कोरेगाव-भीमाची लढाई अजून सुरु आहे...
शौर्याची परंपरांचे स्मरण करण्याठी दरवर्षी १ जानेवारीला कोरेगाव भीमाच्या विजयस्तंभावर लाखो लोक येतात. कायदेशीर लढा काय आहे? सरकारी घोषणा फसव्या आहेत का? कोर्टाचे निकाल लागून जिल्हाधिकारी जागेचा वाद निकाली का काढत नाही? भीमा कोरेगावची कायदेशीर लढाई लढणारे दादाभाऊ अभंग यांच्याशी आमचे प्रतिनिधी किरण सोनवणेंनी साधलेला खुला संवाद...
गेली 12 वर्ष दादाभाऊ अभंग हे कोरेगाव-भीमा विजय स्तंभ येथील 3 हेक्टर 86 आर जमिनीच्या अतिक्रमणाच्या मालकीचा लढ़ा लढत आहेत. 1 जाने 1818 मध्ये ब्रिटिश आणि पेशवे यांच्यात झालेली ही अदभुत अशी लढाई असून ज्यात ब्रिटीशांच्या बाजूने केवळ 500 सैनिक होते ज्यात प्रामुख्याने महार संख्येने अधिक होते. इतर मराठा, मुस्लिम अश्या सामाजातील सैनिक होते, या 500 सैनिकानी त्वेशाने लढून पेशव्यांच्या 25000 हजार सैन्याची धूळधाण उडवली. या सैनिकांच्या शौर्याचा गौरव म्हणून 1824 मध्ये ब्रिटीशानी हा जय स्तंभ उभा केला.
जय स्तंभच्या मालकीची इथे 3 हेक्टर 86 आर जमीन असून याची देखभाल करण्यासाठी ब्रिटीशानी खंडोजी माळवदकर यांची नेमनुक केली, आणि माळवदकर कुटुंबाला उदर निर्वाह साठी 260 एकर जमीन दिली. मात्र गेल्या काही वर्षात माळवदकर कुटुंबियांची नियत फिरली. त्यांनी सरकारी कार्यालयातील हाताशी धरून ही जमीन हड़पन्याचा प्रयत्न चालवला आहे, त्याला गेली 12 वर्ष दादाभाऊ अभंग लढ़ा देत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अनेकदा या विजय स्तंभला भेट देत आणि आपल्या शौर्याची परंपरचे स्मरण करण्यासाठी समाजाला आवाहन करत, तेंव्हा पासून लोक याठिकाणी दरवर्षी 1 जाने अभिवादन करण्यासाठी येत असतात.
लाखो लोक दर वर्षी येतात मात्र त्यांच्या या विजय स्तंभची लढाई दादाभाऊ अभंग एकाकी पद्धतीने लढत असल्याची कल्पना नाही. इथे भेट देणाऱ्या लोकांनी हर दादाभाऊ अभंग यांच्या न्यायालयीन लढाई साठी प्रत्येकी 100 रुपये जरी दिले तर ते ही लढाई अधिक चांगली लढु शकतील. दर वर्षी सरकार काही घोषणा करते यावेळी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी 1 कोटी रुपये जाहीर केले यापूर्वी अजित पवार यांनी 3 कोटी जाहीर केले मात्र सर्व हवेतल्या घोषणा आहेत.
सरकारने तीन कोर्टात लढाई हरलेल्या माळवदकर यांच्याकडून ही जागा प्रथम काढून घ्यावी, मात्र याकेस मध्ये ना जिल्हाधिकारी जबाब नोंदवीत आहे, ना बार्टी , सर्वांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे, ही न्यायालयीन लढाई कुठल्या पातळीवर आहे ते ऐका दादाभाऊ अभंग यांच्याकडून....