उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचा इतका आनंदोत्सव का?

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणाने पुरोगोमी लोकांना का आनंद झाला. मात्र, भाजप आणि शिवसेना एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत का? वाचा दोनही पक्षातील कठ्टर हिंदूत्वाचं विश्लेषण करणारा सुनिल तांबे यांचा लेख;

Update: 2020-10-28 03:48 GMT

अधिकत आनद झाला, भाषणाने अनेक स्कुलक शिवसेना दसरा मेळाव्यातील भाषण भाजप-संघ परिवाराला फैलावर घेणारं होतं. शिवसेना, संघ आणि भाजप हे हिंदुत्ववादी राजकीय पक्ष वा संघटना आहेत. त्यांच्यातील मतभेद राजकीय आहेत. सांस्कृतिक पातळीवर हे दोन्ही राजकीय पक्ष सांस्कृतिक फॅसिझमचा पुरस्कार करणारे आहेत. सांस्कृतिक फॅसिझमची लक्षणं पुढीलप्रमाणे सांगता येतील.

१. देव, धर्म आणि राष्ट्र-राज्य यांची एकात्मता मांडणं…

२. त्याच्या आधारे जे कोणी परके त्यांना दुय्यम नागरिकत्वाचा दर्जा देणं. त्यासाठीच सुधारित नागरिकत्व कायदा आणण्यात आला. पुढे लोकसंख्या नोंदणीचा कायदा आणण्यात आला.

३. जे परके असतात वा जे त्या परक्यांची बाजू घेतात त्यांना सतत अराष्ट्रीय, देशविरोधी संबोधण्यात येतं. तसा प्रचार सरकारी पातळीवरून केला जातो.

४. झुंडीला चिथावून परकीयांचा वा विरोधकांचा काटा काढला जातो. उदा. झुंडबळी, गोरक्षकांचा हैदोस वा समांतर सरकार,

५. व्यक्तीने आपलं अस्तित्व समाज अर्थात राष्ट्र-राज्यामध्ये विलीन करणं म्हणजेच व्यक्तीस्वातंत्र्य या मूल्याला नाकारणं.

६. संघ, भाजप, शिवसेना या तिन्ही राजकीय संघटनांनी त्यामुळे सुधारित नागरिकत्वाचा कायदा, लोकसंख्या नोंदणी आणि जम्मू-काश्मीरमधील जनतेच्या लोकशाही हक्कांची गळचेपी याला पाठिंबा दिला आहे. बाबरी मशीद पाडण्याच्या बेकायदेशीर कृत्याचं समर्थन केलं आहे.

७. सांस्कृतिक फॅसिझमचं आणखी एक वैशिष्ट्य असं की सरकार कोणत्याही विचाराच्या राजकीय पक्षाचं आलं तरिही त्याला हे कायदे व संस्कृती बदलणं अवघड वा अशक्य व्हावं.

८. कारण हिंदू ही बहुसंख्यांक समाजाची राजकीय ओळख आहे. तो व्यक्तीचा धर्म नाही. याला मान्यता मिळते. ही राजकीय ओळख बिगर हिंदूंनीही स्वीकारली पाहीजे असं वातावरण-- सामाजिक, राजकीय आणि कायदेशीर, तयार करण्यात येतं.

दुर्दैवाने स्मृती कोप्पीकर (द क्विंट मधील लेख), जतीन देसाई (फेसबुकवर सदर लेखाचं स्वागत) या माझ्या मित्रांनी उद्धव ठाकरे यांच्या आक्रमक शैलीचं स्वागत केलं आहे. स्वातंत्र्य चळवळीची मूल्यं-- लोकशाही, व्यक्तीस्वातंत्र्य, सर्वधर्मसमभाव, सामाजिक न्याय, वंचितांचा विकास, म्हणजेच हा देश एका धर्माचा नाही, यांना संघ, भाजप, शिवसेना यांची मान्यता नाही. त्यांच्यातले राजकीय मतभेद बेगडी आहेत, हे भान काँग्रेसी, आंबेडकरवादी, ओबीसीवादी, मार्क्सवादी, समाजवादी इत्यादींनी ठेवायला हवं.

सांस्कृतिक फॅसिझम इटली वा जर्मनीतील राजकीय फॅसिझमपेक्षा भयंकर आहे. दुसर्‍या महायुद्धानंतर या दोन्ही देशांतील फॅसिझम संपुष्टात आला. तिथे पुन्हा उदारमतवादी मूल्यांची प्रतिष्ठापना झाली.

Tags:    

Similar News