भारत-चीन सीमा वाद: भारताने चीनला खरंच जमीन दिली आहे का?
भारत-चीन सीमा करारासंदर्भात आज कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारताने चीनला जमीन दिल्याचा आरोप केला आहे. खरंच भारताने चीन ला जमीन दिली आहे का? या सर्व प्रकरणात फिंगर 3, फिंगर 4 चा उल्लेख होतो. हे फिंगर नक्की काय आहेत? चीनने भारताविरोधात पुकारलेलं हायब्रीड वॉर नक्की काय आहे? पाहा संरक्षण तज्ज्ञ ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांचं विश्लेषण;
सध्या देशभरात भारत-चीन वादाची जोरदार चर्चा सुरु आहे. गुरुवारी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत चीन आणि भारताच्या सीमेवर असलेल्या तणावाबद्दल भाष्य केलं होतं. मात्र, आज सकाळी (12 फेब्रुवारी 2020 ला) कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारताने चीन ला दिल्याचा गंभीर आरोप केला आहे.
"नरेंद्र मोदींनी चीनसमोर मान झुकवली आहे. आपली जमीन फिंगर 4 पर्यंत आहे पण पंतप्रधान मोदींनी फिंगर 4 पासून फिंगर 3 पर्यंतची जमीन चीनला देऊन टाकली आहे.''
तर दुसरीकडे संसदेत बोलताना देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी
" मला सभागृहाला हे सांगण्यात अतिशय आनंद होतो आहे की, आपला दृढ निश्चय आणि दीर्घकालीन चर्चेचा परिणाम म्हणून चीनबरोबर पँगोंग नदीच्या दक्षिण आणि उत्तर किनाऱ्यांवरून सैन्याने मागे हटण्याचा करार झालेला आहे."
दरम्यान, या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आम्ही ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांच्याशी चर्चा केली...
ते म्हणतात... भारताची चीन ने जमीन बळकावलेली नाही. चीन विरोधात भारताने केलेल्या रणनितीचा हा विजय आहे. कोरोना काळात चीनने भारताचा पुरेपुरे फायदा घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा प्रयत्न भारतीय सैन्याने हाणून पाडला. चीनने लडाख पूर्व भागात ५ मे ला अतिक्रमण केले होते. मात्र, सैन्याच्या पातळीवर झालेल्या या चर्चेतून जरी चीन ने माघार घेण्याचं म्हटलं असलं तरी तरी चीनी सैन्य माघार घेणार का? असा सवाल महाजन यांनी केला आहे.
तसेच अतिक्रमण केलेल्या भागातून चीन खरचं जाणार का? चीन आपला शब्द पाळणार का? येत्या २ ते ३ आठवड्यात चीन सैन्य माघारी परतले. तरच या कराराचं महत्त्व टिकवून राहिलं. जरी चीनने माघार घेतली असली तरी ३६० दिवस २४ घंटे 'हायब्रीड बॉर' हे सुरुच राहणार आहे.
मात्र, हे 'हायब्रीड वॉर' काय असते? याला भारताने कसं तोंड द्यावं? भारताची आर्थिक परिस्थिती बळकट करणे किती गरजेचं आहे? त्याच बरोबर पाकिस्तान-चीनने एकत्रित येऊन पुकारलेल्या आव्हानाचा भारत कसा मुकाबला करु शकतो ? असे एक ना अनेक प्रश्नांशी उत्तरे ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांनी मॅक्समहाराष्ट्र शी बोलताना दिली आहेत.
- ब्रिगेडिअर हेमंत महाजन