संगीत नाटकाचा कर्ता

मराठी संगीत नाटकाची १९ व्या शतकात पायाभरणी करणारे ज्येष्ठ नाटककार अण्णासाहेब किर्लोस्कर यांचा आज १३५ वा स्मृतिदिन. त्या निमित्ताने ज्येष्ठ पत्रकार भारत कुमार राऊत यांनी त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा...

Update: 2020-11-02 04:30 GMT

मराठी संगीत नाटकाची १९ व्या शतकात पायाभरणी करणारे ज्येष्ठ नाटककार अण्णासाहेब किर्लोस्कर यांचा आज १३५ वा स्मृतिदिन. त्यांनी १८८० मध्ये 'संगीत शाकुंतल' हे त्यांनी लिहिलेले संगीत नाटक रंगभूमीवर आणले व मराठी संगीत रंगभूमीच्या दैदिप्यमान इतिहासाचा पहिला अध्याय लिहिला.

बलवंत पांडुरंग उर्फ अण्णासाहेब किर्लोस्कर यांचा जन्म कानडी भाषक धारवाड जिल्ह्यातला. त्यांचे वास्तव्यही बहुतांश काळ तिथेच होते. मात्र, तरीही त्यांनी नाट्यलेखन मात्र मराठीत केले.

कालिदासाच्या 'अभिज्ञात शाकुंतलम्' या मूळ संस्कृत नाटकावरून किर्लोस्कर यांनी 'संगीत शाकुंतल' हे नाटक लिहिले. या नाटकात पदे होती. रंगमंचावर नट ती स्वत: गाऊ लागली. स्वत: किर्लोस्कर नाटकात भूमिका करून नाट्यपदेही गात. प्रेक्षकांना हा प्रकार फार भावला व त्यांनी हे नाटक डोक्यावर घेतले.

अण्णासाहेबांनी तीनच वर्षांत १८८३मध्ये त्यांनी 'संगीत सौभद्र' लिहिले व रंगमंचावर आणले. त्यांनी नंतर 'संगीत रामराज्यवियोग' हे आणखी एक संगीत नाटक लिहायला घेतले पण ते पूर्ण होण्यापूर्वीच २ नोव्हेंबर १८८५ रोजी मृत्यूने त्यांना गाठले.

मराठी संगीत नाटकाचा कर्ता वयाच्या अवघ्या ४२ व्या वर्षी आयुष्याच्या रंगमंचावरून कायमची एक्झिट घेऊन निघून गेला.

- भारतकुमार राऊत

Tags:    

Similar News