी आली. कालपासून ही बंटी बबलीची जोडी मिडियात धुमाकूळ घालतेय. हा बंटी वरवर साधा जन्माने सत्वगुणी, देव योनीतील ब्राह्मण आहे असे सांगतो. पण त्याच्या अंगात नाना( फडणवीसी?)कळा आहेत. हा सत्तेची पुंगी वाजवत बाहेर पडला. मग चांद्यापासून बांद्यापर्यंत देशमुख,पाटील, माळी, साळी, धनगर,आदिवासी,दलीत,बारा बलुतेदार.... यांची पोर सत्तेच्या पुंगीचा आवाज ऐकून देहभान विसरून लाज लज्जा, उपकार, विचारधारा गुंडाळून याच्या मागे चालू लागली.........आणखी खूप कांहीं !
ही बबली नागपूरला सात वर्षांपेक्षा जास्त काळ होती. बंटीला राखी बांधत सुर जुळले. राखीच्या मोबदल्यात तिला पुण्याची कोतवाली/जहागिरी मिळाली. तिच्या सारा वसुलीच्या सुरस कथा पोलीस स्टेशनमधून आजही ऐकायला मिळतात. बहुमत मिळालेल्या बंटीला महाराष्ट्राची पेशव्यांची गादी मिळावी म्हणून बबलीने महाराष्ट्राचा सगळा गुप्त वार्ता विभाग(SID) कामाला लावला. मग तिने फोन टॅप करून खरी खोटी माहिती बंटीपर्यंत पोचविली. बंटी दिल्लीतील सराईत, तडीपारी भोगलेल्या, खोटे एन्काऊंटर, खून पचविल्याचा दांडगा अनुभव असलेल्या आपल्या फिलॉसॉफर, गाईडकडून वेळोवेळी सल्ला घेत सगळे वातावरण गढूळ ,व घाणेरडं बनवले आहे.
त्या मंत्र्याचे, अधिकाऱ्यांचे काय करायचे ते करा, त्याच्याशी आम्हाला देणे घेणे नाही. बारा कोटी जनतेच्या इतरही समस्या आहेत. इथले प्रश्न घटनात्मक पद्धतीने सोडवावे असेही वाटते. प्रत्येकाला आपले ध्येय साध्य करण्याचा हक्क आहे.पण "साध्याबरोबर साधनही शुद्ध असणे महत्वाचे असते "
तसेच "सगळ्यात दुबळ्या माणसासाठी कामकरा"असे आमचे गांधी बाबा सांगत म्हणून जगभर त्यांचा आदर केला जातो. सनातनी ब्राह्मणी विचारावर आधारित पेशवाई आणण्यासाठी धुंद झालेल्या सत्तेतील बंटी आणि बबलीला हे समजेलच ! नाहीतर समजावून सांगावे लागेल!!
सुरेश खोपडे