ग्रामीण लग्नसंस्था :असला दादला नको ग बाई.......
करोना काळात कमी लोकांमध्ये लग्न होवु शकते हे जवळ जवळ पटले नको त्या गोष्टींना फाटा देवुन कमी खर्चात लग्न केली गेली ही स्वागतार्ह बाब करोना काळात दिलासा देणारी ठरली. ही जरी आनंदाची बाब असली तरी शेतकरी नवरा नको ग बाई … ही लाईन मात्र करोना काळातही चालु राहिली. गावागावात शेतकरी लग्नाळू मुळे आजही बघायला मिळताय. जे आपल्या लग्नाचा विषय टाळतांना दिसताय. लग्न तर करायच मात्र मुलगी मिळे ना ही स्थिती अनेक शेतकरी मुलांची आहे, याविषयी विचार मंथन केला आहे मॅक्स वुमन चा संपादिका प्रियदर्शनी हिंगे यांनी...;
शेती करणा-या मुलांना मुलीच मिळत नसल्याची खंत अनेक ग्रामीण भागातुन समोर येत आहे. स्वतहा शेतक-याची मुलगी शेतकरी नवरा नको ग बाई..... अशीच भुमिका घेतांना दिसत आहे. कुठल्याही प्रकारची शासकीय किंवा अशासकीय अशी कमी पगारावरची नोकरी असलेला आणि जिल्हा किंवा तालुका स्तरावर राहणाराच मुलगाच हवा असा हट्ट केवळ मुलींचा नाही तर मुलीच्या पालकांचाही असलेला ग्रामीण भागात दिसून येतो. मग त्यासाठी सगळ्या आयुष्यभर कर्जाचा डोंगर वाह्न्याचीही तयारी त्यासाठी असलेली दिसून येत.
अत्यंत विरोधी वाटणारे चित्र हे आजच्या ग्रामीण भागातले धगधगते वास्तव आहे. या वास्तवाला अनेक पैलु आहेत. 2006 मध्ये तेव्हाचे पंतप्रधान मनमोहनसिंग वर्धा जिल्ह्यातील वायफड या गावी आले होते.तेथील काही शेतकऱ्यांशी ते संवाद साधत होते. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या तरुण मुलीने पंतप्रधानांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना अगदी स्पष्टपणेसांगितले , 'एक वेळ मी जीव देईन, पण कोणत्याही परिस्थितीत शेतकरी मुलाशी लग्न करणार नाही. यावेळेस या मुलीचे उत्तर फारसे कोनीही मनावर घेतले नाही. मात्र विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील वणीच्या 21 वर्षीय दीपाली कुत्तरमारे या तरुण मुलीने स्वतचे शब्दश खरे केले.
16 एकर जमिनीचा मालक असलेला शेतकरी म्हणजे सरकारी व विद्वानांच्या भाषेत 'मोठा' शेतकरी. 'श्रीमंत'शेतकरी असे असले तरी दीपालीला व तिच्या सारख्या असंख्य मुलींना ग्रामीण भागात असणारा नवरा नको आहे. २००६ मध्ये दीपालीची हि आत्महत्या स्थानिक बातमीच राहील त्यावर कधीच कोत्याही माध्यमांना प्रकाश टाकावासा वाटला नाही मात्र हि परिस्थतीत जेव्हा वेगळे रूप धारण करून समोर येऊ लागली तेव्हा मात्र माध्यमांना याची दखल घ्याविच लागली. भूमिहीन, शेतकरी तसेच ग्रामीण भागात वास्तव्यास असणा-या मुलांना लग्नासाठी वधू मिळणेच कठीण झाले तेव्हा मुलींची तसेच पालकांची मानसिकता बदलण्यात यावी असा सूर लावला जातो आहे. " वेळ प्रसंगी जीव देईल मात्र ग्रामीण भागातील मुलाशी लग्न करणार नाही" अशी टोकाची भूमिका जरी चुकीची असली तरी या भुमिके पर्यन्त मुली का पोहोचत आहेत याचा गांभीर्याने विचार होणे नितांत आवश्यक आहे.
अशीच मेंदूला विरोधी वाटणारी घटना, दुष्काळाला ट्रस्त होऊन एका घरात आत्महत्या झाली होती, या घरातळ्ल्या महिलांशी बोलताना माझ्या लशात आले कि घरातल्या पुरुषाने १० हजारासाठी आत्महत्या केली मात्र त्याच घरातील सुनेकडे ५०हजाराची रक्कम बचतीत होती. हे कळताच मला ती बाई एखाद्या क्रूर माणसाप्रमाणे आत्मकेंद्री वाटली. पुढे बोलण्यात मात्र त्या माउलीच्या दुखाचे मूळ समजले. डोळ्याच्या पाणावलेल्या कडा पदराने टिपत ती सांगत होती,"आमच्या बापाकडे पैसा नव्हता म्हणून आम्ही या घरात पडलो ताई, आलो तेव्हा पासून गुरावानी राबतोच आहे, कुणाचे प्रेमाचे दोन बोल आही. मला दोन लेकी आहेत, त्यांना मी चांगल्या घरात पाठवीन, काम करतीन पण प्रेमाचे दोन बोल एकत सुखाचे चार घासतरी माझ्या पोरीच्या भाग्याला येतील. त्यासाठी पै पै पोरगी झाली तेव्हा पासुन जोडते आहे." स्वतच्या पोटाला चिमटा काढत या माउलीने ते पैसे जमवले होते अगदी अनेक वर्ष स्वतला साडी घेण हि तिने टाळल होते ते केवळ आपल्या मुलीला सुखाने तिच्या संसारात रमता याव म्हणुन. मुलीच्या संसारासाठी ती माउली त्या घरात नांदत होती. आपल्या पुढची परिस्थिती आपण बदलू शकत नाही मात्र या परिस्थतीत मुलीला पडू द्यायचे नाही म्हणून या आईने तिच्या कक्षेत असलेले उत्तर शोधून काढले होते.
एकीकडे मुलगी नको म्हणुन विविध मार्गाने तिला खुडून टाकण्याचे प्रकार सुरु आहेत मात्र दुसरीकडे पुढची पिढी घडवणारी जन्म देणारीच मिळत नाही म्हणून अनेक ग्रामस्थ चिंतातूर झालेले दिसत आहेत. मात्र त्यासाठी पुन्हा मुलींनाच दोष देण्याचे सत्र सुरु असल्याचे आपल्या लशात येईल. मुली शिकल्या कि असे वागतात, शिंग फुटतात, डोक्यावर बसतात अशी विविध प्रकारे तिला दुषण लावण्यात येतात. मात्र ग्रामीण भागातील स्त्रियांची स्थिती पाहिली तर शिकणा-या मुलीना शिंग का फुटत आहेत याचे उत्तर निश्चित मिळेल. एका जागतीक सर्व्हे नुसार जागतील अन्नाध्न्य उत्पादन प्रक्रियेत महिलांचा वाट ८३% इतका आहे मात्र त्यातुन तयार होणा-या नफ्यावर मात्र केवळ १०% उत्पन्न किंवा मालकी हक्क महिलांना दिला जात आहे. काम करायचे मात्र त्यावर होणा-या नफ्यावर कुठल्याही प्रकारे मालकी हक्क मिळत नाही . हे केवळ जागतीक पातळी आहे असे नाही तर ग्रामीण भागातील स्पष्ठ करणारे चित्र आहे.
ग्रामीण महिलांवर पडणारा दुहेरी बोजा हा तर तिच्या आरोग्याची दैना करतोच मात्र त्याबरोबर तिची कुठल्याही प्रकारे आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत करत नाही. सतत कामात व्यग्र आनी कुठल्याही अधिकाराशिवाय हे चित्र समोर दिसत असताना मुली आता विचार करू लागल्या आहेत. ग्रामीण भागाच्या तुलनेने शहरी भागात आर्थिक उत्पन्न मिळवण्याची साधने तर मिळतात मात्र त्या बरोबरीने या उत्पन्नाचा स्वतच्या विकासासाठी वापर करता येतो. जो ग्रामीण भगात त्या अर्थाने स्व्पवतच आहे. हा सारासार विचार करण्याची शक्ती आता मुलीकडे येऊ लागली आहे. ग्रामीण भागात रोजचाच झालेला घरगुती हिसाचारा विरुध्द शहरी भगात असल्याल दाद मागणे तुलनेने सोपे जाते. ग्रामीण भागात आजही पुरुषसत्ताक्तेची मूळ घट्ट रोवलेली आहेत.
अश्या प्ररीस्थितीत शोषण होताना समोर मुलीना दिसत असताना या शोषणातून सुटकेचा उपाय म्हणून त्या लग्न या संस्थेकडे बघतात. त्यामुळेच १२वि होताच त्या डी.एड. किंवा एखाद्या डिप्लोमाला प्रवेश घेतात. आपल्या लग्नव्यवस्थेत सतत स्त्रीला दिले जाणारे दुय्यम स्थानामुळे मुलग्या पेशा जास्त शिकलेली मुलगी नको अशीच भूमिका अनेकांची असल्याने या मुलींचा मार्गही सुकर होतो. यातूनही जरी कोणी लग्नास संमती दर्शवली तरी त्या मात्र ठाम पणे ग्रामीण भागात वास्तव्यासाठी नकार देतात. त्याच्या या नकारामागील त्यांची भूमिका समजून घेणे नितांत आवश्यक आहे. एका शोषणाची साखळी थांबवण्यासाठी वेगळ्या प्रकारच्या शोषणाची साखळी त्यामुळे तयार होऊ लागली. ग्रामीण भागातही जर स्त्रीला किमान माणूस म्हणून सन्मानित वागणुक दिली जाऊ लागली तर हि साखळी कुठेतरी नक्की खंडीत होईल.
पुरुषसत्ताकतेची मूळ नष्ट करणे सोडून आणि एक वेगळी शोषणाची कडी तयार होताना दिसत आहे. शेतकरी मुलगा असेल आणि जर मुलगी मिळत नसेल तर अश्या वेळेला मुलगी किठ्ल्याही धर्माची जातीची करण्यास ते तयार होतात. हे चित्र जरी प्रमाणात सकारात्मक दिसत असले तरी, सकारात्मक केवळ या चित्राची कडाच आहे, पूर्ण चित्र अगदी काळेकुट आहे. कुठल्याही जात, धर्मातील मुलगी चालत असली तरी, इतर घरातील मुली देण्यास नकार देतात तेव्हा आर्थिकदुष्ट्या कमकुवत असलेल्या, मागासलेल्या भागातील आदिवासी मुलीना लग्न करून आणले जाते. गरज पडली तर त्या मुलीच्या आई वडलांना आर्थिक मोबदलाहि दिला जातो.
आर्थिक मोबदला देऊन आणण्लेल्या या मुलीना मग हवि तशी वागणुक दिली जाते. कामाला तर जुंपलेच जाते मात्र विविध मार्गाने तिचे शोषण केले जाते. मुंबईत काम करणारी विदर्भातील रामटेक परिसरातील रीमा(नाव बदल) या विषयावर भरभरून सांगते, " तिने सांगितलेले सत्य हे कुठल्याही चित्रपटाला शोभेल असेच आहे. रामटेक जिल्ह्यात मुली विकणारे अनेक दलाल आहेत, तेथे २ते३ लाखांना मुली विकल्या जातात. या मुली आदिवासी, पारधी समाजातील असतात. ज्यांना लग्नासाठी मुली मिळत नाही असे लोक पैसे देऊन वेळ प्रसंगी दलाला, मुलीच्या वडिलांना तसेच काही रक्कम मुलीच्या नावे करून हि लग्न लावली जातात. आर्थिक मोबदला देऊन आणलेली हि बाई मग माणूस रहातच नाही. तीच मशीन होते. मशीन घरातल काम उपसणार, मुलांना जन्म देणारी आणि सर्वाच्या सोयीची सेवा करणारी चालत बोलत मशीन. यात शोषित असलेल्या बाईला दाद मागण्यासाठी कोठेच जाता येत नाही. कारण माहेरची माणसे अनेकदा तिला आर्थिक उत्पन्नाचे साधन म्हणुनच वापरतात. काही वेळा दलाल पालकांच्या अल्प ज्ञाणाचा फायदा घेत फसवतोही. झाशी कडील भागातहि भंडा-या जिल्ह्यातील मुली अश्याच प्रकारे दिल्या जातात. तेथून पळून आलेल्या मुलीची काहाणी तर रीय्धाय पिळवत्णारी आहे. लता (नाव बदल ) लग्न होऊन घरी गेल्यावर सासू व्यतिरिक्त घरात कुठलेही बाई माणूस नव्हते. पाच दीर आणि सासू सासरे असा असलेला परिवाराने ल्व्कारचे आपले रंग दाखवण्यास सुरवात केली. सकाळची पहिल्या करीना पासुन जे घरातील काम सुरु होई ते आर्धी रात्र झाली तरीही संपत नसे, या दरम्यान सासूने ताटात जे काही टाकले तेच खावे लागेल, अनेकदा ते पुरेसेहि नसे.
इतकेच काय ते उठता बसता तिला घरात कश्यासाठी आणले ते ऐकवले जाई. अर्ध्यारात्री अर्धमेल्या अवस्थेतहि तिच्या शिरीरावर नवरा हक्क सांगून ते ओरबाडून घेत. इतकेच कमी होते कि काय म्हणून काही महिन्यांनी रात्री तिच्या खोलीत सास-यासह दीरहि येऊ लागले. तुला खरेदी केली असल्याने आमच्या सर्वांचा तुझ्यावर हक्क आहे असे ते तिला सांगत. दिवसभर राबणा-या त्या बाईच्या अंगात प्रतिकार करण्याचाही त्राण राहत नसे. तरीही हि जनावरे रोज रात्री तिच्या शरीराला लोंबकळत. अखेर न राहून सासूला तिने याबबत सांगतील असता तिला धक्काच बसला घडत असलेल्या सर्व प्रकारची माहिती सासूला आधीच होती आणि तिच्या म्हणण्यानुसार आणखी मुली खरेदी करण्यासाठी पैसे नसल्याने आता उरलेल्या दिरांची लग्न न करता याच मुलीला सर्वांची पत्नी म्हणून रहावे लागणार होते. शारीरिक व मानसिक शोषणाच्या या उच्च्कान नतर लताने जवळच राहणा-या एका महिलेच्या मदतीने तिथन पळ काढला. मिळेल ती बस पकडून तिने ती जागा सोडली अनेक दिवस दिशाहीन प्रवास केल्यानतर कोणीतरी तिला तिची वाईट अवस्था पाहुन एका समाजीक सन्स्थेत भरती केले.
आज ती स्वतपुरते आर्थिक उत्पन्न मिळवते आहे. मात्र त्या आठवणी तिला आजही त्रास देतात. पुन्हा हि लोक आपल्या आयुष्यात आली तर आपले काय होईल या भीतीने आजही अनेक रात्री ती उठते. अलका हि शेतकरी महिला तिच्या नव-याने दुष्काळाला कंटाळून आत्महत्या केली तीन लहान मुल पदरात, जेमतेम शिकलेली, माहेरी हि आर्थिक स्थिती बेताची, अश्यातच लहान दिराचे लग्न जमेना, मग सास-यांनी अल्काचेच लग्न दिराशी लावायचे ठरवले. सगळ्यानीच ते मान्य हि केले. आत्महत्याग्रस्त शेतकरी महिला म्हणून मिळालेली भरपाई हि घरताच राहील आणि मुलालाही बायको मिळेल हा त्यामागचा उद्देश अलकालाही समजत होता, असे असूनही ती लग्नाला तयार झाली कारण तीन मुले घेऊन पुन्हा नव्या लोकांबरोबर जमवायचं हे तिला जास्त अवघड वाटत होते त्यामुळे पुनर्विवाहाची इच्छा नसतांनाही तिने लग्न केले तेही आपल्याच दिराशी. अश्या पद्धतीने शोषणाच्या या साखल्याच तयार होत आहेत.
मुलीचा घसरणार जन्मदर, ग्रामीण भगात स्त्रियांना मिळणारी दुय्यम वागणुक, आणि शेतकरी किंवा ग्रामीण भगाताला नवरा नाकारणा-या मुली यांचा जवळचा सहसबंध आहे. या सहसबांधाचा अभ्यास होण खरतर नित्तांत आवश्यक आहे. २०००६ मधील आत्महत्या, २०१५ मधील भिषण दुष्काळ, तरीही लग्नसस्थेच्या मुळाशि बाईचेचे होणारे शोषण हे वेगवेगळे वाटणारे घटक एकमेकांशी जोडले कि समाजाचे दिसणारे विकृत चित्र आपले मन हेलावून टाकते. मात्र याच घटकांनी स्वत शोषित असल्याचे दाखवत सुरु केलेली शोषणाची नवी साखळी हि स्वस्थ समाजासाठी निश्चितच घातक आहे. त्यामुळेच नकार देणा-या मुलीना दोषी ठरवण्यपेशा, स्त्रियांच्या हक्कासाठी समोर येत, जर घराघरातून ग्रामीन भागातुन पुरुषसत्ताक पद्धतिला हादरे बसू लागले तरी समोर असणारे चित्र नक्की बदलेल. प्रश्न इतकाच आहे कि या पुरुषस्तक व्यवस्थेला हादरे देण्याची तयारी घरा घरातुन केव्हा होणार? बाईला बाई माणसाचा दर्जा केव्हा मिळणार. तो दर्जा जोपर्यन्त मिळत नाही तोपर्यन्त लग्नाळू मुली " असला दादला नको ग बाई......" हे आपले वाक्य सतत नोंदवत राहणार.
(२०१६ च्या मिळून सा-याजणी या दिवाळी अंकातील लेख)
प्रियदर्शिनी हिंगे