गोदी मिडीयाला भारत जोडो यात्रेचं अपचन – रविश कुमार
भारत जोडो यात्रा गेल्या महिन्याभरापासून यशस्वी रीत्या सुरू आहे. तामिळनाडू तसेच केरळ पादाक्रांत करत राहूल गांधी यांच्य़ा नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेचा झंजावात आत कर्नाटकात पोहोचला आहे. पण तरीही गोदी मीडीय़ा मात्र भारत जोडो यात्रेच्या साध्या बातम्यासुध्दा प्रसिध्द करत नाही. का ते जाणून घेण्यासाठी वाचा रविश कुमार यांचा लेख...;
अमर उजाला आणि दैनिक जागरण हे दोन्ही हिंदी प्रदेशातील दोन मोठी वृत्तपत्र आहेत. या दोन्ही वृत्तपत्रांच्या मुख्य अंकामध्ये १२-१२ पानं असतात. तरीही भारत जोड़ो यात्रेच्या बातम्या छापण्यासाठी त्यांना जागा मिळत नाही. दैनिक जागरण एक साधी बातमी सोडा फोटो देखील नाही. अमर उजाला मध्ये सिंगल कॉलम च्या एक चतुर्थांश भागात सोनिया गांधी या भारत जोडो यात्रेत सहभागी होणर असल्याची सुचना दिल्यासारखी बातमी लावली होती. अशा प्रकारे हिंदी बातम्यांमधून काँग्रेसच्या या यात्रेला गायब करण्यात आले आहे.
अशा रीतीने विरोधी पक्षाला सातत्याने बातम्यांमधून गायब केलं जातं जेणेकरून जनतेला विरोधी पक्ष लाचार वाटला पाहिजे. याला पर्याय नाही.गोडी मीडिया हा विरोधक आणि लोकशाहीचा मारेकरी आहे. त्यांनी विरोधकांना अदृश्य केले आहे. गोडी मीडियाशी न लढणारा कोणताही विरोधी पक्ष लोकशाहीची भूमिका बजावत नाही, असे माझे सुरुवातीपासूनच मत आहे. अनेक विरोधी नेत्यांनी आता प्रसारमाध्यमांबाबत जनतेचे प्रबोधन करण्यास सुरुवात केली आहे, परंतु त्यांची वृत्ती फारच सैल आहे. ट्विटरवर ट्विट करणं म्हणजे ते आपलं काम समजतात.
जयराम रमेश यांनी गोदी मिडीया आणि अर्ध गोदी मीडियाच्या असत्याला आव्हान दिलं आहे पण तेवढंच पुरेसं नाहीये. अनेक निवेदकांनी माफी मागावी लागली आहे पण फक्त ट्विटर वर आवाज उठवल्याने जगाला ठाऊक होणार नाही. याची तर बातमीही छापली जात नाही. आपण असं म्हणू शकता की जयराम रमेश यांनी गोदी मिडीयावर कारवाई करणं सुरू केलं आहे पण त्यांचं लक्ष हे अगदीच लहान लढतीवर आहे. राहूल गांधी यांनी माध्यमांच्या राक्षस स्वरूपाला उघडं पाडलं आहे पण जयराम रमेश मात्र त्याला ओळखू शकलेले नाहीत. पदयात्रेच्या घोषणेसाठी बोलावल्या गेलेल्या पहिल्या पत्रकार परिषदेत आणि रामलीला मैदानात राहुल यांनी स्पष्ट सांगितलं होतं की माध्यमांनी जनतेचा आवाज़ आणि विरोधी पक्षाचा आवाज़ ग़ायब केला आहे त्यामुळेच त्यामुळेच पदयात्री बनत आहोत. कांग्रेस ने त्यांच्या या वक्तव्यालाच गायब केलं आहे.
जयराम रमेश यांनी हिंदी वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्यांचं योग्य आकलन केलं पाहिजे, त्यानंतर वक्तव्य केलं असतं की माध्यमं भारत जोड़ो यात्रा कवर करत आहेत. ही यात्रा माध्यमांमधून गायब करण्यात आली आहे. माझ्या नज़रेत गोदी मीडिया आणि अर्ध गोदी मीडिया ने भारत जोड़ो यात्रेला दुर्लक्षित केलं आहे. वृत्तवाहिन्यांमधूनही ही यात्रा गायब आहे. एक वाहिनी तर आणखी हुशार आहे. टीव्ही वाहिनीवर यात्रा प्रसारीत करत नाहीत पण यू ट्यूब वर प्रसारीत करतं. तशीच युक्ती सर्वांनी केली आहे. बाक़ी जयराम रमेश हे हुशार आहेत.
जर हीच पदयात्रा भाजपची असता आणि अमित शाह 26 पायी चालत असते तर त्याचं कव्हरेज़ कसं झालं असतं याचा विचार करा. प्रत्येक पानावर अमित शाह यांचे पायी चालतानाचे फोटो शिवाय नव्या आशेचं जग, नव युग आणि नव्या संचाराच्या बातम्या आणि विश्लेषण माध्यमांमध्ये पाहायला मिळाले असते. राहुल गांधी यांच्यासारखं अमित शाह आणि नरेंद्र मोदी पावसात भिजत भाषण देत असते तर त्या फोटोला पुर्ण पानभर छापलं गेलं असतं. त्यांना अवतार म्हणून संबोधलं जातं. वृत्त वाहिन्यांनी दिवस रात्र मोदी किती महान आहेत हे दिवस रात्र चालवलं असतं. काँग्रेसला शिकलं पाहिजे. पाऊस पडत राहिला पाहिजे आणि रॅलीला संबोधीत करत राहावं.
जो पर्यंत प्रत्येक नागरिक, प्रत्येक नेता हज़ारों करोड़ रुपयांच्य़ा ताक़तीने चालणाऱ्या मीडियासोबत लढणार नाही, प्रत्येक दिवस प्रश्न विचारणार नाही तोपर्यंत य़ा लोकशाहीत समतोल येणार नाही. विना संतूलित असलेल्या शक्तीमुळे लोकशाहीचं रुपांतर हुकूमशाहीत होतं.