Annabhau Sathe anniversary: अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य नक्की कोणाच्या विरोधात होतं?
अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य नक्की कोणाच्या विरोधात होतं? Annabhau Sathe anniversary Why The poet, activist and writer’s annanbhau’s literature is important;
जग बदल बदलुनी धाव
सांगून गेले मज भीमराव,
रुतून बसला काय,
का येरावत,
अंग झाडूनी निघ बाहेरी,
ओ बिनी वरती धाव,
अवघ्या 49 वर्षाचं आयुष्य लाभलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी प्रतिकूल परिस्थिती शोषित पीडित दुर्लक्षित समूहाचे विदारक चित्रण आपल्या साहित्यातून मांडलं. श्रीमतांकडून होणारे गरिबांचे शोषण आणि चातुर्वण्य व्यवस्थेने अस्पृशांची केलेली वाताहत या प्रश्नांवर अण्णाभाऊ साठे यांनी साहित्यातुन प्रहार केला. म्हणून अण्णाभाऊ खऱ्या आंबेडकरी साहित्यवादी होते. असं मत कवी लेखक प्रा.डॉ. सत्यजित साळवे यांनी अण्णाभाऊं साठे यांच्या साहित्याला उजाळा देताना व्यक्त केलं आहे.