Comptroller and Auditor General of India | CAG ने दाखवलेले घोटाळे कसे गायब होतात
वेगवेगळे घोटाळे आणि राजकारण या दोघांचा संबंध कायम राहिलेला आहे. पण तुम्हाला माहित आहे का असे अनेक घोटाळे आहेत ज्याची चर्चा सुद्धा होत नाही. अनेक वेळा आपण पाहिले आहे की, अचानक काही घोटाळे चर्चेत येतात, त्यावरून मोठं वादंग होतं आणि कालांतराने त्या घोटाळ्यांची चर्चा पूर्णतः विरून जाते. यासाठी अनेक कारण आहेत कधी सरकार बदलते, कधी पक्ष बदलतो, कधी विरोधातून सरकारमध्ये उडी मारली जाते अशी अनेक करणे आपण बघितलेली आहेत. पण याखेरीस सुद्धा अनेक मोठे घोटाळे आहेत जे कधी समोरच आले नाहीत आणि आले तर ते दडपून टाकले गेले. सरकारने केलेले अनेक घोटाळे कॅगने समोर आणले आहेत. अलीकडेच कॅगचा (Comptroller and Auditor General of India) अहवाल संसदेत सादर केला गेला. त्यातील काही नमुने धक्कादायक आहेत. जे कधीच समोर आले नाहीत. हजारो लाखो कोटींचे हे घोटाळे आहेत. या सगळ्याची कधीच कुठे चर्चा का होत नाही? हे घोटाळे कॅगच्या अहवालात दडपून ठेवण्याचा व गायब करण्याचा प्रयत्न होतो का? या प्रश्नांची उत्तर समजून घेण्यासाठी राज्यशास्त्राचे अभ्यासक सुहास पळशीकर यांचे हेडलाईन्सच्या पलीकडे या कार्यक्रमातील विश्लेषण नक्की पहा...